Tag Archives: महात्मा गांधी

गोडसे @ गांधी.कॉम

 •  

डॉ. प्रेरणा उबाळे

महात्मा गांधी आपले व्यक्तिमत्व, विशिष्ट जीवन पद्धत, कार्य, आचरण आणि विचारांच्या असामान्यतेमुळे जगन्मान्य झाले. एक व्यक्तिविशेष असूनदेखील ते आज सत्य, अहिंसा, करुणा अशा मानवी जीवनाच्या शाश्वत आणि उदात्त मूल्यांचे प्रतीक बनले आहेत. एवढेच नाही तर भारतात न्याय, राजकारण, समाज, वैयक्तिक जीवनामध्ये नैतिक अधिष्ठानासारखे ते प्रतिस्थापित झाले आहेत. कोर्ट, सरकारी कार्यालयांमध्ये त्यांच्या प्रतिमांची स्थापना हे त्याचे उत्तम उदाहरण म्हणता येईल.केवळ सत्य आणि अहिंसाच नाही तर त्यांची सावली, आकार, काठी, चष्मा, बकरी, चरखा, गांधी टोपी, खादीचे वस्त्र अशा अनेक वस्तु त्यांची ओळख बनले आहेत.
वैश्विक इतिहासातून कधीही न पुसले जाणारे महात्मा गांधींचे असामान्य व्यक्तिमत्व महामानवाच्या रुपात प्रतिस्थापित आहे. त्यांचा केवळ जनमानसावरील प्रभाव नाही तर त्यांच्या नैतिकतेची, तत्वांची ताकदच इतकी आहे की त्यांच्या काळानंतरसुद्धा ते आज सर्वांना आकर्षित करत आहेत.त्यांचे व्यक्तिमत्व आणि विचारांमध्ये शाश्वत मूल्यांची देणगी आहे जे अखिल मानव- समाजासाठी आलोकस्तंभ आहेत. हिंसेचा प्रतिकार प्रेम आणि शांततेच्या मार्गाने करणे, विपरीत परिस्थितींच्या सामंजस्यासाठी परस्पर संवादाचे महत्व, माणसातील चांगुलपणावर प्रगाढ निष्ठा आणि हृदय- परिवर्तनावर विश्वास, समाजाच्या नैतिक विकासासाठी हिंस्त्रपणाचा त्याग करणे – ही त्यांची अशी काही जीवनमूल्ये आहेत की जी प्रत्येक देश, प्रत्येक समाज आणि प्रत्येक काळात निश्चित दिशा देऊ शकतात.

महात्मा गांधी आधुनिक काळातील असे लोकनायक आहेत जे अनेक पौराणिक, ऐतिहासिक व्यक्तिमत्व, महापुरुष, दंतकथांच्या नायकांना मागे टाकून पुन्हा समाज- जीवनात परतत आहेत. गांधींच्या प्रतिमा, मूर्ती, शिल्पे, छायाचित्रे, पुस्तकेन, संग्रहालये, प्रदर्शने, अनेक भाषांमधील नाटक हे सर्व एक मुखाने गांधींची कालातीतता प्रकट करते. महात्मा गांधींना नव्या रुपात प्रस्तुत करणारी विधू विनोद चोपडा यांचा “लगे रहो मुन्नाभाई” सिनेमाचा उल्लेख इथे केलं पाहिजे. ज्यानी गांधीवादापेक्षा गांधीगिरी हा हा नवा शब्द आपल्याला दिला आणि सर्वांत महत्वाचं म्हणजे गांधीवादाला पाखंड बनवणार्या प्रवृत्तीवर कठोर व्यंग करतो. गांधीगिरी आणि या फिल्मच्या या प्रभावामुळे अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांनी विनम्रतेच्या मार्गातून आपल्या अधिकाऱ्यांना समस्यांवर उपाय शोधण्यासाठी भाग पाडले. महात्मा गांधींच्या विचारांचा प्रभाव असलेली अशी अनेक उदाहरणे समाजात पहावयास मिळतात. जसे की- उत्तर प्रदेशातील साठ वर्षीय दयाराम सिंह यांनी गांधी तत्वांचे अनुसरण करत गावातील पाणी, रस्ते, आरोग्य इ. विषयक गरजांची पूर्तता केली. भारतातील भ्रष्टाचाराच्या विरोधात अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांनी महात्मा गांधींच्या दांडी यात्रेपासून प्रेरणा घेऊन २४ मैल यात्रेचे आयोजन केले होते. इजिप्तमध्ये २०११ मध्ये लोकांनी म. गण व मार्टिन ल्युथर किंग यांच्या विचारांनी प्रेरित होऊन अन्यायी सरकारविरोधात अहिंसेच्या मार्गाने आवाज उठवला.

येरवडा कारागृहातील एक हत्या करणाऱ्या, कैदी नंबर तेरा- संतोष भिंताडे नावाच्या एका युवकाने नारायणभाई देसाई यांच्याकडून गांधी-कथा ऐकल्यानंतर आपले संपूर्ण जीवन गांधी- विचाराच्या प्रसारासाठी समर्पित केले आहे आणि विपुल साहित्य- लेखन करत आहे.

तो आज गांधी रिसर्च फौंडेशनचा लीडर बनला आहे. येरवडा कारागृहातील हा कैदी तेथील इतर अनेक कैद्यांकडून रचनात्मक कार्य करवून घेत आहे. “गुन्हेगार व्यक्तीला रुग्णाप्रमाणे वागवले पाहिजे आणि त्याची मानसिकता बदलली पाहिजे”- गांधींचे हे शब्द आज सत्य होताना दिसतात. शत्रू आणि नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण हे अशाच प्रकारचे म्हणता येईल.

पाकिस्तानच्या स्वात प्रदेशात मलाला युसुफजाई नामक पंधरा वर्षांच्या मुलीने संयुक्त राष्ट्रसंघामध्ये म. गांधींना आपले आदर्श म्हणून सांगणे हे सुद्धा विशेष महत्वाचे आहे. याशिवाय अफगाणिस्तान, इराक, लिबिया, सीरियाच्या अनेक अनुभवांमधून आणि वर्तमान काळातील या अनेक घटनांमधून हे सिध्द होते की म. गांधींचे विचार मनुष्य जातीसाठी कल्याणकारी आहेत. या दृष्टीकोणातून महात्मा गांधी प्रत्येक काळात आणि समाजात कालातीत राहतील, यात दुमत नाही.

आज जिथे संपूर्ण जग हिंसा, भय, युद्धाने ग्रासले आहे शिवाय अतिभौतिकता, भ्रष्टाचार आणि नैतिक पतनाच्या भयावह वातावरणात जगणे अपरिहार्य झाले आहे त्यावेळी महात्मा गांधींचे स्मरण होणे सहज- स्वाभाविक आहे. हे महत्वाचे आहे की मार्टिन ल्युथर किंग,नेल्सन मंडेला, मदर तेरेसा, बाबा आमटे एवढेच नाही तर अण्णा हजारे यांच्या सारख्या व्यक्तिमत्वांची उदाहरणे देता येतील, ज्यांनी गांधी तत्वांवर आपले आयुष्य जगले आणि जगत आहेत, संघर्ष करत आहेत. त्यामुळे गांधी तत्वे काळोखातसुद्धा जिवंत आहेत आणि भविष्यातही जिवंत राहतील. भौतिक आणि आर्थिक विकासाच्या स्पर्धेमध्ये त्यांचे संपूर्ण जीवन, तत्वे, अठरा सूत्री कार्यक्रम हे शाश्वत सिद्धांतावर, नैतिकतेवर आधारित आहेत, जे समाजाच्या स्थायी परिवर्तनासाठी प्रेरित करतात.
असं विशाल औदात्य लाभलेल्या महात्मा गांधींचे मुळातच संपूर्ण जीवन संघर्षपूर्ण आणि नाट्यपूर्ण घटनांनी भरलेले आहे. त्यांच्या आयुष्यातून नथुराम गोडसेला वजा करणे शक्यच नाही. महात्मा गांधी आणि नथुराम गोडसे ही दोन नावे एकत्र येताच अनेक विवाद, प्रश्ने, मत-मतांतरे, गांधी- हत्या, त्याची अनेक कारणे, त्याकाळातील परिस्थितीचे एक स्पष्ट-अस्पष्ट, गूढ, अनाकलनीय चित्र उभे राहते. नथूरामची हिंदू, हिंदुत्व, धर्म, राष्ट्र, राष्ट्रीयता इत्यादींबद्दलची स्वतःची वेगळी भूमिका, वेगळे विचार होते. अखंड भारताची झालेली फाळणी, भारतीय नेत्यांनी व गांधींनी काही प्रसंगी घेतलेले निर्णय, त्यांची राजकीय भूमिका आणि दृष्टी, त्याकाळातील सामाजिक आणि राजकीय परिस्थिती, झालेल्या दंगली, भारतीय जनमानसावर झालेला या सर्वांचा परिणाम आणि शेवटी झालेली गांधी हत्या …… या सर्वांमुळे भारत भरडून निघाला होता. एक नवा देश म्हणून जन्म झालेल्या भारताचा अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न सुरुवातीलाच असा अडखळत झाला होता…….. भारताने आपली सर्व परिस्थिती सावरली तरीही गांधी आणि गांधी – हत्येचा विवाद आजतागायत आहे. हे मात्र नाकारता येत नाही की गांधी पहाडासारखे आजही उभे आहेत.
महात्मा गांधींनी शांतता आणि प्रेम या मार्गांमधूनयश मिळवले त्यामुळे जगभरात ते कौतुकाचा विषय बनले आहेत आणि त्यांच्या अनेक वस्तु सुद्धा आकर्षणाचे केंद्र बनले आहेत. गांधींचे दक्षिण आफ्रिकेतील घर, त्यांनी लिहिलेली पत्रे, त्यांचे मृत्युपत्र, त्यांनी बनवलेले खाडीचे वस्त्र, त्यांच्या रक्ताचे केलेल्या परीक्षणाचे रिपोर्ट, अनेक नेता- कार्यकर्ता, इंग्रज अधिकाऱ्यांच्या बरोबरची छायाचित्रे, त्यांचा चष्मा, चरखा, त्यांच्या हत्येच्या ठिकाणची माती आणि गावात इ. अनेक वस्तूंवर अक्षरशः करोडो रुपये मिळणे…….. हे गांधींचे महत्वच दर्शवते.
साहित्य आणि कलेच्या प्रांतात देखील गांधी केंद्रीभूत आहेत आणि ते समाजाच्या धर्मबुद्धीला जागृत करत त्यांना नैतिकतेच्या मार्गाने कर्तव्यपूर्ती करण्यासाठी प्रेरणा देतात. गरज इतकीच आहे की गांधींची विभूतीपूजा, प्रतिमापूजा न करता त्यांच्या विचारांच्या योग्य मीमांसा करण्याची आणि अनुसरणाची, जी मनुष्याला अंतर्मुख करण्यात सक्षम आहे. खरंतर भारतातील अनेक भाषांमध्ये महात्मा गांधींवर मोठ्या प्रमाणात कविता, नाटके लिहिली गेली आहेत. असे असताना मराठीमध्ये प्रेमानंद गज्वी यांचे “गांधी आणि आंबेडकर”, प्रदीप दळवींचे चर्चित “मी नथुराम गोडसे बोलतोय”, अजित दळवींचे “गांधी विरुध्द गांधी”, आसक्तचे “महादेवभाई” अशा काही मोजक्या आणि महत्वाच्या नाटकांचा उल्लेख करता येईल. मी पीएचडी चे संशोधन करत असताना हिंदीमध्ये मात्र गांधींचे पात्र असलेली आणि त्यांच्या चरित्राचा उपयोग करून लिहिलेली अशी जवळपास तीस नाटके मिळाली यांशिवाय महात्मा गांधींच्या विचारांचा पूर्णपणे, प्रत्यक्ष प्रभाव असलेली १०० हून अधिक नाटके हिंदी भाषेमध्ये मिळाली. ही सर्व नाटके अत्यंत महत्वाची आहेत. एका नाटकाची चर्चा मात्र इथे वेगळी करावी लागेल. ते नाटक म्हणजे

“गोडसे @ गांधी.कॉम”.

हिंदीतील सुप्रसिध्द लेखक असगर वजाहत यांनी लिहिलेले “गोडसे @ गांधी.कॉम” हे नाटक २०१२ साली प्रकाशित झाले. यापूर्वी त्यांनी लिहिलेल्या “जिन लाहौर नईं वेख्या वो जन्म्या ई नईं” या नाटकाने रंगभूमी गाजवली आहे. असगर वजाहत यांच्या प्रतिभेने नेहमीच आपल्या साहित्यातून शाश्वत मूल्यांचे समर्थन केले आहे. “गोडसे @ गांधी. कॉम” हे नाटक गांधी विचारांना केंद्रित ठेऊन लिहिले आहे. इतिहासाकडे ते अनेक दृष्टीनी पाहते. एक वेगळीच कल्पना आणि प्रसंग घेऊन महात्मा गांधी व गोडसेला नाटकामध्ये असगर वजाहत यांनी प्रस्तुत केले आहे. असे असले तरी ती काल्पनिक वाटत नाही, इतक्या सहजपणे- जिवंतपणे ती मांडली आहे.
या नाटकाच्या संदर्भात आणि एकूणच आज समाजात पसरत असलेल्या वैचारिक तेढेबद्दल मी असगर वजाहत यांना प्रश्न विचारला असता त्यांनी उत्तर दिले की हे नाटक अत्यंत गंभीर आहे, ज्यामध्ये भावनांपेक्षा विचारांवर अधिक जोर दिला आहे. त्यांना गांधी आणि गोडसेमध्ये संवाद होण्याची आवश्यकता वाटते. त्यांच्या मते गांधीवाद ही एक प्रक्रिया होती ……आदर्श, यथार्थ, कल्पना, धर्म व राजकारणात ये- जा करणारी ती एक जिवंत प्रक्रिया होती. याशिवाय गांधी, आंबेडकर किंवा इतर महापुरुष खर्या अर्थाने समाजात कधी येतील या प्रश्नाचे उत्तर देताना ते म्हणाले होते – “दोन प्रकारांनी ते समाजात परततील….. साहित्यामध्ये ते आले आहेत आणि त्यांची आवश्यकता स्थापित होत आहे तर समाजातदेखील ते नक्कीच परततील.” नाटककाराच्या या दृष्टीमुळे हे नाटक अत्यंत महत्वाचे आहे.
असगर वजाहत यांनी लिहिलेल्या या नाटकाचे दिल्ली, पटना, नोइडा, हैदराबाद, नैनिताल अशा ठिकाणी मंचन झाले आहे. महाराष्ट्रामध्ये मात्र हे नाटक अद्याप पाठ्य किंवा रंगभूमीच्या माध्यमातूनदेखील पोहचू शकले नाही याची खंत आहे. म्हणूनच या नाटकाचे भाषांतर मी लवकरच मराठीमध्ये आपल्या भेटीला आणत आहे. या नाटकातील काही अंशाचे भाषांतर रसिक वाचकांसाठी येथे प्रस्तुत करत आहे –

(रंगमंचावर अंधार. हळू-हळू प्रकाश पसरतो.)

