Follow Us

Uncategorized

asantoshwebmagazin February 19, 2019

महात्मा फुल्यांनी कुणबी कुलभूषण छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी रायगडावर जाऊन शोधल्यानंतर महाराष्ट्रातल्या ब्राम्हण मंडळींनी छत्रपती शिवाजी महाराजांची उपयुक्तता कळली आणि त्यांच्या लक्षात आल की कुळवाडीभूषण छत्रपती शिवाजी पुढे सरकला तर त्यांच्या राजकारणाला धोकादायक ठरेल त्यामुळे त्यांनी ब्राम्हणाच्या सोयीचा मुस्लीम द्वेष्टा गो ब्राम्हण प्रतिपालक शिवाजी रंगवायला सुरुवात केली. संयुक्त महाराष्ट्र चळवळ सुरु झाल्यानंतर कम्युनिष्ट ब्राम्हण आणि समाजवादी ब्राम्हणांनी सेक्युलर शिवाजी जन्माला घातला. आता महाराष्ट्रात तीन शिवाजी आहेत. ब्राम्हणी शिवाजी तो भाजप – आर एस एस शिवसेनेचा आहे. कम्युनिस्ट आणि समाजवाद्यांचा सेक्युलर शिवाजी आहे. तिसरा शिवाजी फुल्यांनी शोधलेला कुळवाडी भूषण शिवाजी तो खरा आहे. महाराष्ट्रात शिवाजींच्या पूर्वी चारशे वर्षे जी सामजिक घुसळण होती, त्याचा अभ्यास केल्यानंतर शिवाजी कोण होता याच उत्तर मिळेल. त्यामुळे शिवाजी पूर्वी चारशे वर्षे महाराष्ट्रात जे सांस्कृतीक राजकारण आकाराला आला त्याचा अभ्यास करावा लागेल.

asantoshwebmagazin February 19, 2019

मुस्लीम राजवटीच्या काळात महाराष्ट्रातील सर्वच समाज निरनिराळया मार्गांनी त्रासला गेला होता. सरदारी, जहागिरी व वतनदारी यामुळे समजात शौर्य व पराक्रम निर्माण झाला होता. परंतु त्याचा उपयोग समाजालाच छळण्यासाठी व शोषण करण्यासाठी केला जात असे. समाजाच्या खालच्या स्तरातील लोक पारंपारिक हिंदु समाजव्यवस्थेमुळे विघटीत झालेले होते, दबलेले होते, त्यात मुस्लीम राजवटीची भर पडल्यामुळे शोषणात अधिक भर पडली होती. शिवाजी राजांनी स्वराज्य स्थापनेचे कार्य सुरू केल्यामुळे ब्राह्मणांपासून ते महार – मांग, कोळी , बेरड, दलदी, भंडारी इत्यादी जातींच्या लोकांना बरोबर घेऊन स्वराज्य उभे केले. त्यामुळे त्यांचाही विकास झाला.आर्थिक व सामाजिक क्षेत्रात त्यांना महत्व प्राप्त झाले. समाजातील दबलेल्या लोकांच्या अंगी असलेल्या विविध पारंपारिक गुणांमुळे स्वराज्याच्या उभारणीतील दलीत शोषित समाजाचे ऐतिहासिक स्थान स्पष्ट होऊ शकले. कोणताही माणूस जन्माने श्रेष्ठ नसून तो त्याच्या कर्तृत्वाने श्रेष्ठ होतो, हे सूत्र शिवाजी महाराजांच्या कार्यामुळे स्पष्ट होते.

asantoshwebmagazin February 16, 2019

आज फाशीवाद (Facism) हा जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात दिसतो आहे. भय, दहशत, उद्या काय होईल याचा भरवसा नाही, जीव मुठीत घेऊन जगणारी हताश जनता- या अशा भयंकर सांस्कृतिक कलहाच्या वातावरणात आपण सारे जगत असताना ‘पाश’ च्या कवितेचा अन्वय अधिक महत्त्वाचा होतो. देशात घडत असलेल्या सांस्कृतिक राजकारणातल्या या अशा पाश्र्वभूमीवर ‘पाश’ ची बऱ्याच अंशी समग्र कविता मराठीत आली आहे; त्याबद्दल श्रीधर चैतन्य यांनी घेतलेल्या श्रमाचे निश्चितच कौतुक आहे.

