Follow Us

Social

asantoshwebmagazin February 19, 2019

मुस्लीम राजवटीच्या काळात महाराष्ट्रातील सर्वच समाज निरनिराळया मार्गांनी त्रासला गेला होता. सरदारी, जहागिरी व वतनदारी यामुळे समजात शौर्य व पराक्रम निर्माण झाला होता. परंतु त्याचा उपयोग समाजालाच छळण्यासाठी व शोषण करण्यासाठी केला जात असे. समाजाच्या खालच्या स्तरातील लोक पारंपारिक हिंदु समाजव्यवस्थेमुळे विघटीत झालेले होते, दबलेले होते, त्यात मुस्लीम राजवटीची भर पडल्यामुळे शोषणात अधिक भर पडली होती. शिवाजी राजांनी स्वराज्य स्थापनेचे कार्य सुरू केल्यामुळे ब्राह्मणांपासून ते महार – मांग, कोळी , बेरड, दलदी, भंडारी इत्यादी जातींच्या लोकांना बरोबर घेऊन स्वराज्य उभे केले. त्यामुळे त्यांचाही विकास झाला.आर्थिक व सामाजिक क्षेत्रात त्यांना महत्व प्राप्त झाले. समाजातील दबलेल्या लोकांच्या अंगी असलेल्या विविध पारंपारिक गुणांमुळे स्वराज्याच्या उभारणीतील दलीत शोषित समाजाचे ऐतिहासिक स्थान स्पष्ट होऊ शकले. कोणताही माणूस जन्माने श्रेष्ठ नसून तो त्याच्या कर्तृत्वाने श्रेष्ठ होतो, हे सूत्र शिवाजी महाराजांच्या कार्यामुळे स्पष्ट होते.

asantoshwebmagazin February 15, 2019

ज्या पश्चिम महाराष्ट्राकडे सधन भाग म्हणून पाहिले जाते, त्याच भागात असंख्य गावे पाण्यासाठी तडफडत आहेत. पाणीदार असलेल्या गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. विहिरी, बोरवेल आटल्या आहेत. प्रदूषण वाढत आहे. हे सगळे प्रश्न निर्माण होत असताना कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील डोंगरदऱ्यातील गावे जलसंधारणासाठी एकवटली आहेत. दिनांक ९ डिसेंबर २०१९ रोजी पाणी फौंडेशन; महाराष्ट्र , अखिल भारतीय किसान सभा; कोल्हापूर, तुप्पुरवाडी को. ऑप. क्रेडिट सोसायटी; मुंबई यांच्या संयुक्त विद्यामानाने “पाणी परिषद” नरेवाडी येथे पार पडली.

asantoshwebmagazin February 15, 2019

कारखाना बंद पडल्याने बेरोजगार कामगारांचे थकीत ४ करोड ८१ लाख रुपये अडकलेले. By Aasantosh आजपासून पंधरा वर्षांपूर्वी वर्धा जिल्ह्यातील एक साखर कारखाना बंद पडला.या कारखान्यात काम करणाऱ्या ६०० पेक्षा अधिक कामगारांच्या नोकऱ्या गेल्या . कारखाना बंद होत असताना राहिलेले राहिलेले वेतन,भविष्य निर्वाह निधी अंतर्गत कपात करण्यात आलेली रक्कम सुद्धा कामगारांना देण्यात आली नाही. कारखाना बंद […]

asantoshwebmagazin February 13, 2019

खरे प्रेम हे कधीही निर्मित करता येत नाही. ये येत स्वतः – केव्हा कुणी नसतं बोलवत.. प्रेम हि पूर्णपणे नैसर्गिक अशी गोष्ट आहे.

asantoshwebmagazin February 11, 2019

  सतीश गोरे  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ    देशभरात विद्यार्थी-उच्च-शिक्षित बेरोजगार युवक या सरकारच्या शिक्षण-विरोधी धोरणामुळे व्याकूळ झालेला आहे. “देश का युवा भरे हुँकार, कहाँ गया मेरा रोजगार?” अशा घोषणा देत देशातील विद्यार्थी-उच्च-शिक्षित बेरोजगार तरुण छोट्या-मोठ्या शहरात वेग-वेगळ्या प्रश्नांना घेऊन आंदोलन करीत आहे. त्यातीलच एक कडी म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीजवळील संविधान स्थंभाशेजारी […]

