जम्मू कश्मीर,कलम ३७० व श्यामाप्रसाद मुखर्जी

जम्मू कश्मीर,कलम ३७० व श्यामाप्रसाद मुखर्जी

Political, Uncategorized
सुभाष गाताडे जम्मू- कश्मीर ला विशेष दर्जा प्रदान करणाऱ्या कलम ३७० सबंधी भारतीय जनसंघाचे संस्थापक राहिलेल्या श्यामाप्रसाद मुखर्जीचे नाव भाजपाकडून घेतले जात नाही असा एकही प्रसंग नाही.. हि बाब वेगळी कि नवी तथ्ये समोर आल्यानंतर हा दावाच प्रश्नाच्या घेऱ्यात आला आहे. त्यांनी कश्मीर ला विशेष दर्जा देण्याचा विरोध केला म्हणून त्यांना अटक करण्यात आले होते. वादग्रस्त अशा परिस्थितीत मुखर्जीचा मृत्यू झाला होता.त्यांनी सुरुवातीला ३७० कलमाच्या अनिवार्यतेला स्वीकारले होते.असे आता म्हटले जात आहे. या संदर्भात ए जी नुरानी यांचे “आर्टिकल 370 : ए कॉन्स्टीटयूशनल हिस्टरी ऑफ जम्मू एंड कश्मीर”( आक्सफर्ड युनिवर्सिटी प्रेस,पान 480 ) हे पुस्तक स्वातंत्र्याच्या मिळाल्याच्या तात्काळ नंतरच्या झंझावाती दिवसातल्या जम्मू आणि काश्मीरच्या परिस्थितीला घेऊन असलेल्या खूप अशा शंकांना दूर करते. आधिकारिक दस्ताऐवज,पत्रव्यवहार
… तर जागृत,अज्ञानी,जनतेचा असंतोष मजबूत बळाची सैनिकी सत्तासुद्धा रोखू शकणार नाही – म.गांधी

… तर जागृत,अज्ञानी,जनतेचा असंतोष मजबूत बळाची सैनिकी सत्तासुद्धा रोखू शकणार नाही – म.गांधी

Political, Social
By Aasantosh Team आधुनिक भारतातील  शेतकरी आंदोलनाच्या अग्रणींपैकी  एक प्राध्यापक एन जी रंगा स्वतः एका शेतकऱ्याचे पुत्र होते. त्यांनी गुंटूर ग्रामीण विद्यालय ते ऑक्सफर्ड मधून अर्थशास्त्राचे शिक्षण पूर्ण केले . जेव्हा ते गांधीना भेटत तेव्हा त्यांना ते प्रश्न विचारून हैराण करीत असत आणि कधी कधी लांबलचक पप्रश्नावली ते गांधीना आधीच पाठवून देत असत.१९४४ साली गांधी जेव्हा तुरुंगातून बाहेर पडले तेव्हा प्राध्यापक रंगा प्रश्नांची झडी घेऊन गांधींना भेटण्यास पोचले. २९ ऑक्टोबर  ,१९४४ ला झालेल्या या मुलाखतीचा प्रश्न फार तीक्ष्ण होता. “ तुम्ही म्हणता कि हि धरती शेतकऱ्यांची आहे किंवा असली पाहिजे. याचा अर्थ फक्त कसेल त्या जमीनीवर त्याची मालकी असेल कि ज्या राज्यात तो राहतो तेथील राजकीय सत्ता सुद्धा त्याच्या ताब्यात असेल. जर शेतकऱ्यांजवळ फक्त जमीन असेल आणि राजकीय सत्ता नसेल तर त्यांची स्थिती वाईट होईल जशी सो
भाजपचे महात्मा गांधी व्हाया संघ!

भाजपचे महात्मा गांधी व्हाया संघ!

Political, Uncategorized
संजय सोनवणी महात्मा गांधी आजही जगभरच्या लोकांवरच नव्हे तर आंतरराष्ट्रीय नेत्यांवर प्रभाव टाकुन असणारे एक आदरणीय व्यक्तीमत्व आहे. जगभरच्या स्वातंत्र्य लढ्यांना अहिंसा आणि सत्याग्रहाच्या अभिनव हत्याराने झुंजण्याचे आत्मीक बळ गांधीजींनी दिले. सहनशीलता आणि सहिष्णुता त्यांच्या जीवनाचा एक अतुट भाग होता. आता भारतात भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे. भाजप हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पोलिटिकल विंग आहे हे सर्वश्रुत आहेच. हे सरकार सत्तेत आल्यानंतर त्यालाही गांधीजींसमोर नतमस्तक झाल्याचा देखावा करणे भाग पडले हे महात्मा गांधींच्या जागतीक जनमानसात टिकून राहिलेल्या प्रतिमेमुळे. पंतप्रधान मोदी जेथेही परदेशात गेले तेथे तेथे त्यांना गांधीजींचा पुतळा गाठत त्यासमोर नतमस्तक व्हावे लागले. हेच नव्हे तर गांधीजींचेही अपहरण करण्याचा कट राबवला जातो आहे की काय अशी शंका यावे एवढ्या नौटंक्या केल्या गेल्या. मोदींनी गांधीज
राफेल प्रकरणी नरेंद्र मोदी व अंबानी विरोधात तक्रार दाखल.

राफेल प्रकरणी नरेंद्र मोदी व अंबानी विरोधात तक्रार दाखल.

Reportage
वरिष्ठ वकील प्रशांत भूषण, वरिष्‍ठ पत्रकार अरुण शौरी आणि भाजपा नेता यशवंत सिन्‍हा यांनी आज सीबीआय संचालकास भ्रष्‍टाचार विरोधी कायद्याअंतर्गत राफेल विमान की खरेदी प्रकरणात तक्रार दाखल केली. ही तक्रार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, अनिल अम्‍बानी, ट्अन्‍य लोकसेवकांच्या विरुद्ध दाखल केली आहे. तक्रारीचे निवेदन एकूण ३२ पानांचे आहे . ही तक्रार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, अनिल अम्‍बानी, ट्अन्‍य लोकसेवकांच्या विरुद्ध दाखल केली आहे. तक्रारीचे निवेदन एकूण ३२ पानांचे आहे . see Detailed News & Complaint http://www.mediavigil.com/news/complaint-against-modi-ambani-and-others-to-cbi-in-rafale-scam/
नवनाथ मोरे लिखित “पर्यावरण आणि विकास” पुस्तकाचे नांदेड येथे प्रकाशन

नवनाथ मोरे लिखित “पर्यावरण आणि विकास” पुस्तकाचे नांदेड येथे प्रकाशन

Reportage
आज पर्यावरणीय समस्येने गंभीर रूप धारण केले आहे. पर्यावरण की विकास असा प्रश्न आपल्याकडे वारंवार चर्चिल्या जातो .विकास करायचा तर पर्यावरणाकडे थोडे तरी दुर्लक्ष होणारच अशी भूमिका मांडली जाते. नवनाथ मोरे मात्र पर्यावरण हित डोळ्यासमोर ठेवून प्रकृती मानव केंद्री विकास होऊ शकतो असे भूमिका मांडतात असे मत मान्यवरांनी "पर्यावरण आणि विकास" या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी व्यक्त केले . युवा कार्यकर्ते नवनाथ मोरे यांनी लिहिलेल्या लेखाचे संकलन पुण्याच्या मैत्री पब्लिकेशन नी प्रकाशित केले आहे. "पर्यावरण आणि विकास" पुस्तकाचे प्रकाशन नांदेड येथील स्टुडंटस् फेडरेशन ऑफ इंडियाच्या विद्यार्थी मेळाव्यात एसएफआय चे केंद्रीय महासचिव डॉ.विक्रमसिंग यांच्या हस्ते पार पडले. यावेळी राज्याध्यक्ष मोहन जाधव,राज्य सचिव बालाजी कलेटवाड,रोहिदास जाधव,अंनिस चे जिल्हाध्यक्ष डॉ.किरण चिद्रावार आदी मान्यवर उपस्थ
शहरी इंडिया आणि ग्रामीण भारत यात मोठी तफावत का आहे ?

शहरी इंडिया आणि ग्रामीण भारत यात मोठी तफावत का आहे ?

Social
         सहा लेनचे मार्ग,गगनचुंबी इमारती,बुलेट ट्रेन  असा इंडिया निर्माण करण्याकरीता ग्रामीण भारताचा बळी दिला जातो आहे.  दिल्ली मुंबई औद्योगिक प्रकल्प,नदीजोड प्रकल्प हे कुणाच्या फायद्याचे आहेत  ?  शहरी इंडियाच्या निर्मितीसाठी ग्रामीण भारताचा बळी का दिल्या जातो आहे ? देविंदर शर्मा ,  अनुवाद – प्रेरणा उबाळे      आपण एका अशा देशामध्ये राहतो जो इंडिया आणि भारत यांच्यामध्ये विभागला गेला आहे. इंडिया हा मेट्रोपोलीटीन शहरांमध्ये पाहायला मिळतो  आणि यामध्ये सहा लेनचे राजमार्ग आहेत, गगनचुंबी इमारती आहेत, महागड्या गाड्या आणि बरंच काही आहे. तर दुसरीकडे ६.४० लाख खेडी असलेल्या भारतात धुळीने माखलेले रस्ते आहेत शिवाय ट्रेक्टर, बैलगाड्यांबरोबर हजारो गरीब शेतकरी आहेत. तुम्हाला असं वाटेल की मी इंडिया आणि भारताबद्दल का बोलतो आहे. मी मुद्दामच या विषयावर बोलतो आहे, कारण कि  शहरी इंडिया आणि ग्रामीण भारत यां
दिल्ली : बापू ! अन्नदात्यावर त्यांनी आज गोळीबार केला आहे. 

दिल्ली : बापू ! अन्नदात्यावर त्यांनी आज गोळीबार केला आहे. 

Reportage
आज गांधी जयंती आहे. लालबहादूर शास्त्री यांचीही जयंती. गांधींच्या जयंतीला १५० वर्षे पूर्ण होताहेत त्याचा महोत्सव हे सरकार साजरा करते आहे. पश्चिम उत्तर प्रदेशातील शेतकरी आपल्या मागण्यासाठी शांतिपूर्ण मार्च करीत होते. ते आज राजघाट येथे पोचणार होते.गांधींना नमन करायला..सरकारला ते आवडलं नाही. दिल्ली-यूपी बॉर्डरवर बॅरिकेड च्या भिंती उभ्या केल्या गेल्या आणि सुरू झाला रक्तपात... देशाच्या सरकारने आज अन्नदात्याला गोळ्या दिल्यात. त्याही गांधी व शास्त्रीजींच्या जन्मदिवशी...सध्या फक्त फोटो पहा.. ! हे जालियनवाला बाग हत्याकांडाचे स्मृतीशताब्दी वर्ष आहे ...
चरख्याचा  स्वातंत्र्य आंदोलनाशी संबंध का व कसा आला ?

चरख्याचा स्वातंत्र्य आंदोलनाशी संबंध का व कसा आला ?

Social, Uncategorized
सुभाषचंद्र सोनार चरख्याचा स्वातंत्र्य आंदोलनाशी संबंध असला तरी, चरख्याला स्वातंत्र्य प्राप्तीचं साधन म्हणून, कोणीही प्रोजेक्ट केलं नव्हतं. त्यामुळे चरख्याचा संबंध स्वातंत्र्य आदोलनाशी कधी व का आला, हे समजून घेणं गरजेचं आहे. तसे समजून घेतले तरच ना जाने कितने झूले फांसी, कितनों ने गोली खाई। क्यूं झूठ बोलते साहिब, कि चरखा चलाने से आजादी आई॥ या काव्यपंक्तीमधला भंपकपणा आपल्या लक्षात येईल. ना जाने कितने झूले फांसी, कितनों ने गोली खाई। क्यूं झूठ बोलते साहिब, कि चरखा चलाने से आजादी आई॥ असा मिथ्या आणि दुष्प्रचार करण्यात फक्त मनुवादीच आघाडीवर नाहीत, तर परिवर्तनवादाचा बुरखा पांघरणा-या, तथाकथित परिवर्तनवादी संघटनासुद्धा, जराही पीछाडीवर नाहीत. सद्विचाराचे जसे कोणी ठराविक मक्तेदार नसतात, तसेच दुर्विचाराचेही कोणी ठराविक ठेकेदार नसतात. 'चकाकणारी प्रत्येक वस्तु सोनं नसते,' अशी म्हण आहे. वरील काव्यपंक
 शंकराचार्य इंग्रजांवर गांधीजीना देशाबाहेर हाकलण्याबद्दलचा दबाव का टाकत होते…? 

 शंकराचार्य इंग्रजांवर गांधीजीना देशाबाहेर हाकलण्याबद्दलचा दबाव का टाकत होते…? 

Political, Social
By Aasantosh महात्मा गांधी सर्व धर्माचा आदर करण्यास सांगत.त्यांनी सायंकाळच्या प्रार्थना सभेत सर्व धर्माची भजने व गीते गाण्याची परंपरा सुरू केली होती.सगळ्या धर्मातील चांगुलपणा लोकांनी घ्यावा व त्यानुसार आचरण करावे अशी त्यांची धारणा होती.गांधी आध्यात्मिक होते,धार्मिक होते.आध्यत्मिक बाबींना केंद्रीयस्थानी ठेवण्याच्या गांधींच्या विचारास डॉ.आंबेडकर यांच्यासारख्याच्या टिकेस सामोरे जावे लागले होते. त्यातून गांधींचा वैचारिक संवाद आंबेडकराशी सूरु झाला होता. त्यानिमित्ताने काही बदल ही दिसत होता. दुसरीकडे गांधींना संकुचित हिंदुत्ववादि लोकांच्या टीकेला तोंड द्यावे लागत होते. गांधी त्याना मूर्ख व धर्मांध समजत. इतिहासकार रामचंद्र गुहा त्यांच्या 'गांधी :द इयर्स दॅट चेंजड इंडिया' या पुस्तकानिमित्ताने दिलेल्या मुलाखतीत म्हणतात : ' आंबेडकर यांच्या अनुयायांशी तुम्ही चर्च
आरएसएस ला नाजी व मुसोलिनीसारखे फासिस्ट मानायचे म.गांधी

आरएसएस ला नाजी व मुसोलिनीसारखे फासिस्ट मानायचे म.गांधी

Political, Social, Uncategorized
महात्मा गांधी या जगातून जाऊन ७० वर्षे झाली आहेत. या सात दशकात खूप सारे टीकाकार सुद्धा त्यांच्या मार्गाने नंतर मार्गक्रमण करताना दिसले.कमीतकमी सार्वजनिकरीत्या भारताचे जवळपास सर्वच राजकीय पक्ष हे गांधीजीविषयी श्रद्धा व्यक्त करताना दिसतात.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक ते प्रधानमंत्री असा प्रवास झालेल्या नरेंद्र मोदींनी गांधीच्या चष्म्याला आपल्या सरकारच्या प्रतीक चीन्हासारखे बनवून टाकले तेव्हा भारतातील सर्व विचारधारा ह्या गांधीपुढे नतमस्तक झाल्यासारख्या वाटत होत्या . दुसऱ्या विचारधारांच्या पातळ्यावर ह्या वरवरच्या दिसणाऱ्या बदलाच्या पार्श्वभूमीवर महात्मा गांधी आरएसएस बाबतीत काय विचार करीत होते हे बघितले पाहिजे. तसे पहिले तर गांधीजीनी या संदर्भात आपले म्हणणे दृढपणे मांडले आहे. त्यांच्या हत्येनंतर सरदार पटेल यांनी संघावर बंदी घातली होती. इथे महात्मा गांधीच्या अखेरच्या काळात त्यांचे खाजगी
“राज्याचे अतिरिक्त अधिकार व नागरिकांचे किमान स्वातंत्र्य ही बाब मी भयप्रद मानतो.” – म.गांधी

“राज्याचे अतिरिक्त अधिकार व नागरिकांचे किमान स्वातंत्र्य ही बाब मी भयप्रद मानतो.” – म.गांधी

Political, Social
   संजय सोनवणी  महात्मा गांधीं स्वतंत्रतावादी होते. समाजवादाचे ते कधीही समर्थक नव्हते. थोडक्यांच्या भांडवलशाहीलाही त्यांनी विरोधच केला होता. समाजवादात शासनाच्या हातात जास्त अधिकार जातात त्यामुळे नागरिकांवर अधिकाधिक बंधने घालणे सोपे जाते महात्मा गांधी म्हणाले होते,          . "राज्याचे अतिरिक्त अधिकार व नागरिकांचे किमान स्वातंत्र्य ही बाब मी भयप्रद मानतो .राज्याला अधिक अधिकार असल्याने शोषण कमी झाल्यासारखे वाटेल पण यात व्यक्तिस्वातंत्र्याचा अपार संकोच होईल आणि देशाच्या प्रगतीला खीळ बसेल. सरकारी नियंत्रणांमुळे भ्रष्टाचार तर वाढेलच पण सत्याची गळचेपीही सुरु होईल. काळाबाजार व कृत्रीम टंचाया वाढतील. एवढेच नव्हे तर व्यक्तीची स्व-सृजनप्रेरणाही यातून नष्ट होत तो स्वत:ला घ्याव्या लागणा-या मेहनतीपासूनही दूर पळेल. सर्वोच्च प्राधान्य हे व्यक्तीस्वातंत्र्याला असायला हवे त्याशिवाय सबळ समाजाचे उभारणी शक्
” वित्तीय अरिष्टे : कारणे व परिणाम ” हे पुस्तक का वाचले पाहिजे ?

” वित्तीय अरिष्टे : कारणे व परिणाम ” हे पुस्तक का वाचले पाहिजे ?

Economics, Pick-a-book, Political
संजीव चांदोरकर “सबप्राईम” क्रायसिस या नावाने ओळखल्या जाणाऱ्या त्या वित्तीय आरिष्टाने अमेरिकेच्याच नव्हे तर संपूर्ण जागतिक अर्थव्यवस्थेला जवळपास मंदीच्या खाईत ढकलले होते. त्याची सर्वात जास्त झळ अमेरिका, युरोप व जपान या विकसित भांडवलशाही त्रिकुटाला बसली होती. त्याखालोखाल चीनला व त्यानंतर भारतासारख्या गरीब देशाला. याचा सगळ्यात मोठा फटका अमेरिका युरोपातील बँकांना व विमा कंपन्यांना बसला होता. त्यातील काही बुडाल्या काहींचे दुसऱ्या बँकांमध्ये विलीनीकरण करण्यात आले तर इतर अनेक बँकांना राष्ट्रीय सरकारांनी मोठ्या प्रमाणावर मदत केली. या पडझडीच्या व सावरण्याच्या काळात अनेक देशांच्या केंद्रीय बँकांनी अतिशय परिपक्वतेने एकमेकांशी सल्लामसलत करून हस्तक्षेप केले होते. अनेक सरकारांनी विशेषतः अमेरिकन सरकारने सार्वजनिक पैशातून काही ट्रिलियन डॉलरची बेल आऊट पॅकेज अमलात आणली. या अरिष्टाचा अर्थव्यवस्थांना बसलेला
इतके दिवस संघाच्या इशाऱ्यावर नाचता-नाचता तो खरोखर मतांधळा झाला असेल ! 

इतके दिवस संघाच्या इशाऱ्यावर नाचता-नाचता तो खरोखर मतांधळा झाला असेल ! 

Political, Social
जगदीश्वर चतुर्वेदी कालपासून मोदीच्या अंधभक्तांनी फेसबुकपासून ते टिव्ही चॅनलवर जी राष्ट्रवादी नागडेपणा चालविला आहे तो अत्यंत लज्जास्पद आहे.ह्या साऱ्या बाबी देशाच्या जनतेने किती भयंकर लोकांच्या ताब्यात सत्ता दिली आहे याकडे वारंवार इशारा करीत आहेत. यावरून एक निष्कर्ष असाही निघतो की,टीव्ही न्यूज चॅनल हे बातम्या देण्याच्या आपल्या कामापासून खूप दूर गेले आहेत. जे लोक मोदींच्या हातात देश सुरक्षित असल्याचे मानीत होते तेही आपण कुण्या कमअक्कल माणसाच्या हाती देश सोपवून बसलो आहोत म्हणून चिंताग्रस्त आहेत. तुम्ही सर्जिकल स्ट्राईक च्या बाजूने आहात.? तुम्ही याचे स्वागत करता का ?असे प्रश्न विचारले जाताहेत.माझ्यामते हे दोन्ही प्रश्न मूर्खपनाचे व चुकीच्या उद्देशाने प्रेरित आहेत.लेखक-बुद्धिजीवी व शांतिप्रिय जनतेला असे प्रश्न आवडत नाहीत.लेखक म्हणून आम्ही सदासर्वकाळ जनतेच्या बाजूने व शांतत
भाषा आणि संस्कृतीचे आदान प्रदान हे विषमता व सत्तावर्चस्वाच्या आधारे होता कामा नये – न्गुगी वा थियोन्गो

भाषा आणि संस्कृतीचे आदान प्रदान हे विषमता व सत्तावर्चस्वाच्या आधारे होता कामा नये – न्गुगी वा थियोन्गो

Literature, Political, Uncategorized
केनिया देशाचे लेखक न्गुगी हे गेली पन्नास वर्षे लिहित आहेत. त्यानी आपल्या सुरुवातीच्या काही कादंबऱ्या या इंग्रजी भाषेतून लिहिल्या पण नंतर त्यांनी इंग्रजी भाषेतून लिहिणे सोडून दिले.ख्रिश्चन धर्म व नाव यांचा त्याग केला. त्यांना नको असलेल्या वसाहतवादि भूतकाळाच्या संदर्भाने निश्चित अशा त्यांच्या भाषा आणि संस्कृती बाबत भूमिका आहेत.म्हणून न्गुगी यांनी त्यांच्या गोकोया देशी भाषेतच लिखाण करणे पसंत केले आहे. न्गुगी हे पेन कॉंग्रेस च्या निमित्ताने पुण्यात आले असून पेन कॉंग्रेस च्या वतीने २८ सप्टेंबर २०१८ रोजी सायंकाळी ५;३० वाजता बालगंधर्व रंगमंदिर पुणे येथे “ Hierarchy or Network : Decolonization of Language Relationship in the World” या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. आजच हाती आलेल्या माहितीनुसार त्यांना व्हिसा नाकारण्यात आल्याने ते उपस्थित राहू शकणार नाहीत. टाईम्स ऑफ इंडिया मध्ये ४
एम.आय.एम. उर्फ हैद्राबादी शिवसेना – डॉ.बशारत अहमद

एम.आय.एम. उर्फ हैद्राबादी शिवसेना – डॉ.बशारत अहमद

Political
एमआयएम -भारिप युतीच्या निमित्ताने एमआयएम पक्षाची चर्चा महाराष्ट्रात जोर धरू लागली आहे. मागील महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्यानंतर, एमआयएम च्या दोन आमदार निवडून आल्याच्या पार्श्वभूमीवर डॉ.बशारत अहमद यांनी लिहिलेला व "सकल" या अनियतकालिकात प्रकाशित झालेला लेख एमआयएम,सेक्युलर,सांप्रदायिक वगैरेच्या सुरू झालेल्या चर्चेनिमित्ताने "असंतोष" च्या वाचकांसाठी प्रकाशित करीत आहोत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ‘एम.आय.एम.’ चे दोन आमदार निवडून आले. आणि महाराष्ट्राच्या राजकीय विश्वात जणू भूकंपच झाला. विविध माध्यमातून आजही त्यावर चर्चा आणि लिखाण चालू आहे. आणि महाराष्ट्रावर एक महान संकट नव्याने आल्यासारखे भासवले जात आहे. वास्तविक पाहता एम.आय.एम. ने महाराष्ट्राच्या राजकारणात पहिल्यांदा पदार्पण केलेले नाही. एम.आय.एम. ची स्थापना १९२७ साली झाली, तेव्हा पासून किमान मराठवाड्यात तरी एम.आय.एम. आपले अस्त
सत्याचा पाठपुरावा आणि जागतिक शांतता प्रस्थापित करणे अधिक आव्हानात्मक आणि गरजेचे आहे -पेन काँग्रेसला पुण्यात सुरुवात 

सत्याचा पाठपुरावा आणि जागतिक शांतता प्रस्थापित करणे अधिक आव्हानात्मक आणि गरजेचे आहे -पेन काँग्रेसला पुण्यात सुरुवात 

Reportage
जगातील कवी,लेखक,कादंबरीकर,निबंधकार यांची संघटना असलेल्या 'पेन इंटरनॅशनल' च्या अधिवेशनाला काल आगाखान पॅलेस येथे कस्तुरबा गांधी व महादेव देसाई यांना वंदन करून सुरुवात झाली. सदर अधिवेशनाकरीता एनगुगी वा थियोन्गो,अशोक वाजपेयी,गुलाम मोहम्मद शेख,आशिष नंदी सहित जगभरातील ४०० प्रतिनिधींची उपस्थिती आहे. सत्याचा पाठपुरावा आणि जागतिक शांतता प्रस्थापित करणे अधिक आव्हानात्मक आणि गरजेचे आहे. महात्मा गांधींच्या विचार कार्यास हे अधिवेशन समर्पित असून सत्य,स्वातंत्र्य,अभिव्यक्ती,विविधता याबाबतीतल साहित्य व्यवहारातील चर्चा या काँग्रेसच्या केंद्रस्थानी असतील असे पेन इंटरनॅशनल च्या आंतरराष्ट्रीय अध्यक्ष जेनिफर क्लेमेंट याप्रसंगी बोलताना म्हणाल्या. सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या विमाननगर परिसरात झालेल्या उद्घाटन सोहळ्यात डॉ. गणेश देवी यांनी 'पेन काँग्रेस आणि पुणे' संबंधी विशेष व्याख्यान दिले. तत्प
जगभरातील लेखकांची संघटना असलेल्या ‘पेन इंटरनॅशनल’ चे अधिवेशन पुण्यात आजपासून सुरु

जगभरातील लेखकांची संघटना असलेल्या ‘पेन इंटरनॅशनल’ चे अधिवेशन पुण्यात आजपासून सुरु

Literature, Reportage
जगभरातील कवी, कथा-कादंबरीकार व अन्य लेखकांची संघटना असलेल्या 'पेन इंटरनॅशनल' या संस्थेचे अधिवेशन आजपासून पुण्यात प्रारंभ होत आहे.हे अधिवेशन २५ ते २९ सप्टेंबर २०१८ या कालावधीत पार पडणार आहे.  पेन इंटरनॅशनल हि ९८ वर्षे सातत्याने कार्यरत असणारी वैश्विक पातळीवरची अशी एकमेव आणि जगविख्यात संस्था आहे.लेखकांचे हक्क सुरक्षित ठेवणे, साहित्यिक, प्रकाशक, पत्रकार यांचे खून होत असतील, त्यांचा छळ होत असेल तर ते रोखण्यासाठी आघाडी खोलणे, ग्लोबलसाऊथ मधल्या देशातील साहित्यिकांना व्हिझिबिलिटी मिळवून देणे, भाषांतर संस्कृती वाढवणे, नागरिकांचे भाषाअधिकार जोपासणे, त्यांचे रक्षण करणे, इत्यादी अवघड कामे-जी केवळ साहित्य संमेलने अथवा साहित्य मेळे भरवतात अश्या संस्था करू शकत नाहीत अशी कामे पेन इंटरनॅशनल संस्था अशी कामे करत अली आहे. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर, मुन्शी प्रेमचंद, पंडित जवाहरलाल नेहरू, निस्सीम इझिकेल, सलम
पत्रकारांच्या होणाऱ्या शोषणाविरोधात देशव्यापी लोकमत निर्माण करण्याचा संकल्प: कमेटी अगेन्स्ट असॉल्ट ऑन जर्नलिज़्म (CAAJ)च्या अधिवेशनाचा दिल्लीत समारोप

पत्रकारांच्या होणाऱ्या शोषणाविरोधात देशव्यापी लोकमत निर्माण करण्याचा संकल्प: कमेटी अगेन्स्ट असॉल्ट ऑन जर्नलिज़्म (CAAJ)च्या अधिवेशनाचा दिल्लीत समारोप

Reportage
  दिल्ली येथील कॉन्स्टीट्युशन क्लब येथे २२-२३ सप्टेंबर २०१८ ला कमेटी अगेन्स्ट असॉल्ट ऑन जर्नलिज़्म (CAAJ) चे दोन दिवशीय अधिवेशन पार पडले. पत्रकारांच्या होणाऱ्या शोषणाविरोधात देशव्यापी लोकमत निर्माण करण्याचा संकल्प घेत काल या अधिवेशनाचा समारोप झाला. या अधिवेशनाला प्रेस क्लब ऑफ इंडिया आणि आंतरराष्ट्रीय दर्जाची पत्रकाराची संघटना असलेल्या ‘कमेटी टू प्रोटेक्ट जर्नलिस्ट’ या संघटनेचे समर्थन मिळाले. याशिवाय तीस पेक्षा अधिक पत्रकारिता संस्था व जनसंघटनानी यात भाग घेतला.   दोन दिवसात चार सत्रात पत्रकारिता व पत्रकार यांच्यावरील संकटांची विस्ताराने चर्चा करण्यात आली. शहीद पत्रकारांचे नातेवाईक,तुरुंगवास भोगलेल्या व नोकरी गमावलेल्या पत्रकारांनी आपले अनुभव कथन केले. देशाच्या प्रत्येक कोपऱ्यातून पत्रकार या अधिवेशनास उपस्थित होते. समारोप सत्रात चारही सत्राच्या चर्चेचा सारांश मांडण्यात आला. एक
पीएम मोदींनी देशाला शिव्यांची लोकशाही बनवून टाकले आहे – रविश कुमार

पीएम मोदींनी देशाला शिव्यांची लोकशाही बनवून टाकले आहे – रविश कुमार

Uncategorized
मोदींनी देशासाठी काहीच केले नाही असे बिल्कुल नाही . त्यांनी या देशाला शिव्यांची लोकशाही बनवून टाकले आहे असे जेष्ठ पत्रकार रविश कुमार म्हणाले रविश दिल्लीच्या कॉन्स्टीट्यूशन क्लब मध्ये २२-२३ सप्टेंबर ला पार पडलेल्या CAAJ(कमेटी अगेन्स्ट असॉल्ट ऑन जर्नलिस्ट्स) च्या दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आयोजित दुसऱ्या सत्रात बोलत होते Trolls, Threats, And Intimidation (ट्रोल, भीती आणि धमकी) हा सत्राचा विषय होता. सत्रास प्रसिद्ध पत्रकार नेहा दीक्षित व निखिल वागळे यांनी सुद्धा संबोधित केले . केंद्रात मोदी सरकार आल्यापासून सत्तेला प्रश्न विचारणाऱ्याचे जगणे कठीण झाल्याबाबत सर्वांचे एकमत होते. सोशल मीडिया सुद्धा याबाबतीत गंभीर आव्हान म्हणून उभे ठाकले आहे.प्रश्न करणाऱ्या लोकांना वेगवेगळे पाडून त्यांना देशाचे दुष्मन ठरविण्याचे सत्ता प्रायोजित अभियान चालविले जात आहे. नरेंद्र मोदी गुजरातचे म
रविशंकर जी ! राफेल सौदा मेक इन इंडियासाठी कसा…? 

रविशंकर जी ! राफेल सौदा मेक इन इंडियासाठी कसा…? 

Uncategorized
पावणे दोन लोकांची सरकार असलेल्या भारत सरकारचा राफेल सौदा हा मेक इन इंडियाच्या फायद्याचा कसा असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते शशी सोनवणे यांनी उपस्थित केला आहे.. सत्तेत आल्याबरोबर मोदींनी १२६ विमाने व शासकीय प्रकल्प असलेल्या हिंदुस्तान ऐरोनॉटिक्स लिमिटेड ला काही तंत्रज्ञानाचे हस्तांतरण च्या जागी फक्त ३६ तयार असलेल्या विमानाचा सौदा करण्याची घाई मोदींनी का केली .? झालेला नवीन करार ज्यात फ्रान्समध्ये पूर्णतः तयार ३६ विमाने विकत घ्यावयाची होती. HAL ला तंत्रज्ञानाचे हस्तांतरण करण्याची जरूर नव्हती. रोखीने फायदा फ्रान्सचा होणार होता तर मग हा करार मेक इन इंडियाच्या फायद्याचा कसा असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे ८ ऑगस्ट ला भाजपच्या मागील सरकारमध्ये मंत्री असलेल्या अरुण शौरी आणि यशवंत सिन्हा व जेष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी दिल्ली येथे पत्रकार परिषद घेत जाहीर खुलासा केला होता. विमानाच्या खरे

परिवर्तनाची धर्मसन्मुख दिशा – उत्पल व. बा

Uncategorized
(फोटो क्रेडिट - द हिंदू ) एक-दोन वर्षांपूर्वी 'मुक्त शब्द'च्या एका अंकात 'गरज हिंदू डाव्यांची' असा एक लेख प्रकाशित झाला होता. (मी शीर्षक कदाचित चुकत असेन, पण आशय हाच होता.) तो लेख म्हणजे मराठी लेखन-संपादन क्षेत्रातील काही मित्रांची झालेली एक चर्चा होती. त्यातील राम जगताप हे एक नाव मला आठवतं. इतर आत्ता आठवत नाहीत. 'द हिंदू' मध्ये अलीकडेच 'ड्रीमिंग ऑफ अ हिंदू लेफ्ट' या शीर्षकाचा एक लेख प्रकाशित झाला होता.( https://www.thehindu.com/books/dreaming-of-a-hindu-left/article24830249.ece ) तो वाचून ती चर्चा आठवली आणि हा विषय अलीकडे मनात सतत घोळत असल्याने त्यावर लिहावंसं वाटलं. संघटित धर्म ही सामाजिक बांधणीची गरज होती/आहे त्यामुळे संघटित धर्माला वगळता येत नाही हे धर्मवाद्यांचं म्हणणं असतं. धर्मविहीन जगण्याचा विचार करणारे माझ्यासारखे लोक एका अर्थी असा विचार करू शकण्यासाठी 'प्रिव्हिलेज्ड' असतात क

नेमाडे-कसबे वाद आणि आपण वाचक – प्रा.हरी नरके

Literature
साहित्यिक वाद महाराष्ट्राला नवे नाहीत. त्यातून वैचारिक-साहित्यिक मंथन व्हावे अशी अपेक्षा असते. वादविवाद आणि चिकित्सा यातून विचार घासून पुसून घेतले जातात. त्यात वार आणि प्रहार असले तरी त्याला एक वैचारिक-वाड्मयीन दर्जा असतो. आपसातले मतभेद मांडायलाच हवेत. साहित्यकृतीच्या सामर्थ्य आणि मर्यादा यांच्यावर घमासान वाद व्हायलाच हवा. त्यातून लेखकाला योग्य मार्गदर्शन मिळते. विचारकलहाला कशाला घाबरता असे आगरकर म्हणत असत. मराठी माणूस हा मूलत:च कलहप्रिय आहे. बाराशे वर्षांपुर्वी उद्योतन सुरी यांनी मराठी माणूस हा "कळवंड करणारा" असतो असे त्याचे अचूक वर्णन केलेले आहे. "भांडखोरपणा" हे मराठी माणसाचे "सार्वकालिक ओळखपत्र" आहे. सध्या महाराष्ट्रात दुष्काळी वातावरण असले तरी कसबे-नेमाडे वादाच्या रणभेरी घुमत आहेत. हे दोघेही बलदंड योद्धे एकमेकांवर तुटून पडलेले आहेत. या दोघांनाही मानणारा युवकांचा एक मोठा वर्ग आहे.
कॉ. शरद पाटील : एक स्कुल ऑफ थॉट – कॉ. शशी सोनावणे

कॉ. शरद पाटील : एक स्कुल ऑफ थॉट – कॉ. शशी सोनावणे

Political
कॉ. शरद पाटील यांच्या अभिवादन सभेच्या निमित्ताने कॉ. शरद पाटलांच्या  गोष्टी मला भावल्या किंवा ज्याबद्दल प्रश्न पडले त्याचे थोडक्यात इथे विवेचन करीत आहे. आज १ मे कामगार दिन तसेच महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने आपण हा कार्यक्रम ठेवला आहे. उद्या २ मे ला अक्षय तृतीय आहे आणि खानदेशांत 'आखाजी' हा मोठा सण आहे. मी खान्देशातलाच आहे. आमच्याकडे खानदेशात आखाजीच्या दिवशी शेतीच्या संदर्भातले जे महत्त्वाचे निर्णय आहेत ते खापराच्यावरच्या पुरणपोळीचे जेवण झाल्यावर एकत्र बसून घेतले जातात आणि हे निर्णय घेत असताना, मी लहान असताना पाहिलंय, आमच्या घरी माझी आजी ही बैठक घेणारी होती. ती ठरवायची कुठे काय पेरायचे. माथ्यावर शेतात काय टाकायचे, खालच्या अंगाच्या शेतात काय काय टाकायचे, बियाणं कोणतं पेरायचं. नवीन सालदाराला किती साल द्यायचं इ. माझे शेती करणारे दोन काका आहेत ते तिच्याशी चर्चा करायचे. माझे वडील आणि दुसरे काका
आदिवासी मुले इथे ज्ञानार्जन करितात ! – नवनाथ मोरे

आदिवासी मुले इथे ज्ञानार्जन करितात ! – नवनाथ मोरे

Social
आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून आदिवासी समाजाच्या विकासासाठी विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात.याच विभागामार्फत आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात यावे,शिक्षण घेता यावे.यासाठी राज्यभरात 491 वसतिगृहे चालवली जातात.या वसतिगृहांमध्ये 58 हजारहून अधिक विद्यार्थी वास्तव्य करतात. वसतिगृहांमध्ये जेवण,नाष्टा,शैक्षणिक साहित्य,बेडिंग साहित्य,निर्वाह भत्ता इ. सुविधा पुरविल्या जातात.       आदिवासी समाजाच्या सामाजिक प्रगतीत आश्रमशाळा,वसतिगृह यांचा महत्वाचा वाटा राहिला आहे.ज्या समाजाच्या उन्नती आणि शैक्षणिक प्रगतीसाठी वसतिगृह महत्वाचा दुवा ठरली आहेत.त्यांची अवस्था गंभीर आहे.     महाराष्ट्र राज्याचे आयुक्तालय ज्या नाशिक शहरात आहे.त्याच शहरातील आणि जिल्ह्यातील वसतीगृहांची परिस्थिती गंभीर आहे. पेठरोड येथे मुलींच्या वसतीगृहांची परिस्थिती पाहिल्यास पंखे तुटलेले आहे,कधी लाईट जात
रुपया घसरला, निर्यातही ढेपाळली – संजय सोनवणी

रुपया घसरला, निर्यातही ढेपाळली – संजय सोनवणी

Economics
गेल्या काही काळात डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत सातत्याने ढासळत असून आता ती ७० रु.च्या आतबाहेर हेलकावे घेत आहे. रिझर्व्ह बँक आपल्या गंगाजळीतील डॉलर विकून रुपयाची घसरण रोखण्याच्या प्रयत्नात असली तरी हा कृत्रिम उपाय आहे. त्याने भारताकडील विक्रमी डॉलरमधील गंगाजळीला भगदाड पडले अाहे. ती जवळपास ४५० अब्ज डॉलर आहे. आता आठवड्याला किमान दोन अब्ज डॉलर गंगाजळीतून घटत चालले आहेत. डॉ. मनमोहनसिंग यांच्या काळात विक्रमी पातळीवर गेलेली गंगाजळी घटत तर गेलीच, पण सोन्याच्या साठ्यातही एक टक्क्याची घट झाली आहे. डॉ. मनमोहनसिंग यांच्या कार्यकाळात ६२ रुपयांच्या आसपास स्थिरावलेला हा विनिमय दर आता ७० रुपयांच्या घरात गेला आहे. ही परिस्थिती का आली याची आपण कारणे शोधली पाहिजेत.डॉलर मजबूत होत चालला आणि रुपया घसरला याचा अर्थ एवढाच की बाजारातील डॉलरची मागणी वाढली आहे. असे झाले आहे हे समजावून घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय घडामो

मी, माय आणि बाप – चंद्रशेखर राजपूत

Poetry
वावरात राबतानादिसायची मायशाळेच्या खिडकीतून...शाळा माझी गावाच्या वेशीवरआणि वावर वेशी पल्याड....ते दृष्य कायमचं बसलंयकाळजाच्या खिडकीत...अधुन मधून त्याचीहोत राहते उघड छाफअन् शाळेत जातांनापाठीवरचं ते ओझं;दप्तराचंदप्तराचच की ज्ञानाचं...?तेव्हा ते कळलच नाहीपण,त्याच शाळेच्या वाटेवरबाप कळायचा; कित्यकदाउभ्या जगाचं अख्खं पोट पाठीवर घेऊन..तेंव्हा मि विद्यार्थी होतंअन् बाप पोशिंदा;आताती खिडकीही गेली...ती वाटही गेली...ती शाळा ही गेली...ती माय ही गेली...राहिला फक्त बाप;तोच बापसा-या जगाचं पोट पाठीवर घेवूननिरंतर चालनारा...चालतच जाणारा...क्षितिजा पल्याड.....!चंद्रशेखर राजपूत 9834465581

भांडवलशाही : निसर्गाचे विनाशकारी शोषण करणारा एकमेव गुन्हेगार- अॅलन बाडिओ

Political
(पर्यावरणीय संकट ,भांडवली आरिष्ट्य,नव्या तंत्र क्रांतीने निर्माण केलेले प्रश्न ,आर्टिफिशीयल इंटेलीजन्स व एकविसाव्या शतकातील समाजवादी,साम्यवादी जगाच्या निर्माणाचा प्रश्न आदीचा आढावा घेणारा अॅलन बाडिओ यांचा लेख इंग्रजीतून डॉ.दीपक बोरगावे यांनी खास असंतोष च्या वाचकासाठी अनुवादित केला आहे.) अनेक कारणांसाठी, मानवी जीवनाचा अंत होणार अशी घोषणा करायची ही आजकाल एक सामान्य बाब झालेली दिसते . घासू झालेल्या प्रेषिताच्या सिद्धांताच्या आधारावर आपण जगत असलेलं हे जग संपणार आहे याचा अंत होणार आहे आणि याला मानवाचा अतिलोभ हे कारण आहे . या तंत्रमय जगाने आपल्या प्रत्येक गोष्टीचे रिबोटायझेशन केले आहे, कोणतीही गोष्ट ही आज डिजिटलाइज झालेली आहे, कलाक्षेत्रातही याचा विपुल वापर आहे आणि आता अतिबुध्दिच्या जोरावर आपले जग आपणच नष्ट करणार आहोत . परिणामी, या धोक्याच्या गोष्टी, जसे मानवतावादाचे झालेले स्थित्यंतर, आ
कॉ. शरद पाटील : दुःख आणि शोषणमुक्तीचा असंतोषी मार्गस्थ

कॉ. शरद पाटील : दुःख आणि शोषणमुक्तीचा असंतोषी मार्गस्थ

Social
मी बारावीत असतांना पहिल्यांदा कॉ. शरद पाटील नावाच्या म्हाताऱ्या माणसाचे भाषण ऐकले होते. मी आणि नितीन वाव्हळे (हल्ली, एस. एफ. आय. चे विद्यार्थी नेते) त्यावेळी औरंगाबाद शहरात सार्वजनिक कार्यक्रम असले की, आम्ही बहुतेकवेळा हजरच असायचो. मुख्य कारण म्हणजे अशा कार्यक्रमात खायला चांगले असते आणि दुय्यम कारण म्हणजे डोक्याला खूराक मिळतो. ते कॉ. आहेत तेंव्हा ऐकले होते पण जास्त कळत नव्हते. त्यामुळे हा म्हातारा जाम भारी आहेच प्रथमदर्शनी मत बनले कारण त्यांच्या वयाचे अनेक म्हातारे रिकामे असतात असाच माझा अनुभव होता. त्यांना कोणीच गंभीरपणे ऐकत नाही असेही पाहिले होते हा पाटिल बाबा थोडा वेगळाच वाटला. पदवीला असतांना त्यांचे पुस्तके वाचली. डोक्याला ताण देवून वाचली तेंव्हा कुठे काही गोष्टी समजू लागल्या. आजही त्यांच्यावर दुर्बोध लिखाण करण्याचा, त्यांना संस्कृत खरंच येत होते का? असे अनेक आरोप केले जातात पण, हे आ

“नथुरामां”ची भरती कशी होते? – कुणाल शिरसाठे

Social
विचारवंतांच्या हत्या करण्यात आरोपी म्हणून पकडलेले सर्व तरुण हे वय वर्ष 18 ते 30 दरम्यानचेच आहेत. त्यांची पार्श्वभूमी पहिली तर ते ओबीसीच्या छोट्या जातींमधून येतात, काबाडकष्ट करणाऱ्या वर्गातून ते येतात. ब्रेनवॉश केलेल्या या तरुणांना हत्या करण्यासाठी नथुराम गोडसे चा आदर्श समोर ठेवला जातो... राम, नरसिंह आणि अर्जुनाचा आदर्श ठेवला जातो.... हे सार विष पेरण्याची सुरवात कुठून होते? ही पोर हत्यांचे कट रचणाऱ्या संस्थांच्या तावडीत सापडली कशी? ही सन 2011 ची गोष्ट असेल मी पुण्यात MA च्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेतला होता आणि गोखलेनगर ला राहत होतो. कैलास आणि सुदर्शन असे माझे दोन रूम पार्टनर होते, दोघेही कर्नाटक मधील होते आणि पहिल्यांदाच पुण्यात जॉब करण्यासाठी आलेले होते. दिवस गणेशोत्सवाचे होते, कैलास आणि सुदर्शन आपण गणेशोत्सव बघायला जाऊ म्हणवून आग्रह करत होते.आम्ही जायचं ठरवलं, सगळीकडे असलेल्या सजावटी
कॉ. नजूबाई गावीत यांना पहिला ‘बलुतं पुरस्कार जाहीर!

कॉ. नजूबाई गावीत यांना पहिला ‘बलुतं पुरस्कार जाहीर!

Reportage
पद्मश्री दया पवार प्रतिष्ठान आणि ग्रंथाली वाचक चळवळ यांच्या संयुक्त विद्यमाने 'बलुतंच्या चाळिशी'प्रित्यर्थ 'आत्मकथन' या साहित्यप्रकारास 'बलुतं पुरस्कार' सुरू करण्यात येत असून या वर्षीचा पहिला-वहिला पुरस्कार कॉ. नजूबाई गावीत यांच्या 'आदोर'ला घोषित करण्यात आला आहे. या पुरस्काराचे वितरण २० सप्टेंबर २०१८ रोजी 'बलुतंची चाळिशी' या एकदिवसीय संमेलनाच्या उदघाटनसत्रामध्ये करण्यात येणार आहे. ११,००० रु. रोख, गोधडी आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पहिल्या मराठी आदिवासी लेखिका असलेल्या कॉ. नजूबाई यांच्या 'आदोर' शिवाय 'तृष्णा', 'भिवा फरारी' या कादंबऱ्या आणि 'नवसा भिलणीचा एल्गार' हा कथासंग्रह प्रसिद्ध झालेला आहे. दया पवार यांच्या व्यक्तिमत्वातील 'लेखक - कार्यकर्ता' या बिरुदाशी साधर्म्य सांगणाऱ्या कॉ. नजूबाई यांनी सातत्याने भूमिहीन आदिवासी, शेतकरी, स्त्रिया आणि धरणग्रस्त यांच्या हक्कांसाठीच्या
हरफनमौला, हरहुन्नरी, साक्षेपी, कलंदर फकीर : डॉ. फकरुद्दीन बेन्नूर

हरफनमौला, हरहुन्नरी, साक्षेपी, कलंदर फकीर : डॉ. फकरुद्दीन बेन्नूर

Political
"17 ऑगस्ट रात्री 8.30 वाजता सोलापूरहून इरफान भाईंचा फोन आला. त्यांनी सांगितले बेन्नूर सर गेले. नंतर हासिब नदाफ यांचा फोन आला. त्यानंतर फोन येतच राहिले. काही सांगण्यासाठी काही चौकशीसाठी. सरांच्या जाण्याने 34 वर्षांच्या मैत्रीचे एक पर्व संपले. बेन्नूर सरांना पहिल्यांदा भेटलो सोलापूरमध्ये 1984 साली. माझा मित्र प्रताप भोसलेच्या आग्रहावरून मी सोलापूरला गेलो होतो. सोबत तुळशी परब, सोनाळकर जमले होते. तुळशीनेच माझी ओळख करून दिली. 'हे बेन्नूर सर'- त्यानंतर भेटण्याचा सिलसिला सुरूच झाला. हे भेटणं मैत्रीत कधी बदललं ते आठवत नाही. मी त्यावेळेला CPI(ML) च्या एका गटाच्या महाराष्ट्र कमिटीचा सेक्रेटरी होतो. आणि अनेक प्रश्न पडले होते. प्रमुख प्रश्न असा होता - जात आणि धर्माचे काय करायचे? सर मुस्लिम सत्यशोधकांचा भोज्या शिवून परत आले होते. कॉम्रेड शरद पाटलांची भूमिका त्यावेळेला आंबेडकरवादी होती. मुस्लिम ओबीसी चे
मार्क्स काय म्हणाला ? – दीपक बोरगावे

मार्क्स काय म्हणाला ? – दीपक बोरगावे

Poetry
मार्क्स काय म्हणाला ? (कार्ल मार्क्स यांच्या द्विजन्मशताब्दी निमित्त)   एकदा कविता मार्क्सच्या अभ्यास खोलीत शिरली. मार्क्स खोलीत एकटाच होता तो होता लिहण्यात मग्न त्याचं लक्षचं नव्हतं कवितेकडे.   आपला गळा खाकरत तिने लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला पण काही उपयोग झाला नाही.   मनाचा हिय्या करून शेवटी ती अक्षरशः ओरडीलच कार्ल .....कार्ल ...   मार्क्सने आपल्या जाड्या भिंगातून कवितेकडे पाहिले त्याने विचारले, काय पाहिजे ?   काही नाही सहजच आले होते, मी कविता आहे.   असं म्हटल्यावर, मार्क्सने आपला पेन खाली ठेवला.   कुठून आलीस ? मार्क्सने विचारलं.   इंडियातून, कविता म्हणाली.   मार्क्स थोडा बावचळला; इतक्या लांबून कशी काय ? असं वाटलं असावं त्याला कदाचित.   का
तेव्हाही जात असतो एक बळी पुरुषसत्तेचा… – श्रद्धा देसाई

तेव्हाही जात असतो एक बळी पुरुषसत्तेचा… – श्रद्धा देसाई

Poetry
जेव्हा बलात्कार होतो तिच्यावर, त्यातही दिवसाढवळ्या, त्यातही लहानगीवर, त्यातही वर्दळीत, त्यातही नातलगाकडून, आणि त्यातही क्रुर पाशवी असेल, मग तर पेटून उठतात तुझ्या धमन्या, बेभान होतं सणसणीत शिवी हासडतोस "भडव्या". तेव्हाही जन्माला येत असतो आणखी एक बलात्कारी . जेव्हा पुरुषसत्तेचा बळी जाते ती, त्यातही हुंड्यापायी, त्यातही नवविवाहित, त्यातही माता, त्यातही लहान लेकरांची, अन त्यातही जिवंत जाळली असेल, मग तर उसळून उठत तुझं मस्तक. पण कधीतरी बायकोच्या चार दिवसातही, "जगावेगळं तुलाच होतं नाही"; म्हणत जेवणाची फर्माईश करतोस, जेव्हा सावित्रीला नाकारलं जातं, त्यातही स्रीवादात, त्यातही स्त्रियांकडून, त्यातही परजातीतल्याकडून, त्यातही विरोधकांकडून, मग तर खवळतोस तू संपूर्णच. पण कधीतरी लग्न लावून दिलेल्या बहिणीने हिस्सा मागताच मात्र , नात्याचाच ताळेबंद लावतोस लगोलग, तेव्हाही नाकारलं

CONTACT US