Tag: अभिव्यक्ती

स्वतंत्र स्त्री

स्वतंत्र स्त्री

Poetry
प्रज्ञा विद्रोही स्वतंत्र अभिव्यक्तीची स्वतंत्र स्त्री खरच स्वतंत्र आहे का? सिद्धतेच्या शर्यतीला निघालेली ती उंबरठ्यातच हरली का? कारण तिला ठाऊकच नव्हतं ठिकाण शर्यतीचं, उंबरठ्याच्या आतल्या तिच्या पूर्वपरीक्षेच.. मग सुरू झाली तिची लढाई, व्यवस्थेविरुद्धची! अस्तित्वाच्या सिद्धतेआधी अस्तित्व शोधण्याची! ते संपवू पाहणाऱ्या हातांशी झगडण्याची, विजू पाहणाऱ्या ज्योतीला वादळातही थोपवण्याची! वादळापूर्वीची शांतता आता कलहच वाटू लागली, तीसुद्धा आता वादळाच्या व्यवस्थापनाचे डाव मांडू लागली! ढगांनी झाकोळलेल्या आकाशात कसं शोधायचं स्वतःला? घरात बेड्या न घराबाहेरचे दोर असताना त्यांच्या हाती! आमच्या जगण्याचा खेळ असा चौकात मांडला, अन फुकटात मजा घेणाऱ्यांचा डाव साधला! भोगणार्यांची अन उपभोगणारांची गर्दी वाढतच राहिली, शोषकांपासून.. शोषितांपर्यंतची! अन्याय, अवहेलना, लाचारीचा आता कहर झाला, अंधाराच्या मुक्ततेसाठी