Tag: धम्माचे मारेकरी

केवळ विद्या पुरेशी नाही, कारण त्यामुळे पोकळ पांडित्य निर्माण होते -सुधाकर सोनवणे

केवळ विद्या पुरेशी नाही, कारण त्यामुळे पोकळ पांडित्य निर्माण होते -सुधाकर सोनवणे

Social
काही व्यक्तींनी सोशल मिडियावरून व्हायरल केलेले श्रामनेर शिबिराचे फोटो पाहण्यात आले. त्यात श्रामनेर म्हणून बसलेल्या व्यक्तीचे महिलांनी पाय धुणे आणि ते पुसणे अशा बाबी स्पष्ट दिसत होत्या. यासंदर्भात भंतेजी बरोबर येथील सामाजिक न्यायभवनात मी त्यांच्यासोबत चर्चाही केली. मात्र “पाय धुणे-पुसणे योग्य असल्याचा निर्वाळा करत अनुयायांनी हे केलेले कृत्य त्यांच्या श्रद्धेचा विषय असल्याच त्यांनी सांगितलं.” दरम्यान एका व्यक्तीने भंतेजींना फोन दिला आणि बोला असं सांगितलं. फोनवरून समोरच्या व्यक्तीला बोलताना भंतेजींनी त्यांच्याकडे एका तेलाच्या डब्याची मागणी केली. फोन ठेवल्यावर मी भंत्तेजींना विचारले की, “भंतेजी असे मागणे योग्य आहे का?” त्यावर भंते म्हणाले, “मी माझ्यासाठी मागतोय का?, मी माझ्या समाजासाठी मागतोय.” मी त्यांना विचारले, “तुमचा समाज म्हणजे काय. ? ते म्हणाले उद्या ग्रामीण भागातून माझ्या समाजाचे ल