उद्घोषणा – देशाच्या संसदेत विरोधी पक्षाचे नेते डॉ. राममनोहर लोहिया यांनी सरकारला
धारेवर धरत अशी शंका व्यक्त केली की राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि नथुराम गोडसे यांना एकाच वार्डमध्ये ठेवणे भयंकर होईल. नॅशनल हेराल्डचे संपादक चेलापती राव यांनी लिहिले की गांधी असं काहीतरी करणार आहेत जो त्यांच्या सत्याशी सर्वांत मोठा प्रयोग असू शकेल. संसद आणि वर्तमानपत्रांमधून होणारी चर्चा देशात अगदी गल्लो-गल्ली पोहोचली पण वार्ड नंबर पाचमध्ये सर्वांचे जीवन सामान्य गतीनेच चालत राहिले.
( रंगमंचावर प्यारेलाल, बावनदास, निर्मलादेवी आणि सुषमा येतात. सुषमा खूप अशक्त आणि आजारी दिसत होती. चेहऱ्यावर निराशा आणि उदासपणा आहे. निर्मलाबाई गोडसेकडे बारकाईने पाहते. ती दुधाचे भांडे गांधींच्या दिशेने पुढे सरकवत म्हणते… )
निर्मला– घे…… महात्मा दूध घे….. (गोडसेकडे पाहत प्यारेलालना म्हणते-) ह्यो त्योच हाय ना?……. ज्यान महात्म्यावर गोळी चालवली होती (कुणी काहीच बोलत नाही) दिसायला तर चांगला वाटतोय ……कशापायी मारायला चाल्ला होता महात्म्याला….. बघू की, किती जोर हाय त्याच्या अंगात !……(गांधींना उद्देशून) …… पन महात्मा तू बी लई येगळाच हायस………..स्वतःच्याच खुन्याबरोबर………
गांधी – (सुषमाला) ……बाई ….याला घेऊन जावा….. उद्यापासून तू दूध आण…..दोन ग्लास
आण…….
निर्मला – माजं तर नशीबच फुटलंय रं महात्मा…….सापालाच दूध पाजतेय.
(सुषमा निर्मलाबाईंचा हात धरून निघून जाते….)
गांधी – (प्यारेलालना) पत्र आणली ?
प्यारेलाल– आज पोतं मिळालंच नाही.
गांधी– पोतं?
प्यारेलाल– चार मण पत्रे आली आहेत तुमच्या नावाने.
बावनदास – ठीक आहे, तुम्ही जा सगळे.
(बावनदास आणि प्यारेलाल जातात.)
गांधी– (गोडसेला)……. क्षमा असावी…. अडाणी, न शिकलेली बाई आहे ती. पण मनाने चांगली आहे…… तुम्हाला उलट-सुलट बोलली म्हणून मी क्षमा मागतो.
गोडसे- नाही…. ती जे काही म्हणाली ते सत्यच आहे. देशातील अनेक सरळ- साध्या लोकांना
हे माहीत नाही की तू हिंदुविरोधी आहेस.
गांधी – काय म्हणतोस गोडसे ?
गोडसे– एक – दोन नाही तर शेकडो उदाहरणं दिली जाऊ शकतात….. सर्वांत महत्वाचं तर हे आहे की तू म्हणाला होतास की पाकिस्तान विभाजनाला तू सहमती दिली.
गांधी – गोडसे…… मी जे म्हटलं होतं ….ते सत्य आहे…. सावरकर म्हणाले होते की ते अखेरच्या श्वासापर्यंत पाकिस्तान विभाजनाचा विरोध करतील……. पण बघा …..मी जिवंत आहे. सावरकरही छान श्वास घेत आहेत. पण एक गोष्ट आहे गोडसे ……..
गोडसे – काय ?
गांधी – मी पाकिस्तान बनवण्याचा विरोध करत होतो आणि करतोच. मला हे उमजतं की ……पण मला हे सांग की सावरकर पाकिस्तानचा विरोध का करताहेत?
गोडसे – म्हणजे ?……मातृभूमीचे तुकडे……
गांधी – (बोलणं थांबवत….) ……सावरकर तर हे मानतात की ……त्यांनी लिहिलंय की मुसलमान आणि हिंदू दोन वेगवेगळ्या राष्ट्रीयता आहेत….असा विचार केला तर त्यांनी तर पाकिस्तानचे स्वागत करायला हवं होतं……
गोडसे – हे अशक्य आहे….. हा गुरुजींवर आरोप आहे…
गाँधी – सावरकरांचे पुस्तक “हिन्दू राष्ट्रदर्शन”…..मी पुण्यात जेलमध्ये असताना ऐकले
होते …..पहा…. जर तुम्ही कुणाला परकं मानलं आणि तो बाहेर निघून गेला तर काय
फरक पडणार आहे? आणि हो, फाळणीचे दु:ख तर मला आहेच. कारण मी हे तत्व
मानतच नाही की हिंदू आणि मुसलमान दोन वेगवेगळी राष्ट्रे आहेत.
गोडसे– जर तुम्ही पाकिस्तानच्या इतक्या विरोधात आहात तर तुम्ही पंचावन्न करोड रुपये
दिले जाण्याबद्दल आमरण उपोषण का केलं होतं ?
गांधी – “रघुकुल रीति सदा चली आई I प्राण जाए पर वचन न जाई ll” पाकिस्तान-
हिंदुस्तान असा काही प्रश्नच नव्हता. प्रश्न होता, तो वचन तोडण्याचा ……..
समजलं?……
गोडसे – तू तर स्वतःच्या आदर्शांच्या आड नेहमी मुसलमानांचे तुष्टीकरण केले आहे.
गांधी – दक्षिण आफ्रिकेमध्ये जे मी केले ते काही फक्त मुसलमानांसाठीच होते,अहमदाबादची आंदोलनं काय फक्त मुसलमानांसाठी होती का ? हरिजन उध्दार आणि स्वराज्याचे केंद्र फक्त मुसलमान होते का हो ?
हो, पण जेव्हा मुसलमान ब्रिटीश साम्राज्यवादाच्या विरुध्द खिलाफत चळवळीत उभा राहिलो तेव्हा मी त्यांना साथ दिली…….आणि मला याचा अभिमान आहे.
गोडसे – खिलाफत चळवळीत प्रेम आणि अखंड भारताची घृणा, हेच तुमचे तत्व-दर्शन होते…..
हिंदू राष्ट्रासाठी तुझ्या मनात कुठलीच सहानुभूती नाही.
गांधी – हिंदू राष्ट्र म्हणजे काय गोडसे ?
गोडसे – ते पहा समोर….. मानचित्र लावले आहे ….अखंड भारत….
(गांधी उठून नकाशा पाहतात.)
गांधी – गोडसे…. तुमचा अखंड भारत तो सम्राट अशोकाच्या साम्राज्याएवढेसुद्धा नाही….
तू अफगाणिस्तान तर सोडूनच दिला आहेस. …….ते क्षेत्र वगळलेलेच आहेत, जे आर्य
लोकांचे मूळ स्थान होते. तू तर ब्रिटीश इंडियाचा नकाशा टांगून ठेवला होता. यात
कैलास पर्वत नाही आणि मानसरोवरदेखील नाही.
गोडसे – बरोबर म्हणतोयस गांधी….. हे सर्व आमचं आहे.
गांधी – गोडसे…. तुझ्याही आधी आमच्या पूर्वजांनी म्हटलं होतं की “वसुधैव कुटुंबकम”…..
म्हणजे हे विश्वची माझे घर….कुटुंब….कुटुंबाच्या नियमांचे पालन करावे लागते.
—————————————————————–
(मंचावर अंधार)
(गायन)
उद्घोषणा – कागा सब तन खइयो, चुन चन खाइयो
दो नैना मत खइयो, पिया मिलन की आस ll
एकवीस वर्षांच्या हसणाऱ्या- खिदळणाऱ्या सुषमाच्या डोळ्यांखाली काळी वर्तुळे
झाली होती. तिचा ओजस्वी चेहरा काळवंडून गेला होता………..
तिच्या कपाळावर आठ्यांनीच घर बनवलय. तिचं खाणं- पिणं, झोपणं, उठणं….
सर्व कठीण झालंय. डोळ्यातलं पाणी तिची कहाणी सांगण्यासाठी पुरेशी आहे.
(मंचावर फक्त सुषमा बसली आहे. तिच्यावर प्रकाशझोत. अनेक प्रकारचे इफेक्ट्स
आपला प्रभाव दाखवतात.)
आपल्या मुलीची ही अवस्था निर्मलाबाईंना पाहवली गेली नाही. खरंतर ती
गांधींकडे रोज दोन ग्लास दूध घेऊन जायची आणि गांधी तिच्याकडे दुर्लक्ष करत.
एके दिवशी निर्मलाबाईंचा राग गांधींच्या हट्टाला येऊन धडकलाच. (हळू-हळू प्रकाश
येतो) गांधी प्रार्थना सभेत होते. भजन सुरु होतं. प्यारेलाल, बावनदास आणि
सुषमाशिवाय एक-दोन दुसरे कैदी ही भजन गात होते. निर्मलाबाई रागात उभी
उभी आहे. ती भजन गाऊ शकत नाहीये आणि भजनी मंडळातही बसली नाहीये.
भजन संपते.
निर्मलाबाई– महात्मा, आज मला तुझ्याशी एक बोलायचं आहे ……. झालंच तर सर्वांसमोर
बोलू की नंतर ?
गांधी – मी कुठली गोष्ट वैयक्तिक मानत नाही…… माझं संपूर्ण आयुष्य पुस्तकाप्रमाणे आहे
ज्यामध्ये फुलं आणि काटेसुद्धा आहेत……. पण तुला आज जे काही म्हणायचंय, मी
ते सांगू शकत नाही…… (सगळे रंगमंचावरून जातात.)……..की जेणेकरून मनापासून
मनापर्यंत पोहचेल.
निर्मला- हे बघ महात्त्मा, मी बुकं शिकली नाही….. तू तर सात समुद्राइतकं शिकलाय असं
म्हनत्यात.
गांधी – तू तुझं म्हणणं मांड.
निर्मला – तेच तर …..मला तुझ्यासारखं बोलायला नाई येत. पन ऐक, माज्या पोरीला जर काई झालं तर मी तुला सोडनार नाई.
गांधी – तू हे काय म्हणतेयस ?
निर्मला – आता माजं म्हननं तुला नाय तर कुनाला कळायचं?
गांधी – तुझी काय इच्छा आहे ?
निर्मला – बघ, माझ्या पोरीला काई झालं तर मी तुला सोडणार नाही.
गांधी – अरे झालंय काय ?
निर्मला – तुला सारं म्हाईत हाय …..तुझं तूच समजून घे …… म्या जाती आता.
( निर्मला निघून जाते. गांधी विचारात पडतात. प्यारेलाल येतात.)
गांधी – प्यारेलाल, नवीनला बोलवा.
प्यारेलाल – काय बापू ? नवीनला…..
गांधी – होय….. नवीनला …….
प्यारेलाल– पण का बापू ?
गांधी – तू….. सुषमाची स्थिती पाहतोयस…..
प्यारेलाल – पण तुमची तत्व……
गांधी – प्यारेलाल……सिद्धांत आयुष्याला सुंदर बनवण्यासाठी असतात …… कुरूप बनवायला नाही .
प्यारेलाल – ठीक आहे, तिला तार पाठवतो.
(प्यारेलाल उठून जातात. गांधी फेऱ्या मारू लागतात. त्यांच्या चेहऱ्यावर अस्वस्थता आहे.
गोडसे आत येतो.)
गांधी – एक विचारू का गोडसे ……
गोडसे – हो विचार……
गांधी – प्रार्थना सभेमध्ये तू का बसत नाहीस ?
गोडसे – साधी-शी गोष्ट आहे …… तुझ्या प्रार्थनेवर माझी काही आस्था नाही.
गांधी– श्रद्धा सुद्धा नाही ?
गोडसे – नाही…… मी हिंदू आहे….आणि हिंदू धर्मामध्ये आस्था आहे.
गांधी– तू मला हिंदू मानतोस ?
गोडसे – ( अस्वस्थ होऊन )….. हो, मानतो.
गांधी – बावनदासला हिंदू मानतोस ?
गोडसे – हे सगळं तू का विचारतोयस ?
गांधी– कारण जर तू या सगळ्यांना बरोबरीचे हिंदू मानलं नसतं तर तू स्वतः सुद्धा हिंदू नाहीस ? तू पहिल्यांदा देशाला लहान केलंस…..आता हिंदुत्वाला लहान करू नकोस.
हिंदू धर्माला इतकं संकीर्ण बनवू नकोस. इतरांना उदारता सांगण्यासाठी पहिल्यांदा स्वतः उदार झालं पाहिजे.
( बावनदास पाठीवर मोठी पिशवी घेऊन येतो. ज्यात गांधीना लिहिलेली पत्रे आहेत.)
बावनदास – चार ठो बोरा और है….. बापू, आणखी आणतो.
गांधी – थांबा बावनदास ……. उद्या आणखी पत्रे घेऊन या….. …… पाच मणभर पत्रे तर मी काही एका दिवसात वाचू शकणार नाही………….
———————————————————–

लेखिका मॉडर्न महाविद्यालय पुणे येथील हिंदी विभागप्रमुख असून हिंदी-मराठी कवी आणि अनुवादक आहेत.

