Tag: दलित-मुस्लिम

‘वंचित बहुजन आघाडी’ आणि ‘वंचित’ मुसलमानांचे प्रतिनिधित्व

‘वंचित बहुजन आघाडी’ आणि ‘वंचित’ मुसलमानांचे प्रतिनिधित्व

Political
मुफिद मुजावर Image Courtesy : Dailyhunt.in भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी गेल्या काही महिन्यात विविध जातींचे / समाजगटांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या छोट्या पक्ष-संघटनांशी बोलणी करत ‘वंचित बहुजन आघाडी’ स्थापन केली आहे. राजकीय-सामाजिकदृष्ट्या ‘वंचित’ राहिलेल्या छोट्या जातींनी एकत्रित येऊन मर्यादित भागातच का होईना सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न यापूर्वी प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली यशस्वी झाल्याचे सर्वज्ञात आहे. त्यामुळे प्रस्थापित पक्षांच्या निवडणूकपूर्व आघाड्यांच्या चर्चेची नियमित राजकीय गुऱ्हाळे सुरु होण्यापूर्वीच प्रकाश आंबेडकरांच्या ‘वंचित बहुजन आघाडी’ च्या घोषणेने धुराळा उडला नसता तर नवलच होते. पण प्रकाश आंबेडकरांच्या ‘वंचित बहुजन आघाडी’ मध्ये अस्साउद्दीन ओवैसी यांचा ‘मजलिस-ए-इतेहाद्दुल मुसलमीन’ हा पक्ष येऊन शामिल होताच या धुराळ्याचे ‘धूळवडी’त रुपांतर झाले