asantoshwebmagazin February 15, 2019

ज्या पश्चिम महाराष्ट्राकडे सधन भाग म्हणून पाहिले जाते, त्याच भागात असंख्य गावे पाण्यासाठी तडफडत आहेत. पाणीदार असलेल्या गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. विहिरी, बोरवेल आटल्या आहेत. प्रदूषण वाढत आहे. हे सगळे प्रश्न निर्माण होत असताना कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील डोंगरदऱ्यातील गावे जलसंधारणासाठी एकवटली आहेत. दिनांक ९ डिसेंबर २०१९ रोजी पाणी फौंडेशन; महाराष्ट्र , अखिल भारतीय किसान सभा; कोल्हापूर, तुप्पुरवाडी को. ऑप. क्रेडिट सोसायटी; मुंबई यांच्या संयुक्त विद्यामानाने “पाणी परिषद” नरेवाडी येथे पार पडली.

asantoshwebmagazin February 15, 2019

कारखाना बंद पडल्याने बेरोजगार कामगारांचे थकीत ४ करोड ८१ लाख रुपये अडकलेले. By Aasantosh आजपासून पंधरा वर्षांपूर्वी वर्धा जिल्ह्यातील एक साखर कारखाना बंद पडला.या कारखान्यात काम करणाऱ्या ६०० पेक्षा अधिक कामगारांच्या नोकऱ्या गेल्या . कारखाना बंद होत असताना राहिलेले राहिलेले वेतन,भविष्य निर्वाह निधी अंतर्गत कपात करण्यात आलेली रक्कम सुद्धा कामगारांना देण्यात आली नाही. कारखाना बंद […]

asantoshwebmagazin February 11, 2019

  सतीश गोरे  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ    देशभरात विद्यार्थी-उच्च-शिक्षित बेरोजगार युवक या सरकारच्या शिक्षण-विरोधी धोरणामुळे व्याकूळ झालेला आहे. “देश का युवा भरे हुँकार, कहाँ गया मेरा रोजगार?” अशा घोषणा देत देशातील विद्यार्थी-उच्च-शिक्षित बेरोजगार तरुण छोट्या-मोठ्या शहरात वेग-वेगळ्या प्रश्नांना घेऊन आंदोलन करीत आहे. त्यातीलच एक कडी म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीजवळील संविधान स्थंभाशेजारी […]

asantoshwebmagazin February 10, 2019

” चौकीदारही चोर है – नरेंद्र मोदी चोर है ” ही दोन वाक्ये विशेष आत्मविश्वासाने प्रेस कॉन्फरन्समध्ये उच्चारण्याची संधी राहुल गांधींना दिली ती ‘द हिंदू’ या मातब्बर इंग्रजी दैनिकातील एन. राम यांच्या राफेलविषयी गौप्यस्फोटाने. हे तेच नरसिंह राम तथा एन. राम आहेत ज्यांनी १९८८-८९ला बोफोर्स प्रकरण बाहेर काढले होते.

asantoshwebmagazin February 10, 2019

नयनतारा सहगल यांना यवतमाळ येथे भरलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या उदघाटन कार्यक्रमाचे निमंत्रण देऊन ते रद्द करण्याच्या घटनेनंतर अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील हल्ल्याची ही मोठी घटना आहे. ह्या घटनेचा सर्व स्तरातून निषेध होतो आहे.

asantoshwebmagazin February 7, 2019

नवनाथ मोरे शेती विकासाचे नवनवे टप्पे पार करत असताना फक्त नफ्यासाठी उत्पादन, हे तत्व अवलंबले गेल्यामुळे घटती उत्पादकता आणि क्षारपड जमिनी हे एक संकट समोर येत आहे. माती तयार होण्यास हजारो वर्षे लागतात. त्यामुळे उत्पादन करत असताना त्याच्याकडे लक्ष देण्याची गरजेचे होते. परंतु ते दिले गेले नाही, हे वास्तव आहे. ज्या पश्चिम महाराष्ट्राकडे आपण सधन […]

asantoshwebmagazin February 6, 2019

प्रल्हाद अधिकारी चिंचारे (जि.पालघर) : पालघर तालुक्यातून जात असलेल्या प्रस्तावित पालघर तालुक्यातून जात असलेल्या प्रस्तावित मुंबई-बडोदा एक्सप्रेस-वेला शेतकऱ्यांचा विरोध दिवसेंदिवस वाढत आहे. महामार्गासाठीच्या जमीन मोजणीसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी हुसकावून लावले आहे.मुंबई-बडोदा एक्सप्रेस-वेला शेतकऱ्यांचा विरोध दिवसेंदिवस वाढत आहे. महामार्गासाठीच्या जमीन मोजणीसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी हुसकावून लावले आहे.  

