Tag: कन्हैया कुमार

मार्क्स अजून जीवंत आहे… आनंद विंगकर यांची कविता

मार्क्स अजून जीवंत आहे… आनंद विंगकर यांची कविता

Literature, Poetry
हनुमान जसा अजरामर वारे जसे अविनाशी अवकाशात तसा मार्क्स जीवंत भूमीवर खरेच ही सांगीवांगीची नाही वार्ता परवाच म्हणे बेगुसराईतील बारा तासांच्या मोर्चात एका सुखवस्तू तहाणलेल्या अभिनेत्रीला पाणी देतांना म्हणाला घामाचा वास कोणत्याही उग्र सेंटपेक्षा धुंद करतो निरखून पाहिल्यास लक्षात येईल उन्हात रापलेला मुखचंद्रमा अधिक आकर्षित असतो मनमोकळं हसून म्हणाली ती इंन्कलाब जिंदाबाद. आशा जशी मरत नसते मरत नसातात मानवी स्वप्नं मार्क्स सांजेच्या सूर्यासारखा मजूरीहून घरी परतणाऱ्या रुपेरी बटांना हळूवार वार्यांने कुरवाळीत राहतो सांगतो कानांत दिस येतील दिस जातील भोग सरलं सुख येईल भविष्याची स्वप्नं साकारीत मार्क्स पाटीवर दप्तर टाकून उशीरा घरी पोहचणार्या पोरासारखा. मार्क्स जीवंत आहे बंगालमधील तपाहून जास्त काळातील वनवासा सारखा शतकांच्या अज्ञातवासातील आदीवाश्यांसारखा दिवसाला दगडं मारीत जगणाऱ्या अथेंस श
काॅम्रेड कन्हैया आणि त्याची भूमिहार जात – श्रीकांत ढेरंगे

काॅम्रेड कन्हैया आणि त्याची भूमिहार जात – श्रीकांत ढेरंगे

Political, Social
भूमिहार किंवा बाभण ही एक भारतीय जात. उत्तर प्रदेश,बिहार आणि झारखंड आणि अन्य प्रदेशांमध्ये थोड्या प्रमाणात राहते. भूमिहारचा अर्थ होतो भूपति, जमीनमालक किंवा जमीनदार. भूमिहार स्वतःला परशुरामाचे शिष्य मानतात. उत्तर प्रदेशच्या गाजीपूर आणि आझमगढ जिल्ह्यात यांची लोकसंख्या अधिक असून बिहारमध्ये भूमिहारांची सर्वाधिक लोकसंख्या आहे. तिवारी, त्रिपाठी, मिश्र, शुक्ल, उपाध्याय, शर्मा,पाठक,दुबे,द्विवेदी या भूमिहार समाजाला दिल्या गेलेल्या उपाध्या आहेत. शासन आणि जमीनदारीमुळे राय, साही, सिन्हा, सिंह, आणि ठाकूर ही त्यांना मिळालेली उपनावे आहेत. भूमिहार आपण ब्राह्मण असण्याचा दावा करतात. परंतु ब्राह्मणांमधील एक मोठा समुदाय त्यांना ब्राह्मण मानत नाही. कारण, भूमिहार हे परंपरागत पूजाअर्चना/कर्मकांड सोडून जमीनदारी करतात. तर काही भूमिहार स्वतः शेती कसतात. तसेच काही भूमिहार अल्पभूधारक तसेच भूमिहीनही आहेत. त
कन्हैयाचा संघर्ष नजरेआड करुन त्याची जात शोधणारे जातीयवादी आहेत – आ.जिग्नेश मेवानी

कन्हैयाचा संघर्ष नजरेआड करुन त्याची जात शोधणारे जातीयवादी आहेत – आ.जिग्नेश मेवानी

Political
एका अंगणवाडी कर्मचारी असलेल्या आईचा मुलगा जेव्हा लोकसभेच्या निवडणूकीत उमेदवार म्हणून उभा राहतो तेव्हा काही लोक त्याला भूमिहार सिद्ध करण्याचा आटापिटा करीत आहेत. कन्हैयाचा जन्म हा गरीब कुटुंबात झाला आणि त्याचे व त्याच्या भावा-बहिणीचे पालनपोषण त्याच्या आई-वडिलांनी मोठ्या कष्टाने केले. जर आपण कन्हैयाचे घर पहिले तर आपल्याला असे दिसून येईल कि सर्वसामान्य लोकांच्या घरासारखे त्याचे घर आहे. इतर भूमिहार परिवारांसारखे ते आपल्या पाल्यांचे शिक्षण हे फाइव्ह स्टार शाळेत करू शकतील अशी त्यांची स्थिती नाही. जर पाऊस आला तर त्यांच्या घरात १० ठिकाणी पाणी गळते. कोणी गंभीर आजारी पडलं तर त्याच्यासाठी इतर लोकांपुढे पैसे मागावे लागतील, अशी स्थिती कन्हैयाच्या परिवाराची आहे. सौ.मिडीयाविजील या देशातील जातिव्यवस्थेमुळे मागास जातीतील लोकांपेक्षा उच्च जातीतील लोकांना उत्पादनाचे खूप स्रोत उपलब्ध आहेत आणि त्य