asantoshwebmagazin February 7, 2019

नवनाथ मोरे शेती विकासाचे नवनवे टप्पे पार करत असताना फक्त नफ्यासाठी उत्पादन, हे तत्व अवलंबले गेल्यामुळे घटती उत्पादकता आणि क्षारपड जमिनी हे एक संकट समोर येत आहे. माती तयार होण्यास हजारो वर्षे लागतात. त्यामुळे उत्पादन करत असताना त्याच्याकडे लक्ष देण्याची गरजेचे होते. परंतु ते दिले गेले नाही, हे वास्तव आहे. ज्या पश्चिम महाराष्ट्राकडे आपण सधन […]

asantoshwebmagazin January 30, 2019

डॉ. प्रेरणा उबाळे महात्मा गांधी आपले व्यक्तिमत्व, विशिष्ट जीवन पद्धत, कार्य, आचरण आणि विचारांच्या असामान्यतेमुळे जगन्मान्य झाले. एक व्यक्तिविशेष असूनदेखील ते आज सत्य, अहिंसा, करुणा अशा मानवी जीवनाच्या शाश्वत आणि उदात्त मूल्यांचे प्रतीक बनले आहेत. एवढेच नाही तर भारतात न्याय, राजकारण, समाज, वैयक्तिक जीवनामध्ये नैतिक अधिष्ठानासारखे ते प्रतिस्थापित झाले आहेत. कोर्ट, सरकारी कार्यालयांमध्ये त्यांच्या प्रतिमांची […]

asantoshwebmagazin January 25, 2019

जेष्ठ भारतीय लेखिका नयनतारा सहगल यांच्यासोबत मराठी कला-साहित्य विश्वातील लेखक-कवी,रसिक यांच्या संवादाचा कार्यक्रम ‘चला एकत्र येऊ या!’ चे आयोजन मराठी साहित्य आणि कलाविश्वातील लेखक-कलावंत आणि रसिक यांनी एकत्र येऊन २९ जानेवारीला सायंकाळी शिवाजी मंदिर, दादर इथे केले आहे. नयनतारा सहगल यांच्या उपस्थितीत अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर चर्चा करणारा हा संवाद मेळावा पार पडणार आहे. ९२व्या अखिल भारतीय […]

asantoshwebmagazin January 25, 2019

या देशातल्या संघ भाजपा सत्ताधारी वर्गाने स्वतःच्या सोयीनुसार राष्ट्रवादाची व देशभक्तीची एक कल्पना उभी केली आहे .समस्त भारतीय लोकांनी त्यांनी ठरवलेल्या राष्ट्रवादाच्या व देशभक्तीच्या कल्पनेशी मानसिक रित्या जोडून घेतले पाहिजे किंवा त्याच्या प्रति पूर्णपणे निष्ठा ठेवली पाहिजे असा सत्ताधारी संघ आणि भाजप परिवाराचा आग्रह आहे .जे कोणी त्याच्याशी या बाबतीत सहमत होणार नाही त्यांना ते […]

asantoshwebmagazin January 24, 2019

समीर वर्तक बुधवार दिनांक 23 जानेवारी 2019 रोजी मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन साठी सुमारे 88,000 कोटी कर्ज देणारी जपानची JICA कंपनीचे प्रतिनिधी पालघर जिल्ह्यात “बुलेट ट्रेन” विरोधातील नागरिकांना भेटण्यास आलेले होते. त्यांनी हनुमान नगर, मान व नागझरी या गावातील नागरिकांना भेट दिली. आम्ही आमची एक इंचही जमीन देणार नाही, बुलेट ट्रेन पासून आम्हाला काहीही फायदा नाही, […]

asantoshwebmagazin January 21, 2019

प्रस्तावित मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी 69 गावांनी जमीन देण्यास संमती दिल्याचा हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन कडून खोटा प्रचार केला जात आहे. पालघर जिल्ह्यात बुलेट ट्रेनला सर्वाधिक विरोध होत आहे. गेली दोन वर्षे साधा सर्वे देखील होऊ दिलेला नाही. गेल्या 8 जानेवारीलाच पालघर जिल्ह्यात पडघा येथे सर्वे करण्याचा प्रयत्न झाला तो ग्रामस्थानी, आंदोलकांनी हाणून पाडला. तसा […]

asantoshwebmagazin January 10, 2019

अॅड. गिरीश राऊत आज मुंबईच्या बेस्ट या सार्वजनिक बस सेवेतील कर्मचार्यांच्या संपाचा तिसरा दिवस. इतर वेळी माणसे रस्त्यावर उतरतात. पण येथे नेहमी रस्त्यावर असणार्या ड्रायव्हर कंडक्टरना घरी थांबावे लागले. पगारवाढ व इतर रास्त मागण्यांसाठी संप करणार्या कर्मचार्यांना जनतेने सहानुभूती व पाठिंबा देण्याची गरज आहे. सोबत रस्त्यावरील वाहतुकीत असलेली बेस्ट बसची महत्वाची भूमिका स्पष्ट करणारे पत्रक […]