asantoshwebmagazin February 3, 2019

भगिनीभाव ही एक व्यापक अशी राजकीय संकल्पना आहे. त्या संकल्पनेमध्ये सर्व स्त्रियांच्या हिताला, आकांक्षांना, अभिव्यक्तीस्वातंत्र्याला जागा तर आहेच पण त्याचबरोबर त्यांच्यातील परस्परसंबंधांना, सहकार्याच्या भावनेला व कृतीला कळीचं स्थान आहे.

asantoshwebmagazin January 8, 2019

४, ५ आणि ६ जानेवारी दरम्यान पुण्यातील आझम कॅम्पसमध्ये १२वे अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन झाले. या संमेलनाचे अध्यक्ष होते डॉ. अलीम वकील. त्यांच्या अध्यक्षीय भाषणाचा हा संपादित अंश.. सांप्रत काळ इतक्या श्रवणाचा आहे की, जिभेचे कार्य केवळ ‘चव’ घेण्याचे आहे, अशी खात्री होऊ लागली आहे. सतत ऐकतच राहण्याने ऐकणारे संभ्रमित होतात आणि सतत […]

asantoshwebmagazin January 8, 2019

९२ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात ज्येष्ठ भारतीय लेखिका नयनतारा सहगल यांना निमंत्रण नाकारणे या निंदनीय कृत्याचे निषेध पत्रक ———————————————————– वि. भि. कोलते संशोधन केंद्र व वाचनालय आणि विदर्भ साहित्य संघ शाखा, यवतमाळ आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दि. ११, १२ व १३ जानेवारी २०१९ रोजी यवतमाळ […]

asantoshwebmagazin January 7, 2019

यवतमाळ येथे 11 ते 13 जानेवारी या कालावधीत होणाऱ्या 92व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटक म्हणून ज्येष्ठ साहित्यिका नयनतारा सहगल यांना आमंत्रित करण्यात आले होते. मात्र त्यांच्या निवडीवरून झालेल्या वादानंतर संमेलनाच्या आयोजकांनी सहगल यांना उपस्थित राहण्यास नकार कळवला.    नयनतारा सहगल  यांचे उद्घाटनाचे संपूर्ण भाषण इथे देत आहोत. सध्याच्या सामाजिक-राजकीय परिस्थितीवर त्यांनी महत्वपूर्ण  भाष्य […]

asantoshwebmagazin January 3, 2019

प्रगती बाणखेळे  आपला समाज परंपरेने प्रतीकांमध्ये रमणारा आहे. सामाजिक चळवळीही याला अपवाद नाहीत. ही प्रतीकं त्या त्या काळात समाजाला एकत्र आणायला, लोकांना प्रेरणा द्यायला खूप महत्त्वाची ठरली हे निःसंशय. खादी आणि चरखा हे स्वातंत्र्य चळवळीत मोलाचे ठरले. सारा देश गांधींच्या विचारांकडे आकर्षित करण्यात या प्रतीकांचा मोठा वाटा होता. पण काळ बदलला आहे. प्रतीकं ही अस्मितांची […]

asantoshwebmagazin December 31, 2018

अनिकेत लखपती   ३१ डिसेंबर २०१७ वर्षाचा शेवटचा दिवस. या दिवसाची पहाटही माझ्यासाठी इतर अनेक दिवसांप्रमाणेच होती. फक्त त्यात एकाच भावना नवीन होती ती म्हणजे, ‘जी मजा वर्षभर करू शकलो नाही ती आज करू’ आणि आनंदात दिवस घालवू. विचार केल्याप्रमाणे हा शेवटचा दिवस मनापासून जगलो. हे सगळ करत असतांना या वर्षी केलेल्या कोणत्याच चुकीच्या गोष्टी […]

asantoshwebmagazin December 31, 2018

                                  ( आज  कॉम्रेड राजीव कालेलकर यांचा स्मृतिदिवस आहे. स्त्री मुक्ती चळवळ, मागोवा,लालनिशान,युवा भरात,श्रमिक मुक्ती दल आदी संघटनांचे ते सक्रिय पाठीराखे होते. कला,साहित्य,राजकारण इत्यादी वर भरभरून बोलणारे व लिहिणारे ते कार्यकर्ते विचारवंत होते. त्यांनी विविध विषयावर लिहिलेल्या लेखांचे पुस्तक […]

