Tag: नांगेली

कविता : नांगेली

कविता : नांगेली

Literature, Poetry, Uncategorized
                 शबरीमला मंदिराच्या निमित्ताने केरळची चर्चा सुरु आहे. स्तन झाकण्याच्या अधिकारासाठी नांगेली या दलित महिलेने आपले स्तन कापून टाकले होते. नांगेली चे नाव केरळच्या बाहेर खूप लोकांनी ऐकलेले असेल. त्रावणकोर राज्यात जातीवादाची मुळे खोलवर रुजलेली होती. दलित महिलांना स्तन झाकण्याचा अधिकार नव्हता. त्याकाळात नांगेलीने स्तन झाकून विद्रोह पुकारला. तसे करण्यास जेव्हा विरोध झाला तेव्हा तिने स्वतः च आपले स्तन कापून टाकले. कवी,लेखक,अनुवादक डॉ. दीपक बोरगावे यांची कविता "असंतोषच्या" वाचकांसाठी .....        नांगेली वर्ष होतं 1803 पानथळीचा प्रदेश ; समुद्र किनाऱ्याजवळ गाव होतं चेरथाल राज्य केरळ तिथं होती जळत एक क्रांती… तिचं नाव होतं नांगेली… *** नांगेली, काय केलंस हे तू ? स्तन कापलेस तू, तुझे ? स्वत:च, स्वत:चे ? फळ चिरावं तसं ? आपल्याच खोपटयात ! नि काय केलंस स्तन कापून ? तर केळीच्या प