asantoshwebmagazin January 8, 2019

४, ५ आणि ६ जानेवारी दरम्यान पुण्यातील आझम कॅम्पसमध्ये १२वे अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन झाले. या संमेलनाचे अध्यक्ष होते डॉ. अलीम वकील. त्यांच्या अध्यक्षीय भाषणाचा हा संपादित अंश.. सांप्रत काळ इतक्या श्रवणाचा आहे की, जिभेचे कार्य केवळ ‘चव’ घेण्याचे आहे, अशी खात्री होऊ लागली आहे. सतत ऐकतच राहण्याने ऐकणारे संभ्रमित होतात आणि सतत […]

asantoshwebmagazin January 7, 2019

यवतमाळ येथे 11 ते 13 जानेवारी या कालावधीत होणाऱ्या 92व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटक म्हणून ज्येष्ठ साहित्यिका नयनतारा सहगल यांना आमंत्रित करण्यात आले होते. मात्र त्यांच्या निवडीवरून झालेल्या वादानंतर संमेलनाच्या आयोजकांनी सहगल यांना उपस्थित राहण्यास नकार कळवला.    नयनतारा सहगल  यांचे उद्घाटनाचे संपूर्ण भाषण इथे देत आहोत. सध्याच्या सामाजिक-राजकीय परिस्थितीवर त्यांनी महत्वपूर्ण  भाष्य […]

asantoshwebmagazin January 7, 2019

यवतमाळ येथे होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उदघाटन ज्येष्ठ साहित्यिक नयनतारा सेहगल यांच्या हस्ते होणार होते. परंतु त्या इंग्रजी भाषेच्या साहित्यिक असल्यामुळे ऐनवेळी त्यांना नाकारण्यात ( आधी निमंत्रण देऊन) आले. साहित्य महामंडळ असो किंवा आयोजक असो, त्यांना नाकारण्यामागे जे कारण देत आहेत ते मनाला न पटण्यासारखे आहे. नयनतारा या पंडित नेहरू यांची भाची […]

asantoshwebmagazin January 3, 2019

प्रगती बाणखेळे  आपला समाज परंपरेने प्रतीकांमध्ये रमणारा आहे. सामाजिक चळवळीही याला अपवाद नाहीत. ही प्रतीकं त्या त्या काळात समाजाला एकत्र आणायला, लोकांना प्रेरणा द्यायला खूप महत्त्वाची ठरली हे निःसंशय. खादी आणि चरखा हे स्वातंत्र्य चळवळीत मोलाचे ठरले. सारा देश गांधींच्या विचारांकडे आकर्षित करण्यात या प्रतीकांचा मोठा वाटा होता. पण काळ बदलला आहे. प्रतीकं ही अस्मितांची […]

asantoshwebmagazin December 31, 2018

अनिकेत लखपती   ३१ डिसेंबर २०१७ वर्षाचा शेवटचा दिवस. या दिवसाची पहाटही माझ्यासाठी इतर अनेक दिवसांप्रमाणेच होती. फक्त त्यात एकाच भावना नवीन होती ती म्हणजे, ‘जी मजा वर्षभर करू शकलो नाही ती आज करू’ आणि आनंदात दिवस घालवू. विचार केल्याप्रमाणे हा शेवटचा दिवस मनापासून जगलो. हे सगळ करत असतांना या वर्षी केलेल्या कोणत्याच चुकीच्या गोष्टी […]

asantoshwebmagazin December 31, 2018

                                  ( आज  कॉम्रेड राजीव कालेलकर यांचा स्मृतिदिवस आहे. स्त्री मुक्ती चळवळ, मागोवा,लालनिशान,युवा भरात,श्रमिक मुक्ती दल आदी संघटनांचे ते सक्रिय पाठीराखे होते. कला,साहित्य,राजकारण इत्यादी वर भरभरून बोलणारे व लिहिणारे ते कार्यकर्ते विचारवंत होते. त्यांनी विविध विषयावर लिहिलेल्या लेखांचे पुस्तक […]