asantoshwebmagazin December 16, 2018

पर्यावरण संघर्ष समितीच्या वतीने २८ डिसेंबर  २०१८ रोजी वायएमसीए मैदान,माणिकपूर,वसई (प) येथे पर्यावरण संवर्धन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून सदर  कार्यक्रमास गुजरात राज्यातील आमदार जिग्नेश मेवानी  उपस्थित राहणार आहेत. फादर दिब्रिटो यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित पर्यावरण संवर्धन मेळाव्याचे उदघाटन आदिवासी एकता परिषदेचे नेते काळुराम काका धोदडे यांच्याहस्ते होणार असून माजी मंत्री,नगररचनाकार चंद्रशेखर प्रभू यांची विशेष उपस्थिती […]

asantoshwebmagazin December 15, 2018

अनुवाद: श्रीधर चैतन्य  हरिती प्रकाशन पुस्तकाच्या खरेदीसाठी  ; https://amzn.to/2SQXtbj    

asantoshwebmagazin December 5, 2018

टीम असंतोष भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (भाकप) च्या पुण्यातील ज्येष्ठ कार्यकर्त्या कॉ. शांताबाई मधुकर रानडे यांचे दि.5 डिसेंबर रोजी सायंकाळी पुणे येथे वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ९३ वर्षांच्या होत्या. त्यांच्या मागे एक मुलगी सुषमा दातार, जावई, डॉ.अभय दातार आहेत. त्यांचे वडील कै. गणेश रामचंद्र साठे हे साठे बिस्कीट कंपनीचे संस्थापक आणि नामवंत कारखानदार होते. शांताबाईंचे शिक्षण […]

asantoshwebmagazin November 29, 2018

परवा समाज शास्राच्या तासाला डॉ.आंबेडकरांच्या अभ्यासावरुन चर्चा थेट माझ्या मार्कापर्यंत घसरली. मुलांना ही उत्सुक्ता होती माझ्या गुणीची टक्केवारी जाणून घेण्याची. आडेओडे न घेता मी सरळ सांगून टाकला माझ्या शैक्षणिक प्रगतीचा आलेख बारावीत मारलेल्या डुबकी सह तेव्हा वर्गात कधीच न बोलणा-या मुलीने प्रश्न केला. सर, ” मग तुमची जात कोणती ? ” आमचे नव्याण्णववाले लागतं नाहीत […]

asantoshwebmagazin November 29, 2018

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जेव्हा सामाजिक समरसता मंचाची १९८३-मध्ये स्थापना केली तेव्हापासून दीर्घकाळ समरसता मंचाचे लक्ष्य हे मुख्यत: महात्मा जोतीराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे राहिलेले आहेत. फुले आणि आंबेडकरांच्या परंपरेतील आणखी एक नाव हे छत्रपती शाहू महाराजांचे आहे. परंतु, संघाने दीर्घकाळ शाहू महाराजांच्या बाबतीत काही स्पष्ट भूमिका घेतली नव्हती. याला अनेक करणे असू शकतात. […]

asantoshwebmagazin November 27, 2018

भरभराट इच्छिणा-या कोणत्याही समाजाला परंपरा मांडून दाखवणारे मनू लागतात , तसेच मनूंनी मांडून ठेवलेल्या पंरपरा जेव्हा घट्ट , खोडागत बनून पुढची वाट थांबवून धरतात , तेव्हा मनूंना आव्हान देणारे फुलेसुद्धा आवश्यक असतात… अशी मांडणी केली विदुषी दुर्गा भागवत यांनी. २ एप्रिल १९८९ ला महाराष्ट्र टाइम्सच्या मैफल पुरवणीत हा लेख छापून आला होता.. ……………………………. गेले काही […]

asantoshwebmagazin November 26, 2018

कविता …..                                                                      संविधानवाद !    डार्वीनचा उत्क्रांतीवाद आईनस्टाईनचा सापेक्षतावाद असो की… हाॅकीन्सचा विश्वनिर्मितीवाद… बसतात झक मारत सगळे वाद.. हिंदुस्थानी पुराणवाद्यांच्या वितंडवादात […]

asantoshwebmagazin November 26, 2018

॥प्रासंगिक॥ २६ नोव्हेंबर : संविधान दिन    देश स्वतंत्र झाला. पण देशापुढे संविधान लिहिण्याचा यक्षप्रश्न उभा राहिला. आमच्या बाबासाहेबांनी तो प्रश्न निकालात काढला. बाबासाहेबांनी लिहीलेलं संविधान म्हणून आम्ही त्याचा खुप खुप अभिमान बाळगू लागलो. अभिमानाची जागा पुढे गर्वाने बळकावली. धर्मग्रंथांसारखंच संविधानाचं स्थान आमच्यादृष्टीने सर्वोच्च बनले. परिणामी ‘होली बायबल’, ‘पवित्र कुराण’ आणि ‘परमपवित्र गीते’सारखा, संविधानही कधी […]

