Tag: इंग्रजी

इंग्रजी ही ज्ञानभाषा कशी बनली ?

इंग्रजी ही ज्ञानभाषा कशी बनली ?

Literature, Uncategorized
संजय सोनवणी ज्ञानाची रचना हे जगातील उपलब्ध ज्ञान समजावुन घेतल्याखेरीज होणार नाही. इंग्रजी ही ज्ञानभाषा बनली कारण प्राकृत, संस्कृत, अरबी, चीनी ते पार आपल्याल माहितही नसलेल्या भाषांतील उपलब्ध प्राचीन साहित्य, शिलालेख ईत्यादी इत्यादी सर्व त्यांनी आपल्या भाषेत तर नेलेच पण त्यावर अभ्यासपुर्ण प्रस्तावना/विश्लेषने लिहिली. कथासरित्सागर असो कि गाथा सप्तशती, मीडोज ओफ़ गोल्ड हे अल मसुदीचे प्रवासवर्णन असो कि रिचर्ड बर्टनचे अरेबियन नाइट्स....अगणित उदाहरणे आहेत. त्याहीपेक्षा उत्खनने, पुराणवस्तुंचे संशोधन यात युरोपियनांनी आघाडी घेतली. नियाच्या Aurel Stein यांनी शोधलेल्या प्राकृत भाषेतील (ज्या पुरातन मराठीशी साधर्म्य दाखवतात) लाकडी संदेशवाहक पाट्या असोत कि अशोकाचे पार विस्मरणात गेलेले शिलालेख...त्यांनी शोधले, वाचले आणि वर्गीकरनेही केली. लेणी असोत की स्तूप...यातही त्यांनी आघाडीच घेतली. एका फ्रेंच तरुणाने