asantoshwebmagazin December 22, 2018

महेंद्र लंकेश्वर पश्चिम उत्तरप्रदेशातील सहाराणपूर जिल्ह्यात , त्यातील घडकौली गावात दलितांच्या सामूहिक हत्येचे , त्यांची जवळपास शंभरावर घरे , झोपड्या जाळण्याचे , लूटण्याचे जे अमानवीय , भीषण कांड घडले त्यांच्या मुळाशी ठाकूर , राजपु्त , सरंजामी जमीनदार आहेत हे लपून नाही उघड आहे पण त्यांना पाठीशी घालून चिथावणी देणारे उत्तरप्रदेशचे भगवी कफनीधारी सरकार आहे हेही […]

asantoshwebmagazin December 21, 2018

विषमतेचा अनभिज्ञ प्रवास जातीय ते आर्थिक असाही होतोय का ? तो इंजिनियर होणार अन ती देखील , नव्या पिढीचे नेतृत्व करताना लग्नासारखा निर्णय घेणारे ते दोघे शारीरिक व मानसिक सदृढ . तेरे मेरे बीच मे असणारे बंधन त्यांनी डॉ . आंबेडकरांच्या कायद्याकडून संमत करून घेतले .दोन मनातील रेशीम बंध त्यांनी रेशीम गाठीत बांधून देखील घेतले […]

asantoshwebmagazin December 17, 2018

युव्हाल नोआ हरारी या सध्या चर्चेत असणाऱ्या अभ्यासकानं आपल्या पहिल्या पुस्तकाला दिलेलं ‘सेपियन्स’ हे नाव लक्षणीय आहे. माणूस हा भावनिक-बौद्धिकदृष्ट्या व वर्तनदृष्ट्या एक ‘गुंतागुंतीचा प्रकार’ असला तरी ज्या एका अंशतः आकलनीय-अंशतः अनाकलनीय, निरंतर चालणाऱ्या ‘वैश्विक प्रक्रिये’चा तो एक हिस्सा आहे, त्या प्रक्रियेच्या दृष्टीनं त्याची ओळख, त्याचं स्थान ‘सेपिअन्स’ हेच आहे. हे नामाभिधान माणसाला ‘पृथ्वीवरील विशेष महत्त्वाची, […]

asantoshwebmagazin December 16, 2018

पर्यावरण संघर्ष समितीच्या वतीने २८ डिसेंबर  २०१८ रोजी वायएमसीए मैदान,माणिकपूर,वसई (प) येथे पर्यावरण संवर्धन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून सदर  कार्यक्रमास गुजरात राज्यातील आमदार जिग्नेश मेवानी  उपस्थित राहणार आहेत. फादर दिब्रिटो यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित पर्यावरण संवर्धन मेळाव्याचे उदघाटन आदिवासी एकता परिषदेचे नेते काळुराम काका धोदडे यांच्याहस्ते होणार असून माजी मंत्री,नगररचनाकार चंद्रशेखर प्रभू यांची विशेष उपस्थिती […]

asantoshwebmagazin December 6, 2018

डॉ.सोपान शेंडे 28 नोव्हेंबर रोजी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुण्यस्मरण दिनी वडिलांनी (श्री. रामलाल गणपत शेंडे) इहलोकीची यात्रा संपविली हा योगायोग म्हणा किंवा त्यांचे भाग्य म्हणा, परंतु त्यामुळे विचारांचे भूतकाळाचा वेध घेण्याचे चक्र सुरू झाले. त्या प्रक्रियेतूनच हा मृत्यूलेख लिहिणची प्रेरणा मिळाली. चांदा गावः- नेवासे तालुक्यातील चांदा हे सर्वांगाने सपंन्न असे एक महत्वाचे गाव. राजकारण, […]

asantoshwebmagazin November 30, 2018

भारतीय शेतकरी व वित्त भांडवल आपल्या मागण्या घेऊन दिल्लीत धडकल्या लाखो शेतकरी बांधवाना लाल सलाम ! आजच्या घडीला भारतीय शेतकऱ्यांना वित्त भांडवल तीन बाजूने भिडत आहेत (१) मुबलक कर्ज पुरवठा, (२) शेतीमालाच्या भावांवर कमोडिटी एक्सचेंजमधील व्यवहारांचा निर्णायक प्रभाव आणि (३) पीक विमा मागे वळून बघितले कि लक्षात येते फक्त पाच वर्षांपूर्वी देखील हि परिस्थिती नव्हती […]