asantoshwebmagazin November 22, 2018

सणासुदीत तिला लांब ठेवले जाते. देवघर असो की स्वयंपाकघर दोन्हीपासून चार हात लांब राहायचे तिने. मासिक पाळीच्या त्या चार दिवसात अपवित्र ठरवून बाहेर बसविलेल्या कुठल्याही स्त्रीची मानसिक घालमेल संपता संपत नाही.              पण जी हा कचरा वाहून नेते तीच काय ? तिला कोणत्या नजरेला सामोरे जावे लागत असेल रोज ? कोणती वागणूक मिळत असेल…?          […]

asantoshwebmagazin November 21, 2018

आमच्या चुलींचं संगीत ऐका . आम्हा पिडीतांच्या वेदनेच्या किंकाळ्या ऐका. माझ्या बायकोची मागणी ऐका . माझ्या मुलीचा प्रत्येक हट्ट ऐका. माझ्या बिडीतलं विष मोजा. माझ्या खोकण्याचा मृदंग ऐका. माझ्या ठिगळ लावलेल्या पायजम्याचे थंडगार सुस्कारे ऐका. माझ्या पायातल्या जोड्यातून माझ्या मनाचं दु:ख ऐका. माझा निशब्द आवाज ऐका. माझ्या बोलण्याची ढब ऐका. माझ्या देहबोलीचा जरा अंदाज घ्या. […]

asantoshwebmagazin November 21, 2018

        शेती प्रश्नांच्या निमित्ताने संसदेचे दहा दिवसाचे विशेष अधिवेशन बोलविण्यात आले पाहिजे अशी पी.साईनाथ यांची भूमिका राहिलेली आहे. अखिल भारतीय किसान समन्वय समितीच्या वतीने २९-३० नोव्हेंबर २०१८ ला या मागणीनिमित्ताने चलो दिल्ली चा नारा देण्यात आला आहे.         वर्तमान कालखंड हा शेतीच्या दृष्टीने अत्यंत वाईट कालखंड असल्याचे पी.साईनाथ यांनी म्हटले आहे. शेती समस्येला वाहिलेले दहा […]

asantoshwebmagazin November 20, 2018

                          लेखिकेच्या विनंतीवरून कुठलेली संपादकीय संस्कार न करता सदर लेख “असंतोष” च्या वाचकांकरिता प्रकाशित करीत आहोत. हा लेख सकाळ दिवाळी अंकात प्रकाशित झाला आहे ह्याची वाचकांनी नोंद घ्यावी.                                […]

asantoshwebmagazin November 19, 2018

पुरूष म्हणून जगताना… □ मी शोधतोय तुला ता उम्र माझी माझ्याच स्वतःच्या शोधात तुझे असणे माझ्या पुर्णत्वाची साक्ष आहे कसे कळेल तुला? मी जन्मतःच अधूरा आहे तुझ्यातूनच जन्मलो आहे दिसतो जरी परिपूर्ण मी तुझ्याविना अपुर्ण आहे. तू प्रसवलेस मला तू जोजवलेस मला रक्ताने शिंपून प्राण ममत्वे भरविलेस मला. परिपक्व जरी जाहलो वयानेही वाढलो अदृश्य नात्यात […]

asantoshwebmagazin October 28, 2018

१. अलाहाबादचे प्रयागराज झाले आणि इकडे अंबानीस ४६७ एकर आरक्षित वन जमीन दिली गेली- रवीश कुमार https://aasantosh.com/2018/10/22/अलाहाबादचे-प्रयागराज-झाल/ २. मानसिक आरोग्य हा एक मूलभूत हक्क असायला हवा ! https://aasantosh.com/2018/10/25/मानसिक-आरोग्य-हा-एक-मूलभू/ ३. भारतात मानसिक अनारोग्याची साथ – संजय सोनवणी https://aasantosh.com/2018/10/25/भारतात-मानसिक-अनारोग्याच/ ४. अमेरिका-चीन ताणतणाव : “शीतयुद्ध” दुसरी आवृत्ती होईल का ? (भारतासाठी काही दखलपात्र प्रश्न) https://aasantosh.com/2018/10/26/अमेरिका-चीन-ताणतणाव-शीत/ ५. सामाजिक -आर्थिक […]

