Tag: दीपक बोरगावे

|| अयोध्या : एक दिवस ||- डॉम मोरेस /अनु. दीपक बोरगावे

|| अयोध्या : एक दिवस ||- डॉम मोरेस /अनु. दीपक बोरगावे

Literature, Poetry
गावाच्या आतील भागात, वेळ ही नेहमी दुपारचीच वाटते. देवळाभवती टाळांचा गजर सुरू असतो जिथे एक सूज आलेला सूर्य पोसत असतो माण्सांचा दुर्गंध आणि कृमी माशा भवताली. यात्रेकरू तुडवत एकमेकांना, पहारा असलेल्या द्वारांकडे. बाहेर, एका कपड्यात गुंडाळलेली, एक विधवा म्हातारी मरत असते, एकटीच, कृमीकीटके तिचे डोळे खात असतात. आम्ही एक गाईड भाड्याने घेतलेला असतो, केवळ बारा वर्षाचा एक मुलगा. हे नागमोडी रस्ते त्याच्यासाठी कलहांचे आणि युद्धग्रस्त असतात. तो आम्हांला घेऊन जातो विणत एकएक गल्ली, शिताफिने, काळजीपूर्वक, लहान मुलासारखे नव्हे. जेव्हा लहान मुले युध्दाच्या जगात अडकतात, आताही, कातडीखाली, त्याला कवटी दिसते, तो कधीतरी हसतो, कारण तुम्ही सुंदर असता. घनगर्द अंधाराचा एक गडद तुकडा, साठलेली घाण आणि दुर्गंध, तुम्हाला लक्षात येतं आजुबाजुला पाहात असताना, अल्लाहची झोपडी, आता ती नष्ट झालेली असते. ते सारेच यात्रेकरू क