Tag: गिरीश कर्नाड.

लेखक असावेत असे ! माणुसकीच्या शेपटीवर पाय दिल्यावर दंश करणारे

लेखक असावेत असे ! माणुसकीच्या शेपटीवर पाय दिल्यावर दंश करणारे

Literature, Poetry, Political
गिरीश कर्नाड हे प्रथमतः मी 'निशांत' या चित्रपटात पाहिले होते. सहज अभिनय आणि संवादफेक यातून हे गारुड निर्माण झाले ते कायम राहिले. यांचे अभ्यासक्रमात लावलेले 'हयवदन' हे नाटक शिकवले. 'मंथन' या चित्रपटातून एक वेगळीच भूमिका त्यांनी साकारली होती. त्यांचे आत्मचरित्र 'खेळताखेळता आयुष्य' हे काळजीपूर्वक वाचून काढले. शाम बेनेगल, शबाना आझमी, नासिरुद्दीन शहा, ओम पुरी, स्मिता पाटील, मोहन आगासे हे त्या काळातले एक विलक्षण असे रसायन होते. समांतर सिनेमाने त्या काळात (१९८०'s) एक सांस्कृतिक क्रांतीच केली होती. अभिजन वर्गात एक सळसळ निर्माण केली होती. नंतर हे कलाकार आपापल्या दिशेने काम करत राहिले. पण कर्नाड यांनी आपली वैचारिक बांधिलकी आणि त्यानुसार नाटक, सिनेमा आणि साहित्य या माध्यमातून त्यांनी दिलेले योगदान यात विसंगती नाही. गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर देशात फोफावत चाललेल्या फासीवादाने ते त्र