Tag: क्षारपड जमिनीचा प्रश्न

क्षारपड जमिनीचं आव्हान आणि उपाय

क्षारपड जमिनीचं आव्हान आणि उपाय

Social, Uncategorized
नवनाथ मोरे शेती विकासाचे नवनवे टप्पे पार करत असताना फक्त नफ्यासाठी उत्पादन, हे तत्व अवलंबले गेल्यामुळे घटती उत्पादकता आणि क्षारपड जमिनी हे एक संकट समोर येत आहे. माती तयार होण्यास हजारो वर्षे लागतात. त्यामुळे उत्पादन करत असताना त्याच्याकडे लक्ष देण्याची गरजेचे होते. परंतु ते दिले गेले नाही, हे वास्तव आहे. ज्या पश्चिम महाराष्ट्राकडे आपण सधन प्रदेश म्हणून पाहात आहोत. तेथील शेतकऱ्यापुढे क्षारपड जमिनी हे एक संकट उभे राहिले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुका या समस्येला सामोरे जात आहे. ऊसासारख्या पिकाला सातत्याने लागणारे पाणी. त्याच जमिनीत घेतले जाणारे एकच पीक. वारेमाप पाजले जाणारे पाणी, ज्यामुळे लाखो टन माती पाण्याबरोबर वाहून जाते. या भागातील असंख्य जमिनी पाहिल्यास त्याचे ना सपाटीकरण आहे, ना त्याला बांधबंदिस्ती आहे. त्यात शेतात वारेमाप रासायनिक खतांचा वापर. जमिनीतील सेंद्रिय घटक कमी झाल