asantoshwebmagazin November 27, 2018

भरभराट इच्छिणा-या कोणत्याही समाजाला परंपरा मांडून दाखवणारे मनू लागतात , तसेच मनूंनी मांडून ठेवलेल्या पंरपरा जेव्हा घट्ट , खोडागत बनून पुढची वाट थांबवून धरतात , तेव्हा मनूंना आव्हान देणारे फुलेसुद्धा आवश्यक असतात… अशी मांडणी केली विदुषी दुर्गा भागवत यांनी. २ एप्रिल १९८९ ला महाराष्ट्र टाइम्सच्या मैफल पुरवणीत हा लेख छापून आला होता.. ……………………………. गेले काही […]

asantoshwebmagazin November 26, 2018

॥प्रासंगिक॥ २६ नोव्हेंबर : संविधान दिन    देश स्वतंत्र झाला. पण देशापुढे संविधान लिहिण्याचा यक्षप्रश्न उभा राहिला. आमच्या बाबासाहेबांनी तो प्रश्न निकालात काढला. बाबासाहेबांनी लिहीलेलं संविधान म्हणून आम्ही त्याचा खुप खुप अभिमान बाळगू लागलो. अभिमानाची जागा पुढे गर्वाने बळकावली. धर्मग्रंथांसारखंच संविधानाचं स्थान आमच्यादृष्टीने सर्वोच्च बनले. परिणामी ‘होली बायबल’, ‘पवित्र कुराण’ आणि ‘परमपवित्र गीते’सारखा, संविधानही कधी […]

asantoshwebmagazin November 22, 2018

काही व्यक्तींनी सोशल मिडियावरून व्हायरल केलेले श्रामनेर शिबिराचे फोटो पाहण्यात आले. त्यात श्रामनेर म्हणून बसलेल्या व्यक्तीचे महिलांनी पाय धुणे आणि ते पुसणे अशा बाबी स्पष्ट दिसत होत्या. यासंदर्भात भंतेजी बरोबर येथील सामाजिक न्यायभवनात मी त्यांच्यासोबत चर्चाही केली. मात्र “पाय धुणे-पुसणे योग्य असल्याचा निर्वाळा करत अनुयायांनी हे केलेले कृत्य त्यांच्या श्रद्धेचा विषय असल्याच त्यांनी सांगितलं.” दरम्यान […]

asantoshwebmagazin November 20, 2018

                          लेखिकेच्या विनंतीवरून कुठलेली संपादकीय संस्कार न करता सदर लेख “असंतोष” च्या वाचकांकरिता प्रकाशित करीत आहोत. हा लेख सकाळ दिवाळी अंकात प्रकाशित झाला आहे ह्याची वाचकांनी नोंद घ्यावी.                                […]

asantoshwebmagazin October 31, 2018

सुभाषचंद्र सोनार पाच दिवसाच्या गणपतीसारख्या आमच्या देशातल्या पंचवार्षिक निवडणूकाही गणोत्सवच बनल्या आहेत. गणेशोत्सवात गणेश मंडळं दरवर्षी नवनवीन देखावे सादर करतात. आणि गणेशविसर्जनानंतर पुढील वर्षी ते विकून नवे देखावे पेश करतात. त्याचप्रमाणे राजकीय पक्षही निवडणुकीत आश्वासनरुपी नाना देखावे जनतेसमोर उभे करतात आणि निवडणूक झाली, की स्वतःच त्या देखाव्यांची वाट लावून, पुढील गणोत्सवासाठी नवीन देखाव्यांचा शोध घेऊ […]

asantoshwebmagazin October 30, 2018

अॅड.गिरीश राऊत गंगेचे पावित्र्य जपण्यासाठी संत ज्ञान स्वरूप सानंद यांनी ११२ दिवस उपोषण करून प्राणत्याग केला. या आधी स्वामी निगमानंदांनी बलिदान दिले. आता फक्त ३६ वर्ष वयाचे संत गोपालदास यांनी २४ जूनपासुन चालू असलेल्या उपोषणात प्राण पणाला लावले आहेत. संत शिवदास हे त्यानंतर समर्पणासाठी तयार आहेत. गंगा प्रदूषित होणे, तिचा प्रवाह अवरूध्द होणे, यामुळे भारतीय […]

asantoshwebmagazin October 27, 2018

अनिल प्रकाश/अनुवाद – डॉ.प्रेरणा उबाळे अनेक लोकांना गांधींचा मार्ग अव्यावहारिक वाटतो. मी जेव्हा शाळेत शिकत होतो तेव्हा गांधीजींची आत्मकथा (सत्याचे प्रयोग) वाचली होती आणि त्यामुळे मी खूप भारावून गेलो होतो. त्या वेळी मी त्यांची शिकवण प्रत्यक्ष आयुष्यात उतरवण्याचा प्रयत्न केला मात्र मी अयशस्वी झालो ; उपरोध आणि निराशा मिळाली. तेव्हा मलाही असे वाटू लागले होते […]