(पूर्वप्रसिद्धी :पृथा दिवाळी २०१८ संपा-मोहिनी कारंडे)

 •  

गंगा वाचवणाऱ्या संतांना प्राण का गमवावे लागतात ?

 •  

अॅड.गिरीश राऊत

गंगेचे पावित्र्य जपण्यासाठी संत ज्ञान स्वरूप सानंद यांनी ११२ दिवस उपोषण करून प्राणत्याग केला. या आधी स्वामी निगमानंदांनी बलिदान दिले. आता फक्त ३६ वर्ष वयाचे संत गोपालदास यांनी २४ जूनपासुन चालू असलेल्या उपोषणात प्राण पणाला लावले आहेत. संत शिवदास हे त्यानंतर समर्पणासाठी तयार आहेत.

गंगा प्रदूषित होणे, तिचा प्रवाह अवरूध्द होणे, यामुळे भारतीय धार्मिक व अध्यात्मिक जनमन अस्वस्थ आहे. गंगा भारताच्या चिरंतन संस्कृतीचे प्रतीक आहे.

गंगा वाचवणाऱ्या संतांना प्राण का गमवावे लागतात ?
थोडे मागे जाऊ. १०० वर्षांपूर्वी स्वातंत्र्यलढयाला प्रेरणा देणार्या ‘वंदे मातरम्’ गीतात मातृभूमीचा ‘सुजलाम् सुफलाम्’ असा उल्लेख होता. ही स्थिती स्वातंत्र्य मिळाल्यावर पहिल्या दोन पंचवार्षिक योजनांच्या काळापर्यंत म्हणजे साधारण सन १९५५ पर्यंत टिकून होती. देश सुमारे दहा हजार वर्षांची कृषिप्रधानता राखून होता. स्वातंत्र्यलढ्याचे प्रतीक असलेला ‘चरखा’ अडगळीत गेला नव्हता. मातीला माणसाला व श्रमाला प्रतिष्ठा होती. स्वयंचलित यंत्राला व पैशाला प्रतिष्ठा नव्हती.

साठ वर्षांपूर्वीपर्यंत शुध्द पाण्याच्या नद्या दुथडी भरून वाहत होत्या. कोठल्याही नदी, झरा, ओढा, तलाव, विहिरीचे पाणी निःशंकपणे पिता येत होते. भूजल पातळी भूपृष्ठालगत होती. मान्सून हजारो वर्षांच्या वेळापत्रकानुसार पडत होता.
प्रत्येक गावात दोन ते तीन तलाव होते. पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष असलेल्या गावांची देशातील संख्या फक्त २५० होती. अगदी जैसलमेर, बिकानेर सारख्या अत्यंत कमी चार ते आठ इंच पावसाच्या प्रदेशातही पिण्याच्या पाण्याची स्वयंपूर्णता होती. शेतकरी मिश्र व फिरत्या पध्दतीने हजारो वर्षे पर्यावरणाशी जुळवुन घेतलेल्या, काळाच्या कसोटीवर उतरलेल्या, स्थानिक बीजांच्या आधाराने निश्चिंतपणे काळ्या आईच्या विश्वासावर शेती करत होते. शेतकर्याची आत्महत्या कल्पनेतही शक्य नव्हती. सागर, नद्या व इतर जलस्त्रोत मासळीने समृध्द होते. देशाच्या सुमारे ५० % क्षेत्रावर घनदाट अस्पर्श जंगल होते. टेकड्या, डोंगर व पर्वत जंगलांनी आच्छादलेले होते. ही स्थिती लक्षावधी, कोट्यावधी वर्षे टिकून होती. पट्टेवाल्या वाघांची सन १९४७ ला असलेली ४० ००० ही संख्या प्राणिमात्रांची विपुलता व समृध्द जैविक विविधता दाखवत होती.

तेव्हा धरणे नव्हती. बोअरवेल नव्हत्या. आज चित्र काय आहे ? हजारो धरणे आहेत, कालवे आहेत लाखो बोअरवेल आहेत व त्याचवेळी देशातील २ ७५ ००० पेक्षा जास्त गावांत पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष आहे. गेल्या ३५ वर्षांत लाखो शेतकर्यांनी आत्महत्या केली आहे. रोज सुमारे दहा शेतकरी आत्महत्या करत आहेत.

नद्या बारमाही होत्या व हव्या, बारमाही सिंचन नव्हे. बारमाही सिंचनाचा हट्ट केला की नद्या बारमाही राहत नाहीत. तसा प्रयत्न करणार्या शहरीकरण व प्रचंड बांधकामांचा हव्यास बाळगणार्या संस्कृत्या जसे की रोम, ईजिप्त, माया, इंका काही शतकांत नष्ट झाल्या. धरणे औद्योगिकरण व शहरीकरणाची पाण्याची प्रचंड राक्षसी गरज भागवण्यासाठी आली. हरित क्रांतीच्या चुकीच्या शेतीपध्दतीत रासायनिक खते कीटकनाशके बुरशी नाशके तणनाशके इ. मुळे पाण्याची गरज अनेकपट वाढली. त्यासाठी धरणे आली. ही जीवनाची गरज नव्हती. जीवनशैलीची वखवख व लालसा होती. ती जंगले बुडवून, नद्या अडवून जीवनाला नष्ट करत होती.

देशातील ९३ % नद्या पाणी पिण्यालायक नसलेल्या, प्रदूषित आहेत. घनदाट जंगल फक्त ४% उरले आहे. टेकड्या, डोंगर, पर्वत एकामागे एक तोडले जात आहेत. त्यावरील व इतरत्रचे जंगल नष्ट होत आहे. जंगल, डोंगर व मातीच्या थराचा नदीच्या उगमाशी व तिला बारमाही वाहते ठेवण्याशी संबंध आहे. नदी जमिनीवरून तसेच भूपृष्ठाखालून जमिनीमधुनही वाहते. वाहणे हा नदीचा धर्म आहे. त्यातून ती फक्त माणसाचे नव्हे तर अब्जावधी जीवांचे सृजन, पोषण करत आली. तिला अडवणारे, वळवणारे, तिचे पाणी काढून घेणारे धरण बांधणे हा अधर्म आहे. धारणा करतो तो धर्म. आज मानवजात व जीवसृष्टीची अनादीकाळापासून धारणा करणार्या नद्या धोक्यात आल्याने खरे धार्मिक जीवन जगणारे सानंदांसारखे ऋषि प्राणांची आहुती देत आहेत.

पण गंगा शुध्दिकरणाची योजना म्हणजे घाट बांधणे, सुशोभित करणे, निर्माल्य गोळा करणे, प्रेत टाकले जाऊ नये म्हणून स्मशानभूमी बांधणे अशी मर्यादित आहे. अशाने आतापर्यंत गंगा शुध्द झाली नाही. उलट काँक्रीटीकरण वाढले. गंगेच्या वा कोणत्याही नदीच्या उगमापासुन ते सागरात विलीन होण्यापर्यंत पाणलोट क्षेत्रासह विचार केला जात होता. परंतु औद्योगिकरणाच्या व त्यातही जागतिकीकरणाच्या काळात पृथ्वीव्यापी विचार आवश्यक ठरतो. गंगेच्या पाणलोट क्षेत्रातील लाखो कारखाने, उद्योग व शेकडो शहरे गंगेला प्रदूषित करतात. हे जगातील इतर भागांतील अर्थव्यवस्थेशी म्हणजे व्यापार व जीवनशैलीशी जोडलेले आहेत. या प्रदूषणाच्या मूळ कारणाकडे दुर्लक्ष करून छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष वेधले जाते.

गंगा शुध्दीकरणाची अपेक्षा करताना मलप्रवाह, रसायने, घातक विषारी द्रव्यांनी युक्त सांडपाण्यावर प्रक्रिया करणारी केंद्रे उभारणे, वाळू उपसा थांबवणे, वीजनिर्मिती केंद्र, धरणे, रस्ते इ. चे प्रकल्प रद्द करणे अशा मागण्या केल्या जातात. पण जर विकसित जीवनाची आधुनिक कल्पना मान्य केली तर सीमेंट, स्टील, वाळू वापरल्याशिवाय बांधकाम होणार नाही. मोटार, विमान, काँम्प्युटर, मोबाईल, टीव्ही, फ्रीज, ए सी, वाॅशिंग मशिन, इ. हजारो वस्तुंची निर्मिती करायची तर प्रदूषणकारी कारखाने होणार. त्यातील द्रव प्रदूषण नदीत सोडले जाणार. रासायनिक शेतीमुळे रसायने, कीटकनाशके, ट्रॅक्टर इ. बनणार. याचा तुकड्या तुकड्यांत विचार करता येणार नाही. हे आधुनिक जीवनशैलीचे कृत्रिम जाळे आहे. यातील फक्त द्रव प्रदूषण थांबवा म्हटले तरी त्याच वस्तुनिर्मितीत जेथून नदी उगम पावते व वाहती राहते त्या डोंगर व जंगलांचा नाश होतच राहणार. कुणाही संवेदनशील माणसाप्रमाणे हे संतदेखील मानव व इतर सजीव सृष्टीचा संबंध ( इकाॅलाॅजी ) लक्षात घेऊन शाश्वत विकास करावा असे म्हणतात. परंतु सत्य हे आहे की “भौतिक विकास हा शाश्वत असू शकत नाही. भौतिक विकास व शाश्वतता या परस्परविरूध्द गोष्टी आहेत.”

पृथ्वीवर फक्त पृथ्वीचीच पध्दत शाश्वत होऊ शकते. ती मानव जंगलात असताना व बर्याच प्रमाणात कृषियुगात शक्य होती. मात्र स्वयंचलित यंत्र, रसायने व ‘विनिमयाचे साधन’ ही चलनाची मर्यादा ओलांडणारे अर्थशास्त्र आल्यावर पृथ्वीविरोधी पध्दत सुरू झाली. दोन्ही पध्दती एकत्र असू शकत नाहीत.

यंत्र नसतानाही पिरॅमिडसारखी प्रचंड बांधकामे, शहरीकरण व त्यासाठी बारमाही सिंचनावर आधारित शेती करणार्या संस्कृती काही शतकांत नष्ट झाल्या. सुमारे २५० वर्षांपूर्वी खनिज ऊर्जास्त्रोत जाळून पाण्याची वाफ करून त्याच्या शक्तीवर चालणारे पहिले यंत्र पृथ्वीवर सुरू झाले तेव्हाच मानवजात व जीवसृष्टी नष्ट होण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. औद्योगिक अर्थव्यवस्थेच्या सूत्रधारांकडून हे सतत लपवले जात होते. परंतु परिस्थिती हाताबाहेर गेल्याने डिसेंबर २०१५ मधे सर्व राष्ट्रप्रमुखांकडून झालेल्या पॅरिस करारात *मानवजात वाचवण्यासाठी, पृथ्वीच्या सरासरी तापमानात उद्योगपूर्व काळाच्या तुलनेत होणारी २° से ची वाढ रोखणे हे उद्दीष्ट ठेवले गेले. यंत्राचे संकट मान्य केले.

आता ही वाढ फक्त पुढील पाच वर्षांत होणार आहे हे लपवण्याचा आटापिटा चालू आहे. मानव नैसर्गक पध्दतीने जगला असता तर ही वेळ आली नसती. हजारो वर्षांचे भारतीय कृषियुग सर्व गरजा पूर्ण करत शाश्वत होऊ शकत होते. पण काही पाश्चात्यांकडून आलेले व आपण स्वीकारलेले स्वयंचलित यंत्रयुग कधीही नाही.

खरेतर गंगा यमुना नद्यांच्या खोर्यांतील प्रदेश हा जगातील सर्वोत्कृष्ट सुपिक गाळाच्या प्रदेशांपैकी आहे. सुमारे ८ कोटी वर्षांपूर्वी अफ्रिका खंडाचा तुकडा आशिया खंडामधे शिरला. त्या प्रक्रियेत हिमालयाच्या पायथ्याशी दोन ते तीन हजार फूट खोलीची घळ निर्माण झाली. ही घळ पुढील लाखो वर्षांत गाळाने भरली. त्यातून कोठेही उंचसखलपणा नसलेले विस्तीर्ण गाळाचे सुपिक प्रदेश तयार झाले. दुर्दैवाने ही अद्भूत देणगी मिळाली असूनही ही माणसे निर्जिव औद्योगिकरणातून रोजगार मिळवण्यासाठी मुंबई, दिल्ली, अहमदाबादकडे धाव घेतात. जगण्यासाठी रोजगार हवा असा गैरसमज औद्योगिक व शहरी रचनेमुळे पसरला आहे. जगणे व रोजगार या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. जगणे पृथ्वीमुळे आहे. औद्योगिक रोजगार मात्र ही जगवण्याची पृथ्वीची क्षमता नष्ट करतो. काही दशकांपुरता आधुनिक मानवकेंद्री विचार चुकीच्या दिशेनेच जाणार. पृथ्वीकेंद्री जीवनकेंद्री शाश्वत विचार हा खरा विचार. मात्र तंत्रज्ञानातुन मिळालेल्या मोटार मोबाईल टीव्ही इ. वस्तुंमुळे एक मायावी जग तयार झाले आहे. त्यात माणुस खुळावला आहे. त्याची पृथ्वीवरील वास्तवाशी व निसर्गाशी फारकत झाली आहे.

गंगा, यमुना व उत्तरेतील इतर मोठ्या नद्यांचा उगम हिमालयात होतो. हिमालयाचे बर्फाचे आवरण गेल्या काही दशकांत वातावरण बदलामुळे होत असलेल्या तापमानवाढीमुळे सातत्याने घटत आहे. गंगोत्रीच्या आसपासचा व वरील बाजूचा विस्तीर्ण प्रदेश उघडा पडला आहे. मुसळधार पाऊस, ढगफुटीमुळे मातीचा थर झपाट्याने वाहून जात आहे. यामुळे गंगा व इतर नद्या उगमापासुन काळे, चाॅकलेटी रंगाचे पाणी घेऊन वाहत आहेत. धरणे या मातीने भरत आहेत. फुटत आहेत. याचा परिणाम उत्तराखंड व इतर दुर्घटनांमधे दिसत आहे. दि. १२ मे २०१३ रोजी पृथ्वीच्या वातावरणात प्रथम ४०० पीपीएम या कार्बनच्या धोकादायक पातळीची नोंद झाली. तेव्हापासुन पृथ्वीवर उष्णतेच्या लाटा अवकाळी अतिवृष्टी महापूर बर्फवृष्टी वादळे वणवे अशा अभूतपूर्व तीव्रतेच्या दुर्घटनांचे तांडव सुरू झाले. १५ जून रोजी ढगफुटी व दोन हिमनद्या वितळून घसरल्यामुळे झालेली केदारनाथची भयंकर आपत्ती ही याचाच भाग होती.

