Tag: मानव

तयास मानव म्हणावे का – सावित्रीबाई फुले

तयास मानव म्हणावे का – सावित्रीबाई फुले

Poetry
सावित्रीबाई फुले. जन्म - ३ जानेवारी १८३१. (मृत्यू १० मार्च १८९७)सावित्रीबाईंच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांची एक कविता- ज्ञान नाही विद्या नाहीते घेणेची गोडी नाहीबुध्दी असुनि चालत नाहीतयास मानव म्हणावे का? दे रे हरी पलंगी काहीपशुही ऐसे बोलत नाहीविचार ना आचार काहीतयास मानव म्हणावे का? पोरे घरात कमी नाहीतयांच्या खाण्यासाठीहीना करी तो उद्योग काहीतयास मानव म्हणावे का? सहानुभूती मिळत नाहीमदत न मिळे कोणाचीहीपर्वा न करी कशाचीहीतयास मानव म्हणावे का? दुसर्‍यास मदत नाहीसेवा त्याग दया माया हीजयापाशी सद्गुण नाहीतयास मानव म्हणावे का?  ज्योतिष रमल सामुद्रीकहीस्वर्ग नरकाच्या कल्पनाहीपशुत नाही त्या जो पाहीतयास मानव म्हणावे का? बाईल काम करीत राहीऐतोबा हा खात राहीपशू पक्षात ऐसे नाहीतयास मानव म्हणावे का?  पशुपक्षी माकड माणुसहीजन्ममृत्यु सर्वांनाहीयाचे ज्ञान जराही नाहीतयास मानव