asantoshwebmagazin October 25, 2018

  बदललेल्या जीवनशैलीमुळे आणि कुटुंबसंस्थेच्या ऱ्हासामुळे मुलं आणि मोठ्यांतही एकाकीपणाच्या भावनेची लागण होते आहे. किंबहुना एकाकीपणा किंवा आपण दुर्लक्षिले जात आहोत या भावनाच संभाव्य मानसिक विकारांची पहिली पायरी असते. या पायरीवरच जर मानसिक सुरक्षा कवच मिळाले नाही तर स्वाभाविकपणेच मूल मनोविकारी बनू शकते. भारतीय नागरिकांचे मानसिक आरोग्य दिवसेंदिवस ढासळत चालले आहे. आपल्या देशात मनोविकार असलेल्यांची […]

asantoshwebmagazin October 25, 2018

                                                                       विक्रम पटेल, शेखर सक्सेना / अनुवाद : डॉ. दीपक बोरगावे                          मानसिक […]

asantoshwebmagazin October 24, 2018

  महाराष्ट्राच्या वर्धा  जिल्ह्यातील दिग्रस गावातील दलितांच्या स्थितीवर दृष्टीक्षेप टाकणारा हा लेख डॉ. मुकेश कुमार व त्यांच्या चमूने केलेल्या  अभ्यासाचा अहवाल आहे.  हा मूळ अहवाल हिंदीत असून अहवालात  “पूरब  टोला’ असा शब्द वापरण्यात आला आहे.  मराठीमध्ये गावातील जुनी पिढी दिशांना कधीही पूर्व-पश्चिम असे संबोधत नव्हती तर ती खाली-वर असे संबोधित होती. उदाहरणादाखल पूर्वेस असणाऱ्या एखाद्या स्थानाला खालच्या […]

asantoshwebmagazin October 22, 2018

    रवीश कुमार  हिंदुस्थान टाईम्सच्या विनित सचदेवा  यांनी एक  भांडाफोड केली आहे.  मेक इन इंडिया च्या अंतर्गत मोबाईल फोनची आयात कमी झाली आहे आणि ते आता भारतातच तयार केले जातात.असा सरकार चा दावा आहे. असं खोटं  यासाठी सांगण्यात येऊ लागलं कि मोबाईल फोन भारतात बनायला लागल्याने रोजगार निर्मिती होते आहे. वास्तविक पाहता मोबाईल फोन हे […]

asantoshwebmagazin October 18, 2018

  देवकुमार अहिरे प्रस्तावना–                जात्योन्नती, जातीयुद्ध कि जातीअंतक लढाई यापैकी आपणास एकाची निवड करावीच लागेल. जातीअंताची लढाई जेंव्हा जेंव्हा तीव्र होवून उभी राहण्याचा प्रयत्न करते त्या त्यावेळी प्रत्येक जातीतील अभिजन आणि सत्ताधारी वर्ग इतर जातीला शत्रु ठरवून जातीअंतक लढाईला फोडून जातीयुद्धाकडे घेवून जाण्याचा प्रयत्न करतांना दिसतो. जातीआधारित आंदोलनाला जातीवर्ग व्यवस्था विरोधी वैचारिक दिशा असली तरच ते व्यापक होवून स्वतःच्या मूळ समस्या सोडवू शकते […]

asantoshwebmagazin October 18, 2018

सुभाषचंद्र सोनार तथागत गौतम बुद्धांनी भिक्खुंना ‘माझ्या कालबाह्य विचारांचे नव्हे, तर कालातित विचारांचे वारसदार व्हा!’ असा मोलाचा संदेश दिला होता. त्यांच्या अनुयायांनी त्या संदेशाचं डोळ्यात तेल घालून पालन केले. त्यामुळेच भिक्खुसंघात स्रियांना प्रवेश दिल्यावर ‘माझा धम्म जो हजार वर्षे टिकला असता, तो आता पाचशेच वर्ष टिकेल,’ ही तथागतांनी व्यक्त केलेली भीती निराधार ठरुन, त्यांच्या निर्वाणानंरही […]