तापमानवाढ जगातील औद्योगिकरण शहरीकरणातुन उत्सर्जित होणार्या कार्बन व इतर घटकांमुळे होत आहे. कोठेही कोळसा जाळून वीज बनली, रिफायनरीत तेल शुध्दीकरण झाले, मोटार चालली, सीमेंट – स्टील बनले तरी हिमालयाचा बर्फ वितळतो आणि, कोठेही औद्योगिक जीवनशैली जगणार्या माणसांसाठी गंगेच्या पाणलोट क्षेत्रात चालणार्या उद्योगांमुळे रासायनिक प्रदूषण होते.

हे स्वातंत्र्यलढ्याला अपेक्षित नव्हते. स्वतंत्र भारताच्या राष्ट्रध्वजावरून चरख्याला हटवले गेले. ही पुढील अनर्थाची नांदी होती. ‘चरखा’ अहिंसक, शाश्वत, स्वतंत्र जीवनाचे प्रतीक होता. त्याला नाकारणे अज्ञान व न्यूनगंडामुळे होते व त्यामुळे यंत्रसंस्कृतीला श्रेष्ठत्व बहाल करण्याची चूक झाली. वंचना व अभाव म्हणजे दारिद्रय. ते नको होते. पण त्याची साधेपणाशी गल्लत केली गेली व साधेपणा हटवला गेला. ब्रिटिशांना घालवले पण त्यांची निसर्गविरोधी ऊर्जाग्राही जीवनशैली त्यांच्यापेक्षा जोमाने पुढे नेली गेली. हा स्वातंत्र्यलढ्याचा पराभव होता. हे जिंकून हरणे होते. आपण दांभिक बनलो. आपल्या मातृभूमीविरूध्द वर्तन करू लागलो. तिचे शोषण करू लागलो. निसर्गाबद्दलची संवेदनहीनता आज जनता व राजकारणी या आडात व पोहर्यात, दोन्हीत दिसत आहे.

औद्योगिकरणाच्या सूत्रधारांनी प्रसारमाध्यमे व शिक्षणाचा वापर करून, याला प्रगतीचा मुख्य प्रवाह म्हणून जगभरातील जनमानसात रूजवले. आपण या ‘बाजाराची अर्थव्यवस्था’, नावाच्या विकृतीला स्वीकारले व ज्यामुळे जगभरात संस्कृत्यांचा लोप झाला, त्या उपभोगवादी मार्गाकडे वळलो. आपल्या पूर्वजांनी नैसर्गिक उपभोग व उपभोगवाद यातील फरक ओळखला होता व उपभोगवाद टाळला होता. परंतु माणुस हे वासनांचे गाठोडे आहे हे प्रचलित पाश्चात्य अर्थशास्त्राचे गृहितक आहे. हे लक्षात न आल्याने त्यागावर आधारित असूनही ‘चिपको’ व ‘नर्मदा बचाव’ आंदोलने आकलनाच्या अंतिम टप्यावर पोचली नाहीत. येऊ घातलेले अरिष्ट समजले नाही. औद्योगिकरण, शहरीकरण व अर्थव्यवस्था यांच्याविरोधात उभे राहिले नाही. धरण हीच अवैज्ञानिक, मानवविरोधी, सजीवविरोधी, पृथ्वीविरोधी गोष्ट आहे असे या आंदोलनांनी ठामपणे म्हटले नाही. ‘यंत्र’ ही प्रगती आहे या गैरसमजामुळे अशी स्पष्ट भूमिका घेण्यात अडथळा आला. आज मानवाचे उच्चाटन होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. दि. ६ नोव्हेंबर २०१७ रोजी जर्मानीतील ‘बाॅन’ येथे झालेल्या युनोच्या वातावरण परिषदेत जागतिक हवामान संघटनेने तापमानवाढीने धोकादायक पातळी ओलांडल्याचे व तापमान आता वाढतच राहणार असल्याचे अहवाल स्पष्ट केले. तरीही धरणांना व औद्योगिकरणाला विरोध केल्यास, आपल्यावर ‘पर्यावरण अतिरेकी’ व ‘प्रगतीविरोधी’ असल्याचा शिक्का मारला जाईल असा गंड व अपराधीपणाची भावना दिसते. पृथ्वीची, जीवनाची व
नदीची बाजू घेण्यात अतिरेक, अधोगती व अपराध कसा ?

हा प्रश्न ‘भौतिक विकास’ की ‘अस्तित्व’ असा आहे. जनतेला व सरकारला विकास हवा व नद्याही हव्या. हा दुटप्पीपणा झाला. दोन्ही एका वेळी मिळणार नाही. संतांनी या ठाम भूमिकेत येणे जरूरीचे आहे. सरकारचाच नव्हे तर आंदोलकांचाही लोकानुनय बंद होण्याची व सत्य स्वीकारण्याची गरज आहे. कार्य जनतेचे आकलन व मानसिकता बदलण्यासाठीदेखील हवे.

गतवर्षी सन २०१७ मधे भारतात जगात सर्वाधिक २५ लाख माणसे वायुप्रदूषणाने मेली. हे वायुप्रदूषण मोटार, वीज, सीमेंट, स्टील, रासायनिक खते इ. च्या निर्मिती व वापरातून झाले. याचाच परिणाम म्हणून यावर्षी पृथ्वीच्या वातावरणात पॅरिस कराराने धोकादायक ठरवलेली सरासरी तापमानातील १•५° से ची वाढ होत आहे. तापमानवाढीच्या सध्याच्या अभूतपूर्व अशा प्रतिवर्ष ०•२० ° से ( एक पंचमांश अंश से ) वेगाने फक्त ३ ते ५ वर्षांत मानवजात वाचवण्यासाठीच्या २° से या मर्यादेचेही उल्लंघन होणार आहे. प्रश्न मानवजात व जीवसृष्टीच्या अस्तित्वाचा आहे. कार्बन उत्सर्जन या क्षणी शून्य करण्याची व नदी, सागर, जंगलांचे हरितद्रव्य वाढीला लागण्याची गरज आहे. औद्योगिकरण तात्काळ थांबवण्याची गरज आहे. यात गंगा असो की मिठी, जगातील सर्व नद्या वाचवणे अंतर्भूत आहे. साठ वर्षांपूर्वीची, काळाच्या कसोटीला उतरलेली भारतीय शेतीवर आधारलेली जीवनपध्दती परत आणणे हाच वाचण्याचा एकमेव मार्ग आहे. हवा पाणी व अन्न इतकीच आपली गरज आहे. वस्त्र चरखा व हातमाग, निवारा मातीची व कुडाची घरे व वाहतुक बैलगाडी व घोडागाडीतुन करणे हाच अस्तित्व टिकवण्याचा भारतीय संस्कृतीने दाखवलेला शाश्वत अहिंसक मार्ग आहे. यात कमीपणा नाही. उलट पृथ्वी व जीवनाप्रती आदर आहे. गंगा आणि हे चिरंतन भारतीयत्व अभिन्न आहे. त्याचे पुनरूज्जीवन मानवजातीला रक्षणाची दिशा दाखवू शकते.

कोट्यावधी वर्षे जेथे पाणी तेथे जीवन होते. पृथ्वीवर जीवसृष्टी पाण्याच्या आधारे निर्माण झाली व वाढली. म्हणून या संस्कृतीने पाण्यालाच जीवन म्हटले. पण स्वतःला आधुनिक म्हणवणारा, तंत्रज्ञानाचा अहंकार बाळगणारा माणुस म्हणू लागला की जेथे आम्ही असू तेथे पाणी हवे ( शहरीकरण ) व जे आम्ही करू त्यासाठी पाणी हवे ( औद्योगिकरण ). सृष्टी प्रसवणार्या पृथ्वीने करोडो वर्षे केले ते जलव्यवस्थापन होते. जे आजचा अडाणी आधुनिक माणुस अत्यल्प काळात फक्त स्वतःसाठी स्वार्थीपणे करत आहे ते जलविध्वंसन आहे.

जनतेसह नेते, नोकरशहा, उद्योगपती, बँकर, अभियंते इ. सर्वांनी समजून घ्यावे की ‘धरणांना भावी पिढ्यांची मंदिरे’ म्हणणारे जवाहरलाल नेहरू भाक्रा – नांगलच्या खर्या अनुभवाने व्यथित व अस्वस्थ झाले होते. त्यांनी मोठ्या धरणांबाबतची व विकासाच्या या मार्गाबाबतची त्यांची चिंता सन १९५८ च्या भाषणात व्यक्त केली होती. महात्मा गांधीजींनी ११० वर्षांपूर्वी लिहिलेल्या हिंद स्वराज्यात स्पष्ट म्हटले की, “यंत्रांमुळे युरोप उजाड झाला. हिंदुस्थानचेही तेच होईल.” टाॅलस्टाॅयना फ्रान्समधे बोलावले गेले. त्यांना कौतुकाने आयफेल टाॅवर दाखवला गेला. हा संत टाॅवरच्या पायथ्याशी उभा राहिला व त्याकडे वर पाहून म्हणाला की, “मी जगातील सर्वात ओंगळ व कुरूप गोष्ट पाहत आहे.”

औद्योगिकरणाचे खरे भयावह स्वरूप जगाला अजून कळले नाही. जेथे नैसर्गिक स्वयंपूर्ण विभाग टिकून असतील तर त्यांना मागास ठरवले जाते. त्यांना या प्रगतीच्या तथाकथित मुख्य प्रवाहात आणण्याची भाषा होते. आता निसर्गसमृध्द कोकणाला व ईशान्य भारताला या विध्वंसक प्रवाहात आणले जात आहे.

उपोषण करणार्या संतांनी मानवजात नष्ट होण्याच्या उंबरठ्यावर उभी असल्याने भारतीयांना व जगाला संयम व साधेपणामुळे चिरंतन टिकलेल्या ऊर्जाविरहित भारतीय जीवनपध्दतीचा सुटकेचा मार्ग दाखवण्यासाठी जगायला हवे. हा मार्ग ही भारतीय तत्वज्ञानाची जगाला दिलेली देणगी आहे. एकेकाळी ऋषिंनी पर्वतांना मातेच्या स्तनांची समर्पक उपमा दिली व पायाचा स्पर्श होत असल्याबद्दल क्षमा मागितली. आज हे पर्वत व भूमी तोडले उखडले जात आहेत. मनोरचनेतला हा बदल केवळ भारतीयच नव्हे तर मानवी संस्कृती व अस्तित्व नष्ट करत आहे.
कसेही करून ही यंत्रमानवी लाट परतवावी लागेल. हे निर्वैर अध्यात्मिक वृत्तीनेच होऊ शकते. उद्योगपती व त्याचा उद्योग या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. उद्योगपती व उद्योगात नोकरी करणारा कर्मचारी हा माणुस म्हणून पृथ्वीमुळे जगतो. जसे त्याचे पूर्वज हजारो लाखो वर्षे जगत होते. उद्योगामुळे नाही. आजही शहरातील सर्व माणसे इतर प्राण्यांप्रमाणे श्वास घेतात पाणी पितात अन्न खातात व त्यामुळे जगतात. ते पृथ्वी देते. उद्योग नाही. उलट उद्योग जीवनाला नष्ट करतो. पृथ्वी जीवन देण्यासाठी आहे. नोकरी देण्यासाठी नाही.
चरखा टिकणे हे भारत टिकणे होते. आज मानवजात टिकणे आहे. गंगा जपणे हे मानवासह जीवसृष्टी जपणे आहे. केवळ प्रतीकपूजा नको.

गंगेला वाचवणे व तापमानवाढीपासुन मानवजात व जीवसृष्टीला वाचवणे ही एकच गोष्ट आहे. ते प्रत्येक माणसासमोरील आव्हान आहे. त्याचे उत्तर प्रत्येकाच्या अंतरंगात आहे, पृथ्वीला मान्य असलेल्या आचरणात आहे. उत्तुंग हिमालय व प्राणदायिनी गंगेच्या प्रेरणेने व साक्षीने भारतीयांनी आपल्या साधेपणा व शहाणपणाच्या ठेव्यातून हे आव्हान स्वीकारले तर निगमानंद व सानंदांसारख्या संतांचे आत्मार्पण सार्थकी लागेल.

….

संबंधित बातमी..

योद्धा संन्यासी स्वामी सानंद यांचे गंगा निर्मळ-प्रवाही राहावी याकरिता लढताना बलिदान

हे सुद्धा वाचा..

भांडवलशाही : निसर्गाचे विनाशकारी शोषण करणारा एकमेव गुन्हेगार- अॅलन बाडिओ

 •  

सामाजिक -आर्थिक विषमता व शोषण असलेल्या समाजात शांतता निर्माण होऊ शकत नाही..

