Tag: मुकेश कुमार

महाराष्ट्राच्या दिग्रस गावातील ‘खालची आळी ‘ आणि स्वातंत्र्याची सत्तरी – डॉ.मुकेश कुमार

महाराष्ट्राच्या दिग्रस गावातील ‘खालची आळी ‘ आणि स्वातंत्र्याची सत्तरी – डॉ.मुकेश कुमार

Reportage, Social, Uncategorized
  महाराष्ट्राच्या वर्धा  जिल्ह्यातील दिग्रस गावातील दलितांच्या स्थितीवर दृष्टीक्षेप टाकणारा हा लेख डॉ. मुकेश कुमार व त्यांच्या चमूने केलेल्या  अभ्यासाचा अहवाल आहे.  हा मूळ अहवाल हिंदीत असून अहवालात  "पूरब  टोला' असा शब्द वापरण्यात आला आहे.  मराठीमध्ये गावातील जुनी पिढी दिशांना कधीही पूर्व-पश्चिम असे संबोधत नव्हती तर ती खाली-वर असे संबोधित होती. उदाहरणादाखल पूर्वेस असणाऱ्या एखाद्या स्थानाला खालच्या बाजूला असे संबोधले जायचे. तसेच पश्चिमेला वरच्या बाजूला अथवा वरच्या अंगाला असेही संबोधले जायचे. गावच्या रचनेसंबंधात बोलायचे झाले तर आजही दलित वस्ती या खालच्या बाजूला अर्थात पूर्वेच्या बाजूला दिसून येतात. आळी अर्थात गली, नगर. या संदर्भाने अनुवादकाने हिंदीतील पूरब टोला चे मराठी रूपांतरण खालची आळी असे केले आहे.     सदर  हिंदी अहवाल "असंतोष" च्या वाचकांसाठी गजानन निलामे  यांनी मराठीत अनुवादित के