Reportage

पालघर लोकसभेकरीता भूमिपुत्र  बचाव आंदोलन तर्फे  दत्ताराम करबट यांची उमेदवारी जाहीर

पालघर लोकसभेकरीता भूमिपुत्र बचाव आंदोलन तर्फे दत्ताराम करबट यांची उमेदवारी जाहीर

Political, Reportage
क्रांतीचा लाल झेंडा गुंडाळून विचारधारेला खुंटीवर टांगून सीपीएमने बाहूशक्तीच्या जोरावर केवळ भुमी बळकावून काॅंक्रीटीकरणालाच विकास मानणा-या बहुजन विकास आघाडीबरोबर अभद्र आघाडी केल्याचा आरोप शेती, पाणी, रोजगार, वनाधिकार, मासेमारी तसेच नागरी समस्यांवर लोकप्रतिनिधींनी ठोस भुमिका घेणे, त्याबाबत लोकसभेत आवाज उठवून काम करवून घेणे आवश्यक आहे. ते त्यांचे कर्तव्यच आहे. परंतु केवळ सत्ता आणि आर्थिक हितसंबंध जपण्यासाठी जनतेच्या प्रश्नांना डावलून प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे विनाशकारी प्रकल्प लादण्याचे काम राज्यकर्त्यांकडून, विधानसभा, लोकसभेतील लोक प्रतिनिधींकडून होताना दिसते. मुल्यहिन, संधीसाधू सत्ताकारणाने आता किळसवाणे रुप धारण केले आहे. एकीकडे क्रांतीचा लाल झेंडा गुंडाळून विचारधारेला खुंटीवर टांगून सीपीएमने बाहूशक्तीच्या जोरावर केवळ भुमी बळकावून काॅंक्रीटीकरणालाच विकास मानणा-या बहुजन विकास
भारतीय रेल्वेच्या विकासावर पैसा खर्च करण्याऐवजी बुलेट ट्रेन चा पांढरा हत्ती पोसणे हे देशविरोधी

भारतीय रेल्वेच्या विकासावर पैसा खर्च करण्याऐवजी बुलेट ट्रेन चा पांढरा हत्ती पोसणे हे देशविरोधी

Economics, Political, Reportage, Social, Uncategorized
भारतीय रेल्वेच्या विकासावर पैसा खर्च करण्याऐवजी बुलेट ट्रेन चा पांढरा हत्ती पोसणे हे देशविरोधी असल्याचे मत शशी सोनवणे यांनी व्यक्त केले. युवा भारत संघटना आयोजित " बुलेट ट्रेन : प्रतीक विकासाचे कि विनाशाचे " या विषयावरील चर्चेत त्यांनी हे मत व्यक्त केले. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन विरोधी संघर्षातील नेते राजू पांढरा व शशी सोनवणे यांच्याशी एस. एम जोशी सभागृह,नवी पेठ पुणे एका चर्चेचे आयोजन युवा भारत संघटनेच्या वतीने करण्यात आले होते. शशी सोनवणे बुलेट ट्रेन ही आपल्या देशाच्या मर्यादित संसाधनांच्या दुरुपयोगाचा उत्तम नमुना आहे. ताशी २५० ते ३५० कि.मी वेगाने चालणारी बुलेट ट्रेन काही दशकांपुर्वी जगभर आकर्षणाचा केंद्रबिंदू होती परंतु हवार्इ वाहतुक अधिक जलद, किफायतशीर आणि सर्वात महत्वाचे म्हणजे सुरक्षित होत गेल्यामुळे बुलेट ट्रेन ही जपान, फ्रांस, जर्मनी अशा काही मुठभर देशांपुरतीच मर्यादित
जलसंधारणासाठी शिवार एकवटतय ! पाणी परिषद नरेवाडी  –  नवनाथ मोरे

जलसंधारणासाठी शिवार एकवटतय ! पाणी परिषद नरेवाडी – नवनाथ मोरे

Reportage, Social, Uncategorized
ज्या पश्चिम महाराष्ट्राकडे सधन भाग म्हणून पाहिले जाते, त्याच भागात असंख्य गावे पाण्यासाठी तडफडत आहेत. पाणीदार असलेल्या गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. विहिरी, बोरवेल आटल्या आहेत. प्रदूषण वाढत आहे. हे सगळे प्रश्न निर्माण होत असताना कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील डोंगरदऱ्यातील गावे जलसंधारणासाठी एकवटली आहेत. दिनांक ९ डिसेंबर २०१९ रोजी पाणी फौंडेशन; महाराष्ट्र , अखिल भारतीय किसान सभा; कोल्हापूर, तुप्पुरवाडी को. ऑप. क्रेडिट सोसायटी; मुंबई यांच्या संयुक्त विद्यामानाने "पाणी परिषद" नरेवाडी येथे पार पडली. या परिषदेसाठी नरेवाडी, तुप्पुरवाडी, सावतवाडी, मुंगुरवाडी, बटकणंगले, कडाल या गावातील शेतकरी, नोकरदार, शिक्षक, राजकारणी जमले होते. तापमानवाढ जागतिक चिंतेचा विषय बनला असताना येणाऱ्या काही वर्षात जगाला पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. महाराष्ट्रासह देश पाणीटंचा
Video : मुंबई-बडोदा एक्सप्रेस-वे ला शेतकऱ्यांचा विरोध कायम