 •  

अनिल प्रकाश/अनुवाद – डॉ.प्रेरणा उबाळे

अनेक लोकांना गांधींचा मार्ग अव्यावहारिक वाटतो. मी जेव्हा शाळेत शिकत होतो तेव्हा गांधीजींची आत्मकथा (सत्याचे प्रयोग) वाचली होती आणि त्यामुळे मी खूप भारावून गेलो होतो. त्या वेळी मी त्यांची शिकवण प्रत्यक्ष आयुष्यात उतरवण्याचा प्रयत्न केला मात्र मी अयशस्वी झालो ; उपरोध आणि निराशा मिळाली. तेव्हा मलाही असे वाटू लागले होते की गांधींचा मार्ग कदाचित व्यावहारिक नाहीये. माझं किशोर मन समाज- परिवर्तनाची स्वप्ने घेऊन नव्या मार्गाच्या शोधात होते. १९६८-६९ चे वर्ष असेल. मी महाविद्यालयीन शिक्षणासाठी गावाकडून मुजफ्फरपुरला आलो होतो. तेव्हा मुजफ्फरपुर (बिहार) च्या मुशहारी विभागात आणि मुंगेर जिल्ह्याच्या सूर्यगड विभागात सशस्त्र नक्षलवादी आंदोलन मोठ्या प्रमाणात होत होते. नक्षलवाद्यांनी जेव्हा काही सर्वोदय कार्यकर्त्यांची हत्या करण्याचे मनसुबे व्यक्त केले आणि त्यांची लिस्ट प्रसिद्ध केली तेव्हा जयप्रकाश नारायण आपल्या पत्नी प्रभावती देवी यांच्यासह मुशहारी येथे पोहचले. त्यांची तरुण शांती सेना देखील आली. हे लोक अहिंसक क्रांतीचा संदेश देऊ लागले. तेव्हा मुजफ्फरपुरच्या भिंतीवर दोन प्रकारच्या घोषणा लिहिलेल्या असत. नक्षलवादी सशस्त्र क्रांतीमध्ये विश्वास असणाऱ्या लोकांची घोषणा असे- “खून खून पूंजीपतियों का खून”. आणि दुसरीकडे जेपी च्या तरुण शांतीची घोषणा असे- “जुल्म करो मत, जुल्म सहो मत”. त्यावेळी आमचे किशोर मन या दोन्ही प्रकारच्या घोषणांनी भारावून गेले होते. जयप्रकाश नारायण यांनी सशस्त्र संघर्षातील लोकांशी बोलणे सुरु केले. ते गावा-गावांमधून फिरू लागले आणि मूळ स्थिती पाहिली. त्यांनी अनुभवले की सामाजिक, आर्थिक विषमता आणि शोषण चालू असताना समाजात शांती निर्माण होणे शक्य नाही. परिवर्तनासाठी शांतीपूर्ण जन-आंदोलन आवश्यक आहे. मुशहारीच्या अनुभवाने जेपीला नवीन मार्ग मिळाला आणि त्यांनी “फेस टू फेस” नावाची पुस्तिका लिहिली. नवीन पिढीचे लोक हे पाहून आश्चर्य व्यक्त करतील की जेपीच्या त्या पुस्तिकेची भूमिका श्रीमती इंदिरा गांधी यांनी लिहिली होती. या पुस्तीकेने माझ्यासारख्या अनेक युवकांना भविष्यातील मार्ग दिसला. या प्रसंगाला आता इथेच विराम देऊ.

१९७७- ७८ मध्ये आम्ही गांधींचा खूप आदर करत असू. पण त्यांना क्रांतिकारी मानत नसू. मात्र जेव्हा सामाजिक वास्तव अनुभवयास मिळाले आणि मूळ संघर्षाशी लढू लागलो तेव्हा कळले की ज्या मार्गाने आपण जात आहोत तो तर गांधींचा मार्ग आहे. बिहारमध्ये जमिनीवर अशा जमीनदारांचा कब्जा होता जे स्वतः शेती करत नाहीत. बिहारमध्ये पूर्वापार चालत आलेली जातीयवादी मानसिकता आणि सामंतवादी शोषणाचा हा एक खूप मोठा आधार आहे. बिहारच्या आर्थिक प्रगतीमध्येही यामुळे अनेक अडचणी येत होत्या. स्वातंत्र्याच्या आंदोलनादरम्यान स्वामी सहजानंद सरस्वती यांनी भूमिहीन शेतकऱ्यांसाठी लढाई सुरु केली होती. समाजवादी आणि कम्युनिस्टांनीदेखील या लढाईमध्ये महत्वाची भूमिका बजावली. तेव्हा हे सर्व लोक काँग्रेसमधून स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये सहभागी होते. स्वातंत्र्यानंतरही पूर्ण बिहारमध्ये भूमी आंदोलन झाले पण जमीनीचे पुनर्वितरण अत्यंत कमी झाले. पूर्णिया जिल्ह्यामध्ये नक्षत्र मालाकर यांनी शोषक जमीनदारांच्या नाकी नऊ आणले होते. त्यावेळी भूमी आंदोलनाचा विरोध करणारे उपरोधाने हसत असत आणि म्हणत की “संपत्ती आणि जमीनीच्या वाटण्या होत राहतील, आम्ही- तुम्ही सोडून”. हे एक कटू सत्य आहे की त्या काळामध्ये भूमी आंदोलन करणाऱ्या मोठ्या नेत्यांनी आपल्या जमिनीपैकी थोडीशी सुद्धा जमीन भूमिहीन शेतकऱ्यांना दिली नाही. अपवाद फक्त जयप्रकाश नारायण होते. स्वातंत्र्याच्या खूप पूर्वी एकदा त्यांनी बिहारच्या गया जिल्ह्यातील भूमी आंदोलनाचे नेतृत्व केले होते. ते पहिल्यांदा आपल्या गावी गेले.त्यांनी आपली 200 एकर वंशपरंपरागत असलेली जमीन आपल्या गावातील ४०० भूमिहीन शेतकर्यांना दिली. त्यानंतरच ते भूमी आंदोलनाचे नेतृत्व करण्यासाठी गेले. ही गोष्ट १९७५ च्या सुरुवातीला या लेखकाला तिथल्या गावातील लोकांनी सांगितली होती. खूपशा नेत्यांच्या बोलण्या आणि वागण्यातील अंतर हेच खरेतर शेतकऱ्यांचे आंदोलन अयशस्वी होण्यामागचे मुख्य कारण आहे. विनोबा भावे यांच्या भूदान आंदोलनादरम्यान बिहारमध्ये जवळपास २२ लाख एकर जमीन दान म्हणून मिळाली होती. पण खूप कमी जमीन भूमिहीनांना मिळाली. बरीच जमीन नदी किंवा डोंगरावरची होती, काही नापीक होती.आजही लाखो भूदान शेतकरी असे आहेत की ज्यांना जमिनीचा तुकडा मिळाला पण भूदात्यांनी आपला अधिकार सोडला नाही. अशा स्थितीमध्ये १९६७ च्या आसपास पश्चिम बंगालच्या नक्षलवादी क्षेत्रामधून नक्षलवादी आंदोलन सुरु झाले होते जे नंतर बिहार आणि देशाच्या इतर भागात पसरले. परंतु देशाच्या गुंतागुंतीच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक व्यवस्थेला ते न समजू शकल्याने आणि त्यानुसार धोरण निर्माण न करण्यामुळे हे अत्यंत कमी प्रभाव निर्माण करू शकले आणि ते हळूहळू संपुष्टात आले. भारतीय समाज सशस्त्र आंदोलनाचा तणाव जास्त वेळ स्वीकारू शकत नाही. बिहारमध्ये मठ, मंदिरांच्या नावावर लाखो एकर जमिनीवर भूमिपतींचा अधिकार राहिला आहे. असाच एक मठ आहे – बोधगया येथील शंकर मठ. १९७८ मध्ये या मठाचे धनसुख गिरी हे महंत होते. पण मठाची खरी सत्ता मठाचे व्यवस्थापक जयराम गिरी यांच्या हातात होती. जयराम गिरी बिहार सरकारमध्ये धार्मिक न्यास मंत्री होते. मठाकडून त्यांना दूध पिण्यासाठी एक गाय दिली जात असे. या मठाच्या ताब्यात साधारणपणे १० हजार एकर जमीन २२ नकली ट्रस्ट आणि आणि ४४८ नकली नावांवर होती. भूमिहीन मजुरांचे ( जे भुइया जातीचे होते ) भयंकर शोषण होत होते. उदाहरण सांगायचे झाले तर कुणाची मुलगी किंवा मुलगा ८-१० वर्षांचा असेल तर त्याचा विवाह करून दिला जात असे. विवाहासाठी मठातून काही धान्य आणि पैसे मिळत असत. त्याबदल्यात मुलगा आणि मुलगी दोघांना मठाचे मजूर बनवले जायचे. शेतात दिवसभराच्या मेहनतीनंतर ३ शेर (कच्चे) म्हणजे साधारणपणे ४५० ग्राम धान्य मिळत असे. त्याबरोबरच अर्धा शेर (कच्चे) म्हणजे २२५ ग्राम भुशाचे मिश्रण असलेले सत्तू मिळत असत. याशिवाय महुआ विकत घेऊन दारू बनवण्यासाठी थोडे पैसे मिळत असत, ज्याला पियांकी म्हणत. तीव्र ऊन, पाउस किंवा कडाक्याच्या थंडीत दिवसभराच्या कठोर मेहनतीनंतर भुइया लोक मातीच्या भांड्यात घरी बनवलेली दारू पिऊन आपल्या पत्नीला आणि मुलांना मारहाण करत. आपल्यावर होत असलेल्या अन्यायावर किंवा शोषणावर विचार करण्याची त्यांची बुद्धीच नष्ट करून टाकली होती. प्रत्येक गावामध्ये मठाकडून भुइया जातीचा एक मांत्रिक ठेवलेला असे. जेव्हा एखाद्याच्या पोटात दुखू लागत असे, उलटी होत असे, कुणाला खूप ताप आला असेल तर याला बोलावले जाई. तो एक बाटली दारू आणि एक कोंबडा घेत असे आणि मग तो देवता किंवा भुताला खेळवण्याचे नाटक करत असे. तो सांगायचा की या व्यक्तीने मठाच्या जमिनीचे धान्य चोरले आहे. त्यामुळे याला देव किंवा भुताने पकडले आहे. असे सांगून मांत्रिक भुताला पळवून लावायचा. ….असं असायचं मठाच्या शोषणाचं चक्र.

अशा परिस्थितीत आम्ही लोकांनी जेव्हा ‘छात्र युवा संघर्ष वाहिनी’ आणि ‘मजूर शेतकरी आंदोलन समिती’ कडून मठाच्या भूशोषणाविरुद्धच्या आंदोलनाची तयारी सुरु केली तेव्हा गावामध्ये मीटिंग करणेदेखील कठीण असे. संध्याकाळी बैठक सुरु झाल्यावर लोक आपापसात भांडत असत. त्यामुळे मीटिंगमध्ये खंड पडत असे. अशावेळी दारूबंदीसाठी पहिले अभियान चालवणे गरजेचे आहे असे लक्षात आले. ज्या महिला आणि मुले दारूमुळे त्रस्त होते. ते एकत्रित आले आणि आपल्या मातीच्या घरांतून दारूचे हंडे काढून फेकू लागले. बोधगयाच्या शेजारील एका गावात मस्तीपुरमध्ये ज्या दिवशी हे सुरु झाले तेव्हा दारू पिणारे पुरुष आपल्या बायका-मुलांना मारू लागले पण हंडे फोडणे काही थांबले नाही. पाहता-पाहता हंडे फोडून दारूबंदीचा कार्यक्रम चालूच राहिला आणि शेकडो गावात तो चालू झाला. आमच्या मग असे लक्षात आले की गांधींच्या नशा बंदीच्या कार्यक्रमाला केवळ एक सुधारवादी कार्यक्रम म्हटले जायचे तो केवढा क्रांतिकारी सिद्ध झाला. जर दारूबंदी आणि मांत्रिकच्या अंधश्रद्धेला समाप्त करायचे हे सांस्कृतिक अभियान चालू झाले नसते तर शोषित लोक संगठीत होऊ शकले नसते आणि मठाच्या भूशोषणाला उखडून टाकून समाप्त करू शकले नसते.या शांततापूर्ण भूमी आंदोलनामध्ये १६७ खटले चालले. मोठ्या संख्येने लोक तुरुंगात गेले. अहिंसक प्रतिरोध करत रामदेव माझी आणि पांचू माझी हे गुंडांच्या पिस्तुलाने मारले गेले आणि अनेकजण जखमी झाले. पण शेवटी १० हजार एकर जमिनीवर भूमिहीन शेतकऱ्यांनी अधिकार मिळवला. नंतर सरकारने पुरुषांच्या नावे जमिनीची कागदपत्रे दिली. ही सरकारी कागदपत्रे या अटीवर परत केली गेली की महिलांच्या नावे दिली गेलेली पत्रेच स्वीकारली जातील. काही दिवसांच्या संघर्षानंतर सरकारने प्रत्येक महिलेच्या नावावर जमिनीची कागदपत्रे दिली. बालवयात होणाऱ्या विवाहांवर बंदी आली. नंतर या आंदोलनाचा प्रभाव इतका झाला की पूर्ण जिल्ह्यातील भूमिहीन शेतकऱ्यांनी साधारणपणे १५ हजार एकर जमीन मोठ्या भूमिपतींच्या ताब्यातून सोडवली. या भूमी सत्याग्रहाच्या दरम्यान हेदेखील लक्षात आले की, जातींची विविधता असणाऱ्या आपल्या समाजात अहिंसापूर्ण संघर्षाचा मार्ग अत्यंत व्यावहारिक आहे. आज पूर्ण जग ग्लोबल वॉर्मिंगला तोंड देत आहे. निसर्गाची सुंदरता त्याच्या वैविध्यामध्ये आहे. भौगोलिक विविधता, हवामानाची विविधता आणि जैविक विविधता यांवर निसर्गाचे अस्तित्व टिकून आहे. निसर्गाशी जेव्हा प्रतारणा सुरु होते तेव्हा त्याचे रौद्र रूप प्रकट होते. गांधीजींनी याचा इशारा खूप आधीच दिला होता. भारताच्या शेकडो जाती, धर्म, समुदायांच्या रंग-रूपाच्या वैविध्यतेमध्ये निसर्गाची सुंदरता आणि शक्ती समाविष्ट आहे. ज्यांना हे कळत नाही ते एका रंगात रंगून जाण्याचा बालीश प्रयत्न करत आहेत. पण आशा ठेवली पाहिजे की लोकांनीच जागे होऊन देश आणि समाजाला अधोगतीकडे जाण्यापासून वाचवले पाहिजे.

(नवजीवन.कॉम वर प्रकाशित लेखाचा अनुवाद )

………………………………………………………………हे सुध्दा वाचा…

..जागृत अज्ञानी जनतेचा असंतोष मजबूत बळाची सत्तासुद्धा रोखू शकणार नाही- महात्मा गांधी

 •  

ऐतिहासिक शेतकरी आंदोलनाला १०० वर्षे पूर्ण – आजही परिस्थिती जैसे थे”

 •  

सौरभ वाजपेयी,दिल्ली.

इसवी सन १९१७ मध्ये महात्मा गांधी यांनी आपले पहिले आंदोलन कृषी आणि शेतकऱ्यांच्या समस्यांसंदर्भात व चंपारण येथील सत्याग्रहाने सुरु केले होते  आणि आज १०० वर्षांनंतरही देशासमोर पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या समस्या मोठे चिंतेचे कारण बनल्या आहेत ही योगायोगाची गोष्ट आहे .  शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागण्या आणि आंदोलने वेगाने देशातील सगळ्या राज्यांमध्ये पसरत आहेत. शिवाय शेतकऱ्यांच्या आत्महत्यांशी संबंधित मुद्देदेखील शासनावर परिणाम करत आहेत. विरोधी पक्षाने  अगदी स्पष्टपणे संकेत दिले आहेत की ते सन २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांच्या मुद्द्यांसह उतरणार आहेत. मोदी  सरकारदेखील उर्वरित काळात शेतकऱ्यांच्या संदर्भातील मुद्दे लागू करण्याचा प्रयत्न करेल. सूत्रांच्या माहितीनुसार संघानेही शासनाला शेतकऱ्यांचे मुद्दे गंभीरपणे सोडवण्याचा प्रयत्न करण्यास सांगितले आहे . या काही बातम्यांशिवाय दोन दिवसांपूर्वी आलेल्या एका बातमीने आणखी एका संकटाची चाहूल दिली. सलग तीन वर्षे दुष्काळामुळे विविध समस्यांना तोंड देणाऱ्या कृषी क्षेत्राला या वर्षीच्या तुलनेत कमी उत्पन्न मिळाले. भाजपने उत्तर प्रदेश, महाराष्ट्रात शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन जखमेवर मलम लावण्याचा प्रयत्न केला  त्यानंतर आता राजस्थान आणि मध्य प्रदेशात याची अधिक मागणी होऊ लागली आहे.

१०० वर्षांपूर्वी चंपारण येथील महात्मा गांधींच्या शेतकऱ्यांच्या पहिल्या आंदोलनाकडे  पाहता तेव्हाही असे मुद्दे समोर आले होते असे दिसते  आणि जे आजही आहेत. शेतकऱ्यांना त्यावेळी अधिकार नव्हते आणि आजसुद्धा हाच सर्वांत महत्वाचा मुद्दा बनून समोर आला आहे. शेतकऱ्यांच्या वाईट अवस्थेमुळे देशाच्या अन्न उत्पादनावर मोठा प्रभाव पडत आहे. कमीत- कमी आधारभूत मूल्यांच्या  संदर्भात शासनावर दबाव आहे. नोटबंदी व जीएसटी नंतर ग्रामीण अर्थव्यवस्थेवर  होत असलेल्या परिणामांमुळे शेतकऱ्यांपुढे नवीन संकट उभे राहिले आहे.

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार शेतकऱ्यांच्या स्थितीला कोणतीही पार्टी किंवा सरकार नाही तर त्यांची सततची होत असलेली उपेक्षा जबाबदार आहे. त्यामुळे स्वतः शेतकरीदेखील सुधारणा होण्याची आशा सोडून देत आहेत. चार वर्षांपूर्वी आपल्या देशात शेतकऱ्यांची परिस्थिती जाणून घेण्यासाठी सी एस डी एस आणि “लोकनीती” ने एक फील्ड रिसर्च केला होता त्यातील आकडे डोळे उघडणारे होते. त्यामुळे फक्त शेतकऱ्यांची आर्थिक स्थितीच लक्षात लक्षात आली नाही तर त्यांच्या नाईलाजाची स्थितीसुद्धा समोर येत होती

हा सर्वे १८ राज्यांमधील पाच हजाराहून अधिक शेतकऱ्यांमध्ये जाऊन करण्यात आला होता.  या सर्व्हेमध्ये सहभागी ६२ टक्के लोकांनी असे सांगितले की  ते शेती सोडून देतील.त्याचवेळी २६ टक्के लोकांनी याला नकार दिला. १२ टक्के लोक काही सांगण्याच्या स्थितीत नव्हते. ३६ टक्के लोकांनी म्हटले की आता त्यांना शेतीत काहीच आवड राहिली नाही. शेतकऱ्यांनी सदर पंचवार्षिकी च्या संदर्भाने  दुष्काळ,पूर, अल्प उत्पादन, सिंचनाची वाईट अवस्था, अल्प उत्पन्न आणि शासनाचा हातभार नसणे इत्यादी समस्या सांगितल्या होत्या.  या अहवालानुसार  या स्थितीत बदल झाले नाहीत तर शेतीची आवड नष्ट होण्याची गती आणखी वाढत जाईल व याचा थेट परिणाम आपल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेवर होईल.

 “गांधी असते तर त्यांच्यासाठी शेतकरी सर्वांत मोठा मुद्दा असता” –

आज शेतकऱ्यांच्या समस्यांकडे गांधीवादी दृष्टीकोणातून पहिले तर  परिस्थिती अत्यंत निराशाजनक आहे. स्वातंत्र्यापूर्वी ब्रिटीश शासनाने भारताच्या कृषिप्रधान अर्थव्यवस्थेला उद्ध्वस्त केले. सामान्य शेतकरी नेहमी दुष्काळ आणि उपासमार यांच्या सीमेवर उभा असे. गांधीजींच्या नेतृत्वाखाली या शेतकरी वर्गाने ब्रिटीश शासनाविरोधात मोठे आंदोलन उभे केले होते. स्वतंत्र भारतात हेच शेतकरी राजनैतिक पक्षांसाठी सर्वांत मोठी वोट बँक बनली. मात्र ते आज कोणतेही शासन किंवा राजकीय पक्षाविरुद्ध एकही शब्द बोलू शकत नाहीत. जागतिकीकरण आणि उदारीकरणानंतर अर्थव्यवस्थेमध्ये शेतकऱ्यांचे महत्व कमी होऊ लागले. आंतरराष्ट्रीय दबावामुळे शासनाने असे समझोते केले. त्यामुळे संरक्षणामध्ये सतत काही त्रुटी येत आहेत. शेतीतील होणाऱ्या नुकसानाचा सामना करण्यासाठी शेतकरी नगदी पिकांकडे   आकर्षित होत आहेत. नगदी पिकांमध्ये असलेल्या मोठ्या गुंतवणुकीमुळे ते कर्जाच्या जाळ्यात अडकून आत्महत्या करण्यासाठी विवश होत आहेत. आज जर गांधी असते तर कदाचित त्यांच्यासाठी हा सर्वांत मोठा राजकीय मुद्दा ठरला असता. शिवाय त्यांनी शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती करण्यासाठी प्रोत्साहन देऊन शासनावर कमीत कमी अवलंबून राहण्याचा सल्ला ही दिला असता.

 मूळ हिंदी लेखाचा अनुवाद : – डॉ. प्रेरणा उबाळे

 

शेती प्रश्नाचे अभ्यासक देविंदर शर्मा यांचा लेख  

शहरी इंडिया आणि ग्रामीण भारत यात मोठी तफावत का आहे ?

आंदोलन वार्ता..↵↵ बुलेट ट्रेन च्या सर्व्हेसाठी आलेल्यांना शिलटे गावातील आदिवासी ग्रामस्थांनी हाकलले.

IMG-20181009-WA0007.jpg

 

प्रासंगिक↵↵   … तर जागृत,अज्ञानी,जनतेचा असंतोष मजबूत बळाची सैनिकी सत्तासुद्धा रोखू शकणार नाही – म.गांधी

 

 

 

 •  

… तर जागृत,अज्ञानी,जनतेचा असंतोष मजबूत बळाची सैनिकी सत्तासुद्धा रोखू शकणार नाही – म.गांधी

 •  

By Aasantosh Team

आधुनिक भारतातील  शेतकरी आंदोलनाच्या अग्रणींपैकी  एक प्राध्यापक एन जी रंगा स्वतः एका शेतकऱ्याचे पुत्र होते. त्यांनी गुंटूर ग्रामीण विद्यालय ते ऑक्सफर्ड मधून अर्थशास्त्राचे शिक्षण पूर्ण केले . जेव्हा ते गांधीना भेटत तेव्हा त्यांना ते प्रश्न विचारून हैराण करीत असत आणि कधी कधी लांबलचक पप्रश्नावली ते गांधीना आधीच पाठवून देत असत.१९४४ साली गांधी जेव्हा तुरुंगातून बाहेर पडले तेव्हा प्राध्यापक रंगा प्रश्नांची झडी घेऊन गांधींना भेटण्यास पोचले. २९ ऑक्टोबर  ,१९४४ ला झालेल्या या मुलाखतीचा प्रश्न फार तीक्ष्ण होता.

“ तुम्ही म्हणता कि हि धरती शेतकऱ्यांची आहे किंवा असली पाहिजे. याचा अर्थ फक्त कसेल त्या जमीनीवर त्याची मालकी असेल कि ज्या राज्यात तो राहतो तेथील राजकीय सत्ता सुद्धा त्याच्या ताब्यात असेल. जर शेतकऱ्यांजवळ फक्त जमीन असेल आणि राजकीय सत्ता नसेल तर त्यांची स्थिती वाईट होईल जशी सोव्हियत रशिया मध्ये आहे.तिथे राजकीय सत्तेवर सर्वहारा हुकुमशाहिने एकाधिकार स्थापित केला परंतु जमिनीच्या सामुहीकीकरणाच्या परिणामी शेतकरी आपल्या जमीन अधिकारापासून वंचित झाले आहेत.

गांधीनी उत्तर दिले,” सोव्हियत रशियात काय झाले आहे ते मला माहित नाही मात्र जर आपल्याकडे लोकशाही स्वराज निर्माण झाले तर आणि अहिंसक पद्धतीने स्वातंत्र्य मिळविले तर असे होईल सुद्धा ! त्यात शेतकऱ्यांच्या हाती राजकीय सत्तेसोबतच सर्व प्रकारची सत्ता असेल.

नोव्हेंबर १९४७ मध्ये कुणीतरी गांधीना पत्र लिहून भारताच्या तत्कालीन मंत्रीमंडळात कमीतकमी एक शेतकरी असण्याची गरज व्यक्त केली होती. २६ नोव्हेंबर च्या प्रार्थना सभेत गांधीनी या गोष्टीस उत्तर देताना सांगितले कि,” आपल्या दुर्दैवाने आपला एक हि मंत्री शेतकरी नाही.सरदार (पटेल) जन्माने शेतकरी आहेत,शेती विषयाचे जाणकार आहेत मात्र पेशाने ते वकील राहिले आहेत. जवाहरलालजी विद्वान आहेत,मोठे लेखक आहेत मात्र शेतीविषयी त्यांची समज काय ! आपल्या देशात ८० टक्के जनता शेतकरी आहे.खऱ्या लोकशाहीत सत्ता शेतकऱ्याची असली पाहिजे.त्याकरीता त्यांना वकील असण्याची गरज नाही.चांगले शेतकरी असणे,उत्पादन वाढविणे,जमिनीची मशागत कशी करता येईल याचे ज्ञान असण्याची गरज आहे. असे योग्य शेतकरी मिळाले तर मी जवाहरलालजीना सांगेन कि तुम्ही त्यांचे सेक्रेटरी व्हा. आपला कृषिमंत्री महालात राहणार नाही. तो मातीच्या घरात  राहील,दिवसभर शेतात काम करील तरच शेतकऱ्यांचे राज्य येऊ शकते.

त्यांच्या  मृत्यूच्या  एक दिवस आधी झालेल्या प्रार्थना सभेत गांधीजी म्हणाले होते. “ माझे चालू दिले गेले तर आपला गवर्नर जनरल हा शेतकरी असेल. मोठा वजीर हि शेतकरी असेल. इथला राजा शेतकरी आहे. मला बालपणी एक कविता शिकविण्यात आली आहे कि “ हे शेतकऱ्या ! तू बादशहा आहेस “ त्याने जमिनीतून पिकवले नाहीच तर आम्ही काय खाणार आहोत ? हिंदुस्तान चा खरा राजा तोच आहे. परंतु आज आम्ही त्याला गुलाम करून टाकले आहे. आज शेतकऱ्याने काय केले पाहिजे ? एमए व्हावे ? बीए व्हावे ? असे झाले तर तो संपून जाईल मग तो कुदळ पण चालविणार नाही. शेतकरी प्रधानमंत्री झाला तर शेतकऱ्यांची स्थिती बदलू शकते.आज जे सडत चालले आहे ते उरणार नाही.

आज शेतकऱ्यांची जी गंभीर स्थिती आहे. गरीबी वाढत चालली आहे. बिलियनर्स वाढत चालले आहेत.शेतकऱ्यांची आंदोलने होताहेत अशा स्थितीच्या संदर्भाने  गांधीनी भांडवलदारांना यंग इंडिया च्या ५ डिसेंबर १९२९  च्या अंकात दिलेला ईशारा प्रासंगिक असा आहे.

             फक्त दोनच मार्ग आहेत ज्यातून आपल्याला एक निवडायचा आहे. पहिला हा कि भांडवलदारांनी आपली अतिरिक्त संपत्ती सोडून दिली पाहिजे जेणेकरून सर्वाना वास्तविक सुखाची प्राप्ती होईल आणि दुसरा हा कि वेळ राहता भांडवलदार जर हे समजून घेऊ शकले नाहीत तर करोडो जागृत,अज्ञानी,उपाशी जनता या देशात असा असंतोष निर्माण करील कि मजबूत बळ असलेली सत्तेची सैनिकी ताकत त्यांना रोखू शकणार नाही.

downloadfile.jpg

 •  

दिल्ली : बापू ! अन्नदात्यावर त्यांनी आज गोळीबार केला आहे. 

 •  

आज गांधी जयंती आहे. लालबहादूर शास्त्री यांचीही जयंती. गांधींच्या जयंतीला १५० वर्षे पूर्ण होताहेत त्याचा महोत्सव हे सरकार साजरा करते आहे. पश्चिम उत्तर प्रदेशातील शेतकरी आपल्या मागण्यासाठी शांतिपूर्ण मार्च करीत होते. ते आज राजघाट येथे पोचणार होते.गांधींना नमन करायला..सरकारला ते आवडलं नाही. दिल्ली-यूपी बॉर्डरवर बॅरिकेड च्या भिंती उभ्या केल्या गेल्या आणि सुरू झाला रक्तपात… देशाच्या सरकारने आज अन्नदात्याला गोळ्या दिल्यात. त्याही गांधी व शास्त्रीजींच्या जन्मदिवशी…सध्या फक्त फोटो पहा.. !
हे जालियनवाला बाग हत्याकांडाचे स्मृतीशताब्दी वर्ष आहे …

 •  

चरख्याचा स्वातंत्र्य आंदोलनाशी संबंध का व कसा आला ?

 •  

सुभाषचंद्र सोनार

चरख्याचा स्वातंत्र्य आंदोलनाशी संबंध असला तरी, चरख्याला स्वातंत्र्य प्राप्तीचं साधन म्हणून, कोणीही प्रोजेक्ट केलं नव्हतं. त्यामुळे चरख्याचा संबंध स्वातंत्र्य आदोलनाशी कधी व का आला, हे समजून घेणं गरजेचं आहे. तसे समजून घेतले तरच ना जाने कितने झूले फांसी, कितनों ने गोली खाई। क्यूं झूठ बोलते साहिब,
कि चरखा चलाने से आजादी आई॥ या काव्यपंक्तीमधला भंपकपणा आपल्या लक्षात येईल.

ना जाने कितने झूले फांसी,

कितनों ने गोली खाई।

क्यूं झूठ बोलते साहिब,

कि चरखा चलाने से आजादी आई॥

असा मिथ्या आणि दुष्प्रचार करण्यात फक्त मनुवादीच आघाडीवर नाहीत, तर परिवर्तनवादाचा बुरखा पांघरणा-या, तथाकथित परिवर्तनवादी संघटनासुद्धा, जराही पीछाडीवर नाहीत. सद्विचाराचे जसे कोणी ठराविक मक्तेदार नसतात, तसेच दुर्विचाराचेही कोणी ठराविक ठेकेदार नसतात.

‘चकाकणारी प्रत्येक वस्तु सोनं नसते,’ अशी म्हण आहे. वरील काव्यपंक्ती त्या म्हणीचीच आठवण करुन देतात. चमकदार व चटकदार गोष्टींची माणसाला पटकन भुरळ पडते. या काव्यपंक्तींचीही अनेकांना तशीच भुरळ पडली आहे. त्यामुळेच सोशल मिडियावर त्या अधूनमधून व्हायरल होताना दिसतात. इतकंच नव्हे तर, ट्रक्सच्या फाळक्यावरही मी त्या पाहिल्या आहेत.

चरख्याचा स्वातंत्र्य आंदोलनाशी संबंध असला तरी, चरख्याला स्वातंत्र्य प्राप्तीचं साधन म्हणून, कोणीही प्रोजेक्ट केलं नव्हतं. त्यामुळे चरख्याचा संबंध स्वातंत्र्य आदोलनाशी कधी व का आला, हे समजून घेणं गरजेचं आहे. तो समजून घेतला तरच, वरील काव्यपंक्तीतला भंपकपणा आपल्या लक्षात येईल. अन्यथा आम्हीही त्या बिनबुडाच्या ओळी, सुभाषितासारख्या उद़्धृत करत राहू, व लोकात गैरसमज पसरवत राहू.

गांधीजींनी १९२० ला असहकार आंदोलन सुरु केलं. या आंदोलनाबाबत त्यांचे अनेक सहकारी साशंक होते. पण प्रत्यक्षात मात्र या आंदोलनाला जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळाला नि साशंक मंडळीही विस्मयचकीत झाली. जनशक्तीचा हा सामुहिक आविष्कार बघून इंग्रज सरकारही मनातल्या मनात हबकलं.

दोन वर्ष अत्यंत शांततेने सुरु असलेल्या, या आंदोलनाला १९२२ साली, उत्तर प्रदेशातील चौरीचौरा येथे हिंसाचाराचं गालबोट लागलं. एका कार्यकर्त्याला पोलिसांनी केलेल्या मारहाणीमुळे, संतप्त आंदोलकांनी पोलिस स्टेशनला आग लावली व त्यात एका अधिका-यासह २१ पोलिस मृत्यूमुखी पडले.

आंदोलन सुरु करतानाच ते अहिंसात्मक असेल, असं गांधीजींनी नि:क्षून सागितलं होतं. परिणामी या घटनेने ते व्यथित झाले. गांधीजी समूहाचं मानसशास्त्र चांगलं जाणत होते. त्यामुळे अशा परिस्थितीत आंदोलन पुढे चालू ठेवणं म्हणजे, हिंसाचाराच्या मालिकांना निमंत्रण देणारं ठरेल व आंदोलनावरचं नियंत्रण संपुष्टात येऊन, ते हाताबाहेर जाईल हे गांधीजींना कळत होतं. म्हणून गांधीजींनी तात्काळ असहकार आंदोलन मागे घेतलं.

आंदोलन ऐन भरात असताना अचानक मागे घेतल्यामुळे, दोन वर्षे त्यात गुंतलेल्या आंदोलकांना अनपेक्षित रिक्ततेचा सामना करावा लागला. अचानक झालेल्या या स्थितीबदलाचा, कार्यकर्त्यांच्या मनावर विपरित परिणाम होऊन ते दिशाहीन बनू नयेत, म्हणून त्यांना पर्यायी कार्यक्रम देऊन, त्यात गुंतवणं गरजेचं होतं. त्यासाठी गांधीजींनी तातडीने ‘विधायक कार्यक्रम’ तयार करुन तो जनतेला दिला.

पुढील आंदोलनापर्यंत लोकांचा टेम्पो टिकवून ठेवणं, हाही या कार्यक्रमाचा उद्देश होता. हा कार्यक्रम सामाजिक व आर्थिक स्वरुपाचा होता. त्यात अस्पृश्यता निवारण, राष्ट्रभाषा म्हणून हिंदीचा प्रचार-प्रसार, हिंदू-मुस्लिम ऐक्य व सूतकताई या गोष्टींचा समावेश होता. तथापि आपला विषय चरखा असल्यामुळे चरख्यासंबंधीच विचार करुया!

भारत प्राचीन काळापासून वस्रोद्योगात अग्रेसर होता. भारतीय विणकरांनी विणलेल्या कापडाला जगभर प्रचंड मागणी होती. परंतु भारत इंग्रजांच्या पारतंत्र्यात गेल्यानंतर मात्र, भरभराटीला आलेल्या भारतीय वस्रोद्योगाला घरघर लागली. त्याचे कारण युरोपात झालेल्या औद्योगिक क्रांतीची सुरुवात, ही वस्रोद्योगापासूनच झाली हे होते, तर या वस्रोद्योगात इंग्लड हे सर्वात आघाडीवर होते.

भारत ही इंग्रजांची वसाहत होती, तर कापडासाठी लागणारा कच्चामाल म्हणजे कापूस, जो भारतात मोठ्या प्रमाणावर पिकत होता, तो त्यांनी स्वस्त दरात खरेदी करुन, ब्रिटिश कापड गिरण्यांना पुरवला. स्वस्त कच्च्या मालामुळे ब्रिटिश कापड, इतर देशांच्या कापडापेक्षा स्वस्त होते. त्याची बरोबरी इतर युरोपिय देश करु शकत नव्हते.

ब्रिटिशांनी फक्त इथला कापूसच स्वस्तात नेला नाही, तर त्यापासून तयार कापडही भारतातच विक्रीसाठी आणले. अशारितीने भारताला कच्च्या मालाचे केंद्र व पक्क्या मालाची बाजारपेठ बनवून, त्यांनी भारताचं दुहेरी शोषण चालविले होते.

वास्तविक कापड उद्योग हा भारताचाही प्रमुख व्यवसाय होता, तथापि यंत्रावर मोठ्या प्रमाणावर उत्पादित इंग्लंडच्या स्वस्त कापडापुढे, भारतीय कापड उद्योग तग धरु शकला नाही. त्यामुळे असंख्य विणकर, कामगार आणि त्या उद्योगाशी संबधित अनेक व्यावसायिकांवर बेकारीची कु-हाड कोसळली.

ब्रिटिश कापड स्वस्त असण्याचं आणखी एक कारण म्हणजे, कापडाबरोबरच तेथे सूतही यंत्रावर कातले जाई. त्यामुळे मुबलक व स्वस्त सुताच्या पुरवठ्यामुळेही, ब्रिटिश कापड स्वस्त होते. गांधीजींनी सूतकताईला प्राधान्य देण्यामागचे कारण हेच होते. सूतकताईमागचं हे मर्म मला, युरोपातील औद्योगिक क्रांतीचा इतिहास शिकवताना, कापड उद्योगात लागलेल्या विविध शोधांचा परस्पर संबंधाचा अभ्यास करताना उलगडलं

कॉ. शरद् पाटील म्हणतात, ‘महामानवांना उत्पादन संबंधाचं उत्तम ज्ञान असते.’ गांधीजींनाही ते होते. म्हणूनच त्यांनी हा विचार केला की, आपल्याकडे यंत्रबळ नसलं, तरी मनुष्यबळ मात्र भरपूर आहे. त्याचा उपयोग सूतकताईसाठी केला, तर मोठ्या प्रमाणावर सूत निर्मिती होऊन, भारतीय विणकरांना स्वस्त दराने, मुबलक सुताचा पुरवठा होईल व त्यांनाही स्वस्त दराने कापड विकणे परवडू शकेल. त्यामुळे भारतीय कापड उद्योगाला नवजीवन तर प्राप्त होईलच, शिवाय घरोघर सूतकताईचा जोडधंदा जर लोक करु लागले, तर त्यांच्या आर्थिक उत्पन्नात वृद्धी होऊन त्यांची हलाखीही कमी होईल.

गांधीजींनी स्वदेशी मालाचा आग्रह धरण्यामागे, जसा भारतीय कापड उद्योगाला सावरणे हा हेतू होता, तसेच स्वदेशी मालाच्या वापरामुळे ब्रिटिश कापड उद्योगाला फटका बसून, ब्रिटिशांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागावा, हाही हेतू होता . ‘माणूस सर्व सोंगं करु शकतो, पैशाचं सोंग करु शकत नाही’ अशी म्हण आहे. तिला ब्रिटिशही अपवाद नव्हते. आम्ही आधी व्यापारी आहोत, व नंतर राज्यकर्ते आहोत, असं ब्रिटिश अभिमानाने सांगत. व्यापा-याला तोटा अजिबात सहन होत नसतो. हा त्यांचा विकपॉईंट बनिया गांधीजी ओळखून होते.

गांधीजींच्या चरखा, सूतकताई आणि स्वदेशीच्या निर्णयाचा परिणामकारक प्रत्यय, १९३० च्या सविनय कायदेभंगाच्या आंदोलनात आला. आंदोलन सुरु करण्यापूर्वी गांधीजींनी आपल्या मागण्या सरकारला सादर करुन, त्या मान्य झाल्यास नियोजित आंदोलन मागे घेतो, असा प्रस्तावही सरकारपुढे ठेवला. परंतु सरकारने तो फेटाळून लावला. परिणामी गांधीजींनी दांडी येथील मीठाच्या सत्याग्रहाने सविनय कायदेभंगाच्या आंदोलनाला सुरुवात केली.

या आंदोलनालाही जनतेचा उदंड प्रतिसाद लाभला. स्वदेशी मालाच्या वापराच्या, गांधीजींच्या आदेशाचं जनतेने तंतोतंत पालन केल्यामुळे, भारतभर ब्रिटिश कापड दुकानांमध्ये पडून राहिले. त्यामुळे ब्रिटिश कापडाची भारताकडून आयात थांबल्याने चार महिने ब्रिटिश कापड गिरण्या बंद पडल्या. तेथील गिरणी कामगारांवर उपासमारीची वेळ आली. ही परिस्थिती जर अशीच सुरु राहिली, तर ब्रिटिश कापड उद्योगच संपुष्टात येईल, असा इशारा मँचेस्टर कापड गिरणी मालक संघाने, ब्रिटिश सरकारला दिला.

तसेच हे आंदोलन आडमुठेपणाने हाताळल्यामुळे ही परिस्थिती उद़्भवल्याचा ठपकाही त्यांनी, भारतीय व्हाईसरायवर ठेवला व गांधीजींशी तातडीने बोलणी करावी, अशी ब्रिटिश सरकारला सूचना केली. त्याचीच परिणती व्हाईसराय आयर्विनने गांधीजींशी तातडीने बोलणी करुन, त्यांना दुस-या गोलमेज परिषदेला उपस्थित राहण्यासाठी राजी केलं. तत्कालीन ब्रिटिश महासत्तेला चरख्याने नमविल्यामुळे, स्वाभाविकच चरख्याचं महात्म्य वाढलं. १९४२ च्या लढ्यातही त्याचा वापर करण्यात आला. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर ते नकळत स्वातंत्र्याचं प्रतीकच बनलं.

चरखा व सूतकताईमागचं मर्म ना कोणी लोकांना सांगितलं, ना कोणी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यातूनच चरख्यामुळे स्वातंत्र्य मिळालं, असा चुकीचा संदेश संप्रेषित होत राहिला व आर्थिक स्वावलंबनासाठीच्या चरखा या साधनाचा, स्वातंत्र्यप्राप्तीचं साधन, असा चूकीचा अर्थ गांधीविरोधकांनी लावून, तो टिंगलीचा विषय केला. तर भारतात कापड गिरण्या सुरु झाल्या तरी, काँग्रेसचे नेते आणि अनुयायी डोळे झाकून सूतकताई करत राहिले. परिणामी सूतकताई हे गांधीवादाचं केवळ कर्मकांड बनलं.

स्वातंत्र्यलढ्यातलं क्रांतिकारकांचं योगदान हिमालयाएवढं आहे. ते कोणीही नाकारत नाही. पण चरख्याची ही उपहासात्मक किनार त्याला शोभत नाही. हे लक्षात घेतलं पाहिजे.

हे सुद्धा वाचा..

राज्याचे अतिरिक्त अधिकार व नागरिकांचे किमान स्वातंत्र्य ही बाब मी भयप्रद मानतो- म.गांधी

 •  

 शंकराचार्य इंग्रजांवर गांधीजीना देशाबाहेर हाकलण्याबद्दलचा दबाव का टाकत होते…? 

 •  

By Aasantosh

महात्मा गांधी सर्व धर्माचा आदर करण्यास सांगत.त्यांनी सायंकाळच्या प्रार्थना सभेत सर्व धर्माची भजने व गीते गाण्याची परंपरा सुरू केली होती.सगळ्या धर्मातील चांगुलपणा लोकांनी घ्यावा व त्यानुसार आचरण करावे अशी त्यांची धारणा होती.गांधी आध्यात्मिक होते,धार्मिक होते.आध्यत्मिक बाबींना केंद्रीयस्थानी ठेवण्याच्या गांधींच्या विचारास डॉ.आंबेडकर यांच्यासारख्याच्या टिकेस सामोरे जावे लागले होते. त्यातून गांधींचा वैचारिक संवाद आंबेडकराशी सूरु झाला होता. त्यानिमित्ताने काही बदल ही दिसत होता. दुसरीकडे गांधींना संकुचित हिंदुत्ववादि लोकांच्या टीकेला तोंड द्यावे लागत होते. गांधी त्याना मूर्ख व धर्मांध समजत.

इतिहासकार रामचंद्र गुहा त्यांच्या ‘गांधी :द इयर्स दॅट चेंजड इंडिया’ या पुस्तकानिमित्ताने दिलेल्या मुलाखतीत म्हणतात : ‘ आंबेडकर यांच्या अनुयायांशी तुम्ही चर्चा केलीत तर ते सांगतील की जाती प्रश्नाच्या बाबतीत गांधी इतक्या धीम्या गतीने चालत होते की ते कधीच जात्यंत करू शकले नसते.परंतु तुम्ही जर त्याकाळातील हिंदुत्ववादी लोकांच्या विचारावर नजर टाकली तर गांधी अस्पृश्यता व जातीच्या प्रश्नावर जास्तच गतीने काम करीत होते.

हिंदुत्ववादी गांधीजीवर चिडलेले होते.अस्पृश्यतेचा उल्लेख आमच्या पुराणात आहे व एक बनिया ज्याला संस्कृत येत नाही तो आमच्या धर्मश्रद्धा कशा काय बदलू शकतो ? ते पुढे म्हणतात ‘ हिंदू परंपरावादी त्यांच्या जाती व अस्पृश्यता विरोधी कामामुळे विरोध करीत होते.एक वेळ तर शंकराचार्यांनी ब्रिटिशांवर गांधींना देशाबाहेर काढण्यासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली होती. हिंदू महासभेने तर गांधी जिथे जिथेजिथे अस्पृश्यता विरोधी रॅली व सभा करतील तिथे काळे झेंडे दाखविण्याचे ठरविले होते..

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील इतिहासाचे संशोधक देवकुमार अहिरे सांगतात ‘ नथुराम गोडसे ला काहि लोक माथेफिरू असल्याचे सांगतात.नथुराम गोडसे यांनी गांधींची हत्या केली होती. १९३० ते १९४५ या काळात अनेक मराठी मासिकांमध्ये नथूरामने हिंदुत्ववाद आणि सावरकरांशी आपले घनिष्ट वैचारिक नाते आहे हे स्पष्ट केले आहे.

ते पुढे सांगतात – ‘ गोडसे संपादक असलेल्या मासिकात दशमुखी रावणरुपी गांधीला राम- लक्ष्मणरुपी हिंदू महासभेचे सावरकर आणि मुखर्जी मारत आहेत. सदर फोटो १९४५ सालचा आहे आणि १९४८ साली गांधीची हत्या गोडसे यांनी केली आहे.

सावरकर,हिंदू महासभा यांचे संबंध नाकारण्याचा प्रयत्न होत असला तरी फोटो मात्र अस्पष्टपाने काहीतरी सत्य सांगण्याचा प्रयत्न करत आहे असे देवकुमार यांचे म्हणणे आहे .

पत्रकार मिलिंद कीर्ती यांनी गांधींचे स्मरण करताना त्यांच्या फेसबुकवर एक टिप्पणी केली आहे

‘१९४६ नंतरचे गांधी टाकूून देण्यासारखे नाहीत किंवा दुर्लक्षण्याऐवढे अनुल्लेखनीयही नाहीत. गांधी-आंबेडकर नेतृत्त्व स्पर्धेतील कटू गोष्टी सोडणे आवश्यक आहे. गांधी जातीअंताबाबत डॉ. आंबेडकरांच्या आंतरजातीय विवाहावर सहमत आहेत. ज्यांच्याकरिता गांधी बोलत राहिले, कृती करीत राहिले, त्या सर्वसामान्य भारतीयांनी गांधी टाकूून दिल्यामुळे सर्वसत्तावादी देशावर हुकूूमत गाजवित आहेत. अशा वेळी साम्राज्यवादाविरोधातील गांधी आणि देश उभारणीतील आंबेडकरच अधिक कालसापेक्ष होत जातात. आजच्या गांधींचा सर्वांनी शोध घेतला पाहिजे’

हे सुद्धा वाचा…..

आरएसएस ला नाजी व मुसोलिनी सारखे फॅसिस्ट मानायचे गांधीजी

“राज्याचे अतिरिक्त अधिकार व नागरिकांचे किमान स्वातंत्र्य ही गोष्ट मी भयप्रद मानतो”- म.गांधी

 •  

आरएसएस ला नाजी व मुसोलिनीसारखे फासिस्ट मानायचे म.गांधी

 •  

महात्मा गांधी या जगातून जाऊन ७० वर्षे झाली आहेत. या सात दशकात खूप सारे टीकाकार सुद्धा त्यांच्या मार्गाने नंतर मार्गक्रमण करताना दिसले.कमीतकमी सार्वजनिकरीत्या भारताचे जवळपास सर्वच राजकीय पक्ष हे गांधीजीविषयी श्रद्धा व्यक्त करताना दिसतात.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक ते प्रधानमंत्री असा प्रवास झालेल्या नरेंद्र मोदींनी गांधीच्या चष्म्याला आपल्या सरकारच्या प्रतीक चीन्हासारखे बनवून टाकले तेव्हा भारतातील सर्व विचारधारा ह्या गांधीपुढे नतमस्तक झाल्यासारख्या वाटत होत्या . दुसऱ्या विचारधारांच्या पातळ्यावर ह्या वरवरच्या दिसणाऱ्या बदलाच्या पार्श्वभूमीवर महात्मा गांधी आरएसएस बाबतीत काय विचार करीत होते हे बघितले पाहिजे.

तसे पहिले तर गांधीजीनी या संदर्भात आपले म्हणणे दृढपणे मांडले आहे. त्यांच्या हत्येनंतर सरदार पटेल यांनी संघावर बंदी घातली होती. इथे महात्मा गांधीच्या अखेरच्या काळात त्यांचे खाजगी सचिव राहिलेल्या प्यारेलाल लिखित ‘द लास्ट फेज’ या पुस्तकाचा उल्लेख करणे गरजेचे आहे. डॉ. राजेंद्र प्रसाद यांची प्रस्तावना असलेल्या सदर पुस्तकाच्या चौथ्या खंडात प्यारेलाल यांनी १२ सप्टेंबर १९४७ ला आरएसएस नेते व म.गांधी यांच्यात झालेला एक संवाद दिला आहे. त्या काळात दिल्ली शहर भयंकर अशा सांप्रदायिक दंगलीनी जळत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अधिनायक गांधीजीना भेटावयास आले या वाक्याने हा प्रसंग सुरु होतो. आरएसएस चा शहरात चाललेल्या व देशाच्या विविध भागात चाललेल्या हत्याकांडात हात होता हे सगळ्यांनाच माहित होते.मात्र मित्रांनी या बाबीस नकार दिला . त्यानी महटले ,” आमचा संघ कुणाचा शत्रू नाही.तो हिंदुच्या रक्षणासाठी आहे,मुस्लिमांना मारण्यासाठी नाही. संघ शांतीचा समर्थक आहे.”
हि अतिशयोक्ती होती मात्र गांधीची तर मानवी स्वभाव आणि सत्याची प्रेरक शक्ती तर निस्सीम श्रद्धा होती. प्रत्येक मनुष्याला त्याची नियत चांगली आहे हे सिध्द करण्याची संधी दिली पाहिजे या मताचे ते होते. आरएसएसचे लोक किमान वाईट चिंतणे तरी योग्य मानीत हेही महत्वपूर्ण आहेच कि असे ते म्हणाले. गांधीनी त्यांना म्हटले,” तुम्ही एक सार्वजनिक स्टेटमेंट काढले पाहिजे व तुम्ह्च्या विरोधात लागलेल्या सर्व आरोपाचे खंडन केले पाहिजे आणि आजपर्यंत या शहरातील ,अन्य भागातील मुस्लिमांच्या हत्या व त्यांना त्रास दिल्या जाण्याच्या घटनांचा निषेध केला पाहिजे.” त्यांनी गांधीना त्यांच्या वतीने असे करण्यास सांगितले. गांधीनी उत्तर दिले कि,अवश्य करणार मात्र जर तुम्ही जे म्हणता आहात त्यात सत्य असेल तर जनतेने ते सत्य तुम्हच्याच मुखातून ऐकणे अधिक चांगले आहे.

गांधीच्या सोबतीतले एक सदस्य मध्येच बोलण्यास उठले ; संघाच्या लोकांनी तिथल्या निराश्रित लोकांच्या शिबिरात चांगले काम केले आहे. त्यानी शिस्त,साहस आणि कष्ट याचे अप्रतिम उदाहरण दाखवून दिल्याचे ते म्हणाले.. गांधीजी नी उत्तर दिले,‘‘ मात्र हे कदापीही विसरू नका कि हिटलर च्या नाझीनी व मुसोलिनीच्या फासिस्टानी हेच केले होते. ’’ ते आरएसएस ला हुकुमशाही दृष्टीकोन असणारी सामाजिक संघटना मानीत असत.
थोड्या दिवसांनी आरएसएस चे नेते गांधीना घेवून आपल्या स्वयंसेवक शिबिरात गेले. जिथे ते भंगी वस्तीत काम करीत होते. या ठिकाणी झालेल्या दीर्घ संवादानंतर अखेर ते एकच गोष्ट म्हणाले.”जर मुस्लिमांना मारण्यात तुमच्या संघटनेचा हात असल्याचा लावण्यात येणारा आरोप खरा झाला तर त्याचे वाईट परिणाम होतील.”

(https://www.ichowk.in/politics/mahatma-gandhi-views-on-rss/story/1/ येथे प्रकाशित व साभार अनुवाद: दयानंद कनकदंडे)

हे देखील वाचा…..

इतके दिवस संघाच्या इशाऱ्यावर नाचता नाचता तो खरेच मतांधळा झाला असेल !

“राज्याचे अतिरिक्त अधिकार व नागरिकांचे किमान स्वातंत्र्य ही गोष्ट मी भयप्रद मानतो”- म.गांधी

 •  

“राज्याचे अतिरिक्त अधिकार व नागरिकांचे किमान स्वातंत्र्य ही बाब मी भयप्रद मानतो.” – म.गांधी

 •  

   संजय सोनवणी 

महात्मा गांधीं स्वतंत्रतावादी होते. समाजवादाचे ते कधीही समर्थक नव्हते. थोडक्यांच्या भांडवलशाहीलाही त्यांनी विरोधच केला होता. समाजवादात शासनाच्या हातात जास्त अधिकार जातात त्यामुळे नागरिकांवर अधिकाधिक बंधने घालणे सोपे जाते महात्मा गांधी म्हणाले होते,

         .

“राज्याचे अतिरिक्त अधिकार व नागरिकांचे किमान स्वातंत्र्य ही बाब मी भयप्रद मानतो .राज्याला अधिक अधिकार असल्याने शोषण कमी झाल्यासारखे वाटेल पण यात व्यक्तिस्वातंत्र्याचा अपार संकोच होईल आणि देशाच्या प्रगतीला खीळ बसेल. सरकारी नियंत्रणांमुळे भ्रष्टाचार तर वाढेलच पण सत्याची गळचेपीही सुरु होईल. काळाबाजार व कृत्रीम टंचाया वाढतील. एवढेच नव्हे तर व्यक्तीची स्व-सृजनप्रेरणाही यातून नष्ट होत तो स्वत:ला घ्याव्या लागणा-या मेहनतीपासूनही दूर पळेल. सर्वोच्च प्राधान्य हे व्यक्तीस्वातंत्र्याला असायला हवे त्याशिवाय सबळ समाजाचे उभारणी शक्य नाही. व्यक्तीस्वातंत्र्य नाकारणे व शासन सर्वोपरी होणे हे मनुष्याच्या नैसर्गिक प्रेरणांच्या विरुद्ध आहे. स्वत:चे “मन” नसलेला माणुस असून नसल्यासारखाच आहे….राज्याला शरण जाण्याएवढा व्यक्तिस्वातंत्र्याचा अनैतिक व अन्याय्य सौदा नसेल. मला कमी लोकांकडील अधिकतम अधिकार असलेले स्वराज नको आहे तर जेंव्हा नागरिकांच्या अधिकारांची पायमल्ली होईल तेंव्हा सरकारचा विरोध करू शकण्याची सक्षमता असलेले नागरिक असलेला देश हवा आहे.” (३ नोव्हें. १९४७)

 

 

हे सुद्धा वाचा…… 

सत्याचा पाठपुरावा आणि जागतिक शांतता प्रस्थापित करणे अधिक आव्हानात्मक आणि गरजेचे आहे -पेन काँग्रेसला पुण्यात सुरुवात 

पीएम मोदींनी देशाला शिव्यांची लोकशाही बनवून टाकले आहे – रविश कुमार

भाषा आणि संस्कृतीचे आदान प्रदान हे विषमता व सत्तावर्चस्वाच्या आधारे होता कामा नये – न्गुगी वा थियोन्गो

“नथुरामां”ची भरती कशी होते? – कुणाल शिरसाठे

 •