Tag: पाश

|| सबसे खतरनाक होता है हमारे सपनों का मर जाना : पाश ||            – डॉ. दीपक बोरगावे

|| सबसे खतरनाक होता है हमारे सपनों का मर जाना : पाश || – डॉ. दीपक बोरगावे

Literature, Pick-a-book, Poetry, Political, Uncategorized
'पाश' ची कविता बंडखोर, आक्रमक आणि चढा आवाज लावणारी कविता आहे. तिला शोषणकर्त्यांचा संताप आणि चीड आहे. ती आक्रमण करायला अजिबात घाबरत नाही. 'पाश'(१९५०-१९८८) यांचे नाव अवतारसिंह संधू, जालंधर, (पंजाब) जिल्ह्यातल्या नकोदर या तालुक्यातल्या मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातील त्यांचा जन्म. ते साम्यवादी विचारांचे होते. त्यांना अनेकदा तुरुंगात जावे लागले. सामाजिक आणि राजकीय जीवनात कार्यरत असताना, म्हणजे साधारणपणे १९६५ ते १९८८ पर्यत ते निम्मा काळ तुरूंगातच होते. लोहकथा (१९७०), उड्डदे बाजाॅ मगर (१९७४), बिच का रास्ता नहीं होता (हिंदी अनु. प्रा. चमनलाल, १९७५), साडे संमियां विच (१९७८), सबसे खतरनाक होता है हमारे सपनों का मर जाना (हिंदी अनु. निलिमा शर्मा, १९८९), याशिवाय, 'बेदखली के लिये विनयपत्र' आणि 'धर्मदिक्षा के लिये विनयपत्र' (१९८४) या दोन दीर्घ कवितांमुळे ते खलिस्थानवाद्यांच्या हिटलिस्टवर आले आणि २३ म
कविता : आमच्या जगण्याची रीत ऐका – अवतारसिंह ‘पाश’

कविता : आमच्या जगण्याची रीत ऐका – अवतारसिंह ‘पाश’

Literature, Poetry, Uncategorized
आमच्या चुलींचं संगीत ऐका . आम्हा पिडीतांच्या वेदनेच्या किंकाळ्या ऐका. माझ्या बायकोची मागणी ऐका . माझ्या मुलीचा प्रत्येक हट्ट ऐका. माझ्या बिडीतलं विष मोजा. माझ्या खोकण्याचा मृदंग ऐका. माझ्या ठिगळ लावलेल्या पायजम्याचे थंडगार सुस्कारे ऐका. माझ्या पायातल्या जोड्यातून माझ्या मनाचं दु:ख ऐका. माझा निशब्द आवाज ऐका. माझ्या बोलण्याची ढब ऐका. माझ्या देहबोलीचा जरा अंदाज घ्या. माझ्या संतापाचा जरा हिशोब ऐका. माझ्या सज्जनपणाचं प्रेत पहा. माझ्या जंगलीपणाची रागदारी ऐका.   आता या निरक्षर बोटांनी लिहिलेलं एक गीत ऐका तुम्ही चुकीचं ऐका किंवा बरोबर ऐका आता आज आमच्याकडून आमच्या जगण्याची रीत ऐका. ( अनुवाद- श्रीधर चैतन्य )  "पाशच्या कविता' या अनुवादित काव्यसंग्रहातून .....  पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी..https://www.amazon.in/dp/8193321197   इथेही कविता आहेत..  कविता : पुरूष म्ह