Tag: मृत्यूलेख

रामलाल गणपत शेंडे : महात्मा ज्योतिबा फुले यांचे स्वप्न साकारणारा हमाल

रामलाल गणपत शेंडे : महात्मा ज्योतिबा फुले यांचे स्वप्न साकारणारा हमाल

Social
डॉ.सोपान शेंडे 28 नोव्हेंबर रोजी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुण्यस्मरण दिनी वडिलांनी (श्री. रामलाल गणपत शेंडे) इहलोकीची यात्रा संपविली हा योगायोग म्हणा किंवा त्यांचे भाग्य म्हणा, परंतु त्यामुळे विचारांचे भूतकाळाचा वेध घेण्याचे चक्र सुरू झाले. त्या प्रक्रियेतूनच हा मृत्यूलेख लिहिणची प्रेरणा मिळाली. चांदा गावः- नेवासे तालुक्यातील चांदा हे सर्वांगाने सपंन्न असे एक महत्वाचे गाव. राजकारण, समाजकारण, संसकृती या सर्वांगाने या गावाला संपन्न वारसा लाभलेला आहे. त्यामुळे या गावातील सामान्यातला सामान्य माणूस एक प्रकारचे वेगळेपण घेउन समाजात वावरताना दिसतो. हे चांदे गावचे वैशिष्ट्य भूषण आहे. बालपण व जडणघडण - रामलाल गणपत शेंडे यांचा जन्म हिवरे, तालुका नेवासा येथे सुमारे 1933 साली झाला. हे कोणी राजकारणी किंवा श्रीमंत घराण्यातील व्यक्ती नव्हेत. तर ते एक साधे शेतमजूरी व हमाली करणारी व्यक्ती होते. प