asantoshwebmagazin October 26, 2018

प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेली बुलेट ट्रेन मुंबई ते अहमदाबाद मार्गावर धावणार आहे. ५०८ किमी असलेला हा मार्ग महाराष्ट्र,गुजरात व दादरा नगर हवेली या प्रदेशातून जाणार आहे. महाराष्ट्रातून जाणारा हा मार्ग राज्याच्या पालघर जिल्ह्यातून जाणार आहे. यामुळे शेती,पाणी,जंगले यांचे मोठे नुकसान होण्याबरोबरच लाखो आदिवासी,शेतकरी व मासेमार लोकांच्या उपजीविका धोक्यात येणार आहेत. बुलेट ट्रेन […]

asantoshwebmagazin October 25, 2018

  बदललेल्या जीवनशैलीमुळे आणि कुटुंबसंस्थेच्या ऱ्हासामुळे मुलं आणि मोठ्यांतही एकाकीपणाच्या भावनेची लागण होते आहे. किंबहुना एकाकीपणा किंवा आपण दुर्लक्षिले जात आहोत या भावनाच संभाव्य मानसिक विकारांची पहिली पायरी असते. या पायरीवरच जर मानसिक सुरक्षा कवच मिळाले नाही तर स्वाभाविकपणेच मूल मनोविकारी बनू शकते. भारतीय नागरिकांचे मानसिक आरोग्य दिवसेंदिवस ढासळत चालले आहे. आपल्या देशात मनोविकार असलेल्यांची […]

asantoshwebmagazin October 25, 2018

                                                                       विक्रम पटेल, शेखर सक्सेना / अनुवाद : डॉ. दीपक बोरगावे                          मानसिक […]

asantoshwebmagazin October 24, 2018

  महाराष्ट्राच्या वर्धा  जिल्ह्यातील दिग्रस गावातील दलितांच्या स्थितीवर दृष्टीक्षेप टाकणारा हा लेख डॉ. मुकेश कुमार व त्यांच्या चमूने केलेल्या  अभ्यासाचा अहवाल आहे.  हा मूळ अहवाल हिंदीत असून अहवालात  “पूरब  टोला’ असा शब्द वापरण्यात आला आहे.  मराठीमध्ये गावातील जुनी पिढी दिशांना कधीही पूर्व-पश्चिम असे संबोधत नव्हती तर ती खाली-वर असे संबोधित होती. उदाहरणादाखल पूर्वेस असणाऱ्या एखाद्या स्थानाला खालच्या […]

asantoshwebmagazin October 22, 2018

                 शबरीमला मंदिराच्या निमित्ताने केरळची चर्चा सुरु आहे. स्तन झाकण्याच्या अधिकारासाठी नांगेली या दलित महिलेने आपले स्तन कापून टाकले होते. नांगेली चे नाव केरळच्या बाहेर खूप लोकांनी ऐकलेले असेल. त्रावणकोर राज्यात जातीवादाची मुळे खोलवर रुजलेली होती. दलित महिलांना स्तन झाकण्याचा अधिकार नव्हता. त्याकाळात नांगेलीने स्तन झाकून विद्रोह पुकारला. […]

asantoshwebmagazin October 22, 2018

    रवीश कुमार  हिंदुस्थान टाईम्सच्या विनित सचदेवा  यांनी एक  भांडाफोड केली आहे.  मेक इन इंडिया च्या अंतर्गत मोबाईल फोनची आयात कमी झाली आहे आणि ते आता भारतातच तयार केले जातात.असा सरकार चा दावा आहे. असं खोटं  यासाठी सांगण्यात येऊ लागलं कि मोबाईल फोन भारतात बनायला लागल्याने रोजगार निर्मिती होते आहे. वास्तविक पाहता मोबाईल फोन हे […]

asantoshwebmagazin October 18, 2018

संजय सोनवणी ज्ञानाची रचना हे जगातील उपलब्ध ज्ञान समजावुन घेतल्याखेरीज होणार नाही. इंग्रजी ही ज्ञानभाषा बनली कारण प्राकृत, संस्कृत, अरबी, चीनी ते पार आपल्याल माहितही नसलेल्या भाषांतील उपलब्ध प्राचीन साहित्य, शिलालेख ईत्यादी इत्यादी सर्व त्यांनी आपल्या भाषेत तर नेलेच पण त्यावर अभ्यासपुर्ण प्रस्तावना/विश्लेषने लिहिली. कथासरित्सागर असो कि गाथा सप्तशती, मीडोज ओफ़ गोल्ड हे अल मसुदीचे […]

asantoshwebmagazin October 18, 2018

  देवकुमार अहिरे प्रस्तावना–                जात्योन्नती, जातीयुद्ध कि जातीअंतक लढाई यापैकी आपणास एकाची निवड करावीच लागेल. जातीअंताची लढाई जेंव्हा जेंव्हा तीव्र होवून उभी राहण्याचा प्रयत्न करते त्या त्यावेळी प्रत्येक जातीतील अभिजन आणि सत्ताधारी वर्ग इतर जातीला शत्रु ठरवून जातीअंतक लढाईला फोडून जातीयुद्धाकडे घेवून जाण्याचा प्रयत्न करतांना दिसतो. जातीआधारित आंदोलनाला जातीवर्ग व्यवस्था विरोधी वैचारिक दिशा असली तरच ते व्यापक होवून स्वतःच्या मूळ समस्या सोडवू शकते […]

asantoshwebmagazin October 17, 2018

सौरभ वाजपेयी,दिल्ली. इसवी सन १९१७ मध्ये महात्मा गांधी यांनी आपले पहिले आंदोलन कृषी आणि शेतकऱ्यांच्या समस्यांसंदर्भात व चंपारण येथील सत्याग्रहाने सुरु केले होते  आणि आज १०० वर्षांनंतरही देशासमोर पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या समस्या मोठे चिंतेचे कारण बनल्या आहेत ही योगायोगाची गोष्ट आहे .  शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागण्या आणि आंदोलने वेगाने देशातील सगळ्या राज्यांमध्ये पसरत आहेत. शिवाय शेतकऱ्यांच्या […]

asantoshwebmagazin October 11, 2018

 सरफराज अहमद                           सोलापूर सिद्धेश्वर बँक व्याख्यानमाला  सोलापूर येथे आजपासून (दि. ११ ऑक्टो ) सुरु झाली आहे. सिद्धेश्वर  बँकेचे अध्यक्ष हे सोलापूर शहर कॉंगेसचे अध्यक्ष आहेत. या बँकेचे संस्थापक स्वातंत्र्य सैनिक माजी आमदार शिवदारे आहेत जे सोलापूर शहर कॉंगेसचे सुद्धा संस्थापक होते. सदर व्याख्यानमालेत दि.१२ […]

asantoshwebmagazin October 11, 2018

गंगेसाठी झटणारे संन्यासी योद्धे डॉ.जी.डी.अग्रवाल यांचे ऋषीकेश येथील एम्स मध्ये निधन झाले.  गंगा पुत्र स्वामी ज्ञानस्वरूप सानंद उर्फ जी.डी.अग्रवाल २२ जून पासून गंगा प्रवाही व निर्मळ राहावी ह्याकरीता उपोषण करीत होते. गंगेच्या शुद्धीकरणासाठी गंगा कायदा बनविण्याची भाषा करणाऱ्या मोदी सरकारपुढे गंगा कायदा बनविण्याची मागणी घेऊन डॉ.अग्रवाल मागील ११२ दिवसापासून उपोषण करीत होते. देशभरात नमामी गंगेच्या […]

asantoshwebmagazin October 10, 2018

                                                                         रिबले शुभम आश्विन मासारंभापासून देशात नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. आपल्या राज्यात हा उत्सव घटस्थापनेचा उत्सव व कृषीमायेचा उत्सव म्हणून साजरा […]

asantoshwebmagazin October 8, 2018

सुभाष गाताडे जम्मू- कश्मीर ला विशेष दर्जा प्रदान करणाऱ्या कलम ३७० सबंधी भारतीय जनसंघाचे संस्थापक राहिलेल्या श्यामाप्रसाद मुखर्जीचे नाव भाजपाकडून घेतले जात नाही असा एकही प्रसंग नाही.. हि बाब वेगळी कि नवी तथ्ये समोर आल्यानंतर हा दावाच प्रश्नाच्या घेऱ्यात आला आहे. त्यांनी कश्मीर ला विशेष दर्जा देण्याचा विरोध केला म्हणून त्यांना अटक करण्यात आले होते. […]

asantoshwebmagazin October 5, 2018

संजय सोनवणी महात्मा गांधी आजही जगभरच्या लोकांवरच नव्हे तर आंतरराष्ट्रीय नेत्यांवर प्रभाव टाकुन असणारे एक आदरणीय व्यक्तीमत्व आहे. जगभरच्या स्वातंत्र्य लढ्यांना अहिंसा आणि सत्याग्रहाच्या अभिनव हत्याराने झुंजण्याचे आत्मीक बळ गांधीजींनी दिले. सहनशीलता आणि सहिष्णुता त्यांच्या जीवनाचा एक अतुट भाग होता. आता भारतात भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे. भाजप हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पोलिटिकल विंग आहे […]