Video : मुंबई-बडोदा एक्सप्रेस-वे ला शेतकऱ्यांचा विरोध कायम

Reportage, Uncategorized
प्रल्हाद अधिकारी चिंचारे (जि.पालघर) : पालघर तालुक्यातून जात असलेल्या प्रस्तावित पालघर तालुक्यातून जात असलेल्या प्रस्तावित मुंबई-बडोदा एक्सप्रेस-वेला शेतकऱ्यांचा विरोध दिवसेंदिवस वाढत आहे. महामार्गासाठीच्या जमीन मोजणीसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी हुसकावून लावले आहे.मुंबई-बडोदा एक्सप्रेस-वेला शेतकऱ्यांचा विरोध दिवसेंदिवस वाढत आहे. महामार्गासाठीच्या जमीन मोजणीसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी हुसकावून लावले आहे.
पर्यावरण संरक्षणाच्या मागणीस घेऊन इंग्लंड मध्ये पाच ठिकाणी धरणे आंदोलन.

पर्यावरण संरक्षणाच्या मागणीस घेऊन इंग्लंड मध्ये पाच ठिकाणी धरणे आंदोलन.

Reportage
पर्यावरण संबंधित समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ब्रिटनमध्ये १८ नोव्हेंबर २०१८ रोजी लंडन येथील थेेम्स नदीवरील पाच मुख्य पुलांवर धरणे आंदोलन केले गेले. या आंदोलनादरम्यान ७० आंदोलकांस ताब्यात घेण्यात आले होते.संबंधित बातमी २०२५ पर्यंत जागतिक तापमान वाढीसाठी जबाबदार कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण शून्यावर आणण्याची या आंदोलनाची मुख्य मागणी होती. या आंदोलनातील लोकांनी "जीवाश्म इंधनाचे युग संपले आहे" " पृथ्वीला वाचविण्याची वेळ येऊन ठेपली आहे" असे लिहिलेले बोर्ड हाती पकडले होते. एक्सटिंशन रेबेलीयन नावाच्या संघटनेने या आंदोलनाचे नेतृत्व केले. यापूर्वीही मुख्य रस्ते अडविणे,धरणे आदी मार्गानी पर्यावरणीय प्रश्नांकडे लक्ष वेधनारी आंदोलने झाली आहेत. आंदोलनास बिशप,आर्चबिशप,वकील,प्राध्यापक,विद्यार्थी वर्गातून प्रतिसाद मिळत आहे. हे सुद्धा वाचा.... भांडवलशाही : निसर्गाचे विनाशकारी शोषण करणारा एकमेव गु
महाराष्ट्राच्या दिग्रस गावातील ‘खालची आळी ‘ आणि स्वातंत्र्याची सत्तरी – डॉ.मुकेश कुमार

महाराष्ट्राच्या दिग्रस गावातील ‘खालची आळी ‘ आणि स्वातंत्र्याची सत्तरी – डॉ.मुकेश कुमार

Reportage, Social, Uncategorized
  महाराष्ट्राच्या वर्धा  जिल्ह्यातील दिग्रस गावातील दलितांच्या स्थितीवर दृष्टीक्षेप टाकणारा हा लेख डॉ. मुकेश कुमार व त्यांच्या चमूने केलेल्या  अभ्यासाचा अहवाल आहे.  हा मूळ अहवाल हिंदीत असून अहवालात  "पूरब  टोला' असा शब्द वापरण्यात आला आहे.  मराठीमध्ये गावातील जुनी पिढी दिशांना कधीही पूर्व-पश्चिम असे संबोधत नव्हती तर ती खाली-वर असे संबोधित होती. उदाहरणादाखल पूर्वेस असणाऱ्या एखाद्या स्थानाला खालच्या बाजूला असे संबोधले जायचे. तसेच पश्चिमेला वरच्या बाजूला अथवा वरच्या अंगाला असेही संबोधले जायचे. गावच्या रचनेसंबंधात बोलायचे झाले तर आजही दलित वस्ती या खालच्या बाजूला अर्थात पूर्वेच्या बाजूला दिसून येतात. आळी अर्थात गली, नगर. या संदर्भाने अनुवादकाने हिंदीतील पूरब टोला चे मराठी रूपांतरण खालची आळी असे केले आहे.     सदर  हिंदी अहवाल "असंतोष" च्या वाचकांसाठी गजानन निलामे  यांनी मराठीत अनुवादित के
योद्धा संन्यासी स्वामी सानंद यांचे गंगा निर्मळ-प्रवाही राहावी याकरिता लढताना बलिदान

योद्धा