Tag: ऑनर किलिंग

हु किल्स सुमित …? -भागवत तावरे

हु किल्स सुमित …? -भागवत तावरे

Social
विषमतेचा अनभिज्ञ प्रवास जातीय ते आर्थिक असाही होतोय का ? तो इंजिनियर होणार अन ती देखील , नव्या पिढीचे नेतृत्व करताना लग्नासारखा निर्णय घेणारे ते दोघे शारीरिक व मानसिक सदृढ . तेरे मेरे बीच मे असणारे बंधन त्यांनी डॉ . आंबेडकरांच्या कायद्याकडून संमत करून घेतले .दोन मनातील रेशीम बंध त्यांनी रेशीम गाठीत बांधून देखील घेतले . व्यवस्थेत संपन्न जीवन जगावे म्हणून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण करायचे होते म्हणूनच भाग्यश्री - सुमित वाघमारे महाविद्यालयात आलेले . तथागतांच्या साक्षीने आरंभ झालेले वैवाहिक जीवन कुठल्याच अडथळ्याशिवाय यशस्वी होईल असे वाटत असताना धारधार शस्त्र अनपेक्षित पणे समोर आले अन सुमितचा जीव घेऊन गेले . ज्याच्या सोबत जीवन अन जगण्याचे स्वप्न जगले त्याचा मृत्यू पाहण्याचा दुर्दैवी प्रसंग त्या रमाईच्या लेकीवर व जनतेच्या डोळ्यावर ओढवला . कधी काळी जातीचे बंध बांध जपणारी व्यवस्था काल