asantoshwebmagazin October 2, 2018

सुभाषचंद्र सोनार चरख्याचा स्वातंत्र्य आंदोलनाशी संबंध असला तरी, चरख्याला स्वातंत्र्य प्राप्तीचं साधन म्हणून, कोणीही प्रोजेक्ट केलं नव्हतं. त्यामुळे चरख्याचा संबंध स्वातंत्र्य आदोलनाशी कधी व का आला, हे समजून घेणं गरजेचं आहे. तसे समजून घेतले तरच ना जाने कितने झूले फांसी, कितनों ने गोली खाई। क्यूं झूठ बोलते साहिब, कि चरखा चलाने से आजादी आई॥ या […]

asantoshwebmagazin October 1, 2018

महात्मा गांधी या जगातून जाऊन ७० वर्षे झाली आहेत. या सात दशकात खूप सारे टीकाकार सुद्धा त्यांच्या मार्गाने नंतर मार्गक्रमण करताना दिसले.कमीतकमी सार्वजनिकरीत्या भारताचे जवळपास सर्वच राजकीय पक्ष हे गांधीजीविषयी श्रद्धा व्यक्त करताना दिसतात.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक ते प्रधानमंत्री असा प्रवास झालेल्या नरेंद्र मोदींनी गांधीच्या चष्म्याला आपल्या सरकारच्या प्रतीक चीन्हासारखे बनवून टाकले तेव्हा भारतातील सर्व […]

asantoshwebmagazin September 28, 2018

केनिया देशाचे लेखक न्गुगी हे गेली पन्नास वर्षे लिहित आहेत. त्यानी आपल्या सुरुवातीच्या काही कादंबऱ्या या इंग्रजी भाषेतून लिहिल्या पण नंतर त्यांनी इंग्रजी भाषेतून लिहिणे सोडून दिले.ख्रिश्चन धर्म व नाव यांचा त्याग केला. त्यांना नको असलेल्या वसाहतवादि भूतकाळाच्या संदर्भाने निश्चित अशा त्यांच्या भाषा आणि संस्कृती बाबत भूमिका आहेत.म्हणून न्गुगी यांनी त्यांच्या गोकोया देशी भाषेतच लिखाण […]

asantoshwebmagazin September 24, 2018

मोदींनी देशासाठी काहीच केले नाही असे बिल्कुल नाही . त्यांनी या देशाला शिव्यांची लोकशाही बनवून टाकले आहे असे जेष्ठ पत्रकार रविश कुमार म्हणाले रविश दिल्लीच्या कॉन्स्टीट्यूशन क्लब मध्ये २२-२३ सप्टेंबर ला पार पडलेल्या CAAJ(कमेटी अगेन्स्ट असॉल्ट ऑन जर्नलिस्ट्स) च्या दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आयोजित दुसऱ्या सत्रात बोलत होते Trolls, Threats, And Intimidation (ट्रोल, […]

asantoshwebmagazin September 24, 2018

पावणे दोन लोकांची सरकार असलेल्या भारत सरकारचा राफेल सौदा हा मेक इन इंडियाच्या फायद्याचा कसा असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते शशी सोनवणे यांनी उपस्थित केला आहे.. सत्तेत आल्याबरोबर मोदींनी १२६ विमाने व शासकीय प्रकल्प असलेल्या हिंदुस्तान ऐरोनॉटिक्स लिमिटेड ला काही तंत्रज्ञानाचे हस्तांतरण च्या जागी फक्त ३६ तयार असलेल्या विमानाचा सौदा करण्याची घाई मोदींनी का केली .? […]

asantoshwebmagazin September 23, 2018

(फोटो क्रेडिट – द हिंदू ) एक-दोन वर्षांपूर्वी ‘मुक्त शब्द’च्या एका अंकात ‘गरज हिंदू डाव्यांची’ असा एक लेख प्रकाशित झाला होता. (मी शीर्षक कदाचित चुकत असेन, पण आशय हाच होता.) तो लेख म्हणजे मराठी लेखन-संपादन क्षेत्रातील काही मित्रांची झालेली एक चर्चा होती. त्यातील राम जगताप हे एक नाव मला आठवतं. इतर आत्ता आठवत नाहीत. ‘द […]

%d bloggers like this: