Tag: नवरात्र

नवरात्रोत्सव हा कृषीमायेचा उत्सव आहे.

नवरात्रोत्सव हा कृषीमायेचा उत्सव आहे.

Social, Uncategorized
                                                                         रिबले शुभम आश्विन मासारंभापासून देशात नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. आपल्या राज्यात हा उत्सव घटस्थापनेचा उत्सव व कृषीमायेचा उत्सव म्हणून साजरा केला जातो. जगभरात शेतीचा शोध स्त्रियांनी लावल्याची एक आठवण या उत्सवामागील मूळ प्रेरणा आहे. त्यामुळे राज्यातच नव्हे तर देशातील कानाकोपऱ्यात हा उत्सव केवळ स्त्रिया साजरा करत असत याचे अनेक दाखले पुराणशास्त्रांमध्ये मिळतात. अलीकडे या उत्सवाचे चित्रच बदलून गेले आहे. घटस्थापनेपेक्षा या उत्सवात अनेक नवे फॅड आल्यामुळे मूळ उत्सव आणि त्याचे गांभीर्य लोप पावत चालल्याचे दिसते. कृषीमायेची आराधना करणारी आणि तिचे स्तवन करणारी परंपरा घटस्थापनेच्या प्रतिकांमध्ये थोडीशी शिल्लक होती. ती सध्याच्या नवनवीन फॅडमुळे ती भविष्यात पूर्णपणे लोप पावण्याची भीती वाटते.देशात हा उत्सव साजरा करणाऱ्या विविध पर