asantoshwebmagazin October 18, 2018

महात्मा बुद्धांनी धर्म आणि धार्मिक पंथात बोकाळलेल्या जातीभेदाला आव्हान देत आपल्या पंथाचे दरवाजे निम्न,वंचित जातींकरीता खुले केले. त्यामुळे या जातीमध्ये बौद्ध धर्माप्रती मोठे आकर्षण निर्माण झाले होते.बुद्धांच्या संघात महत्त्वपूर्ण व्यक्तीमध्ये उपाली हे एक होते. ते बुद्धोतर काळात संघाच्या नियमानुसार वरिष्ठ स्थानी पोचले.ते पूर्वाश्रमीचे न्हावी होते. त्यांचा व्यवसाय घृणास्पद मानल्या जात असे. याचप्रकारे सुनीत हा पुक्कुस […]

asantoshwebmagazin October 17, 2018

सौरभ वाजपेयी,दिल्ली. इसवी सन १९१७ मध्ये महात्मा गांधी यांनी आपले पहिले आंदोलन कृषी आणि शेतकऱ्यांच्या समस्यांसंदर्भात व चंपारण येथील सत्याग्रहाने सुरु केले होते  आणि आज १०० वर्षांनंतरही देशासमोर पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या समस्या मोठे चिंतेचे कारण बनल्या आहेत ही योगायोगाची गोष्ट आहे .  शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागण्या आणि आंदोलने वेगाने देशातील सगळ्या राज्यांमध्ये पसरत आहेत. शिवाय शेतकऱ्यांच्या […]

asantoshwebmagazin October 10, 2018

                                                                         रिबले शुभम आश्विन मासारंभापासून देशात नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. आपल्या राज्यात हा उत्सव घटस्थापनेचा उत्सव व कृषीमायेचा उत्सव म्हणून साजरा […]

asantoshwebmagazin October 6, 2018

By Aasantosh Team आधुनिक भारतातील  शेतकरी आंदोलनाच्या अग्रणींपैकी  एक प्राध्यापक एन जी रंगा स्वतः एका शेतकऱ्याचे पुत्र होते. त्यांनी गुंटूर ग्रामीण विद्यालय ते ऑक्सफर्ड मधून अर्थशास्त्राचे शिक्षण पूर्ण केले . जेव्हा ते गांधीना भेटत तेव्हा त्यांना ते प्रश्न विचारून हैराण करीत असत आणि कधी कधी लांबलचक पप्रश्नावली ते गांधीना आधीच पाठवून देत असत.१९४४ साली गांधी जेव्हा […]

asantoshwebmagazin October 3, 2018

         सहा लेनचे मार्ग,गगनचुंबी इमारती,बुलेट ट्रेन  असा इंडिया निर्माण करण्याकरीता ग्रामीण भारताचा बळी दिला जातो आहे.  दिल्ली मुंबई औद्योगिक प्रकल्प,नदीजोड प्रकल्प हे कुणाच्या फायद्याचे आहेत  ?  शहरी इंडियाच्या निर्मितीसाठी ग्रामीण भारताचा बळी का दिल्या जातो आहे ? देविंदर शर्मा ,  अनुवाद – प्रेरणा उबाळे      आपण एका अशा देशामध्ये राहतो जो इंडिया आणि भारत यांच्यामध्ये विभागला […]

asantoshwebmagazin October 2, 2018

सुभाषचंद्र सोनार चरख्याचा स्वातंत्र्य आंदोलनाशी संबंध असला तरी, चरख्याला स्वातंत्र्य प्राप्तीचं साधन म्हणून, कोणीही प्रोजेक्ट केलं नव्हतं. त्यामुळे चरख्याचा संबंध स्वातंत्र्य आदोलनाशी कधी व का आला, हे समजून घेणं गरजेचं आहे. तसे समजून घेतले तरच ना जाने कितने झूले फांसी, कितनों ने गोली खाई। क्यूं झूठ बोलते साहिब, कि चरखा चलाने से आजादी आई॥ या […]

asantoshwebmagazin October 2, 2018

By Aasantosh महात्मा गांधी सर्व धर्माचा आदर करण्यास सांगत.त्यांनी सायंकाळच्या प्रार्थना सभेत सर्व धर्माची भजने व गीते गाण्याची परंपरा सुरू केली होती.सगळ्या धर्मातील चांगुलपणा लोकांनी घ्यावा व त्यानुसार आचरण करावे अशी त्यांची धारणा होती.गांधी आध्यात्मिक होते,धार्मिक होते.आध्यत्मिक बाबींना केंद्रीयस्थानी ठेवण्याच्या गांधींच्या विचारास डॉ.आंबेडकर यांच्यासारख्याच्या टिकेस सामोरे जावे लागले होते. त्यातून गांधींचा वैचारिक संवाद आंबेडकराशी सूरु […]

asantoshwebmagazin October 1, 2018

महात्मा गांधी या जगातून जाऊन ७० वर्षे झाली आहेत. या सात दशकात खूप सारे टीकाकार सुद्धा त्यांच्या मार्गाने नंतर मार्गक्रमण करताना दिसले.कमीतकमी सार्वजनिकरीत्या भारताचे जवळपास सर्वच राजकीय पक्ष हे गांधीजीविषयी श्रद्धा व्यक्त करताना दिसतात.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक ते प्रधानमंत्री असा प्रवास झालेल्या नरेंद्र मोदींनी गांधीच्या चष्म्याला आपल्या सरकारच्या प्रतीक चीन्हासारखे बनवून टाकले तेव्हा भारतातील सर्व […]

asantoshwebmagazin October 1, 2018

   संजय सोनवणी  महात्मा गांधीं स्वतंत्रतावादी होते. समाजवादाचे ते कधीही समर्थक नव्हते. थोडक्यांच्या भांडवलशाहीलाही त्यांनी विरोधच केला होता. समाजवादात शासनाच्या हातात जास्त अधिकार जातात त्यामुळे नागरिकांवर अधिकाधिक बंधने घालणे सोपे जाते महात्मा गांधी म्हणाले होते,          . “राज्याचे अतिरिक्त अधिकार व नागरिकांचे किमान स्वातंत्र्य ही बाब मी भयप्रद मानतो .राज्याला अधिक अधिकार […]

asantoshwebmagazin September 30, 2018

जगदीश्वर चतुर्वेदी कालपासून मोदीच्या अंधभक्तांनी फेसबुकपासून ते टिव्ही चॅनलवर जी राष्ट्रवादी नागडेपणा चालविला आहे तो अत्यंत लज्जास्पद आहे.ह्या साऱ्या बाबी देशाच्या जनतेने किती भयंकर लोकांच्या ताब्यात सत्ता दिली आहे याकडे वारंवार इशारा करीत आहेत. यावरून एक निष्कर्ष असाही निघतो की,टीव्ही न्यूज चॅनल हे बातम्या देण्याच्या आपल्या कामापासून खूप दूर गेले आहेत. जे लोक मोदींच्या हातात […]

asantoshwebmagazin September 18, 2018

आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून आदिवासी समाजाच्या विकासासाठी विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात.याच विभागामार्फत आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात यावे,शिक्षण घेता यावे.यासाठी राज्यभरात 491 वसतिगृहे चालवली जातात.या वसतिगृहांमध्ये 58 हजारहून अधिक विद्यार्थी वास्तव्य करतात. वसतिगृहांमध्ये जेवण,नाष्टा,शैक्षणिक साहित्य,बेडिंग साहित्य,निर्वाह भत्ता इ. सुविधा पुरविल्या जातात.       आदिवासी समाजाच्या सामाजिक प्रगतीत आश्रमशाळा,वसतिगृह यांचा महत्वाचा वाटा राहिला आहे.ज्या समाजाच्या […]

asantoshwebmagazin September 17, 2018

मी बारावीत असतांना पहिल्यांदा कॉ. शरद पाटील नावाच्या म्हाताऱ्या माणसाचे भाषण ऐकले होते. मी आणि नितीन वाव्हळे (हल्ली, एस. एफ. आय. चे विद्यार्थी नेते) त्यावेळी औरंगाबाद शहरात सार्वजनिक कार्यक्रम असले की, आम्ही बहुतेकवेळा हजरच असायचो. मुख्य कारण म्हणजे अशा कार्यक्रमात खायला चांगले असते आणि दुय्यम कारण म्हणजे डोक्याला खूराक मिळतो. ते कॉ. आहेत तेंव्हा ऐकले […]

asantoshwebmagazin September 17, 2018

विचारवंतांच्या हत्या करण्यात आरोपी म्हणून पकडलेले सर्व तरुण हे वय वर्ष 18 ते 30 दरम्यानचेच आहेत. त्यांची पार्श्वभूमी पहिली तर ते ओबीसीच्या छोट्या जातींमधून येतात, काबाडकष्ट करणाऱ्या वर्गातून ते येतात. ब्रेनवॉश केलेल्या या तरुणांना हत्या करण्यासाठी नथुराम गोडसे चा आदर्श समोर ठेवला जातो… राम, नरसिंह आणि अर्जुनाचा आदर्श ठेवला जातो…. हे सार विष पेरण्याची सुरवात […]

%d bloggers like this: