Tag: ग दि माडगुळकर जन्मशताब्दी

ग. दि. माडगूळकर आणि आजचा काळ – डॉ.दिलीप चव्हाण

ग. दि. माडगूळकर आणि आजचा काळ – डॉ.दिलीप चव्हाण

Literature, Political, Uncategorized
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जेव्हा सामाजिक समरसता मंचाची १९८३-मध्ये स्थापना केली तेव्हापासून दीर्घकाळ समरसता मंचाचे लक्ष्य हे मुख्यत: महात्मा जोतीराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे राहिलेले आहेत. फुले आणि आंबेडकरांच्या परंपरेतील आणखी एक नाव हे छत्रपती शाहू महाराजांचे आहे. परंतु, संघाने दीर्घकाळ शाहू महाराजांच्या बाबतीत काही स्पष्ट भूमिका घेतली नव्हती. याला अनेक करणे असू शकतात. तूर्तास हा मुद्दा बाजूला ठेवू. असे असले तरी विशिष्ट अशा कुजबुज पद्धतीने शाहू महाराजांबाबत एक विशिष्ट अशी धारणा ही निर्माण करण्याचा प्रयत्न हा सदोदित महाराष्ट्रातील अभिजनांकडून सुरूच होता. आम्हाला याचा प्रत्यय एका मित्राच्या सत्यशोधक पद्धतीने आयोजित केलेल्या एका लग्नात आला. या लग्नात जोतीराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि शाहू महाराजांच्या प्रतिमा दर्शनी ठिकाणी ठेवण्यात आल्या होत्या. तेव्हा संघाच्या एका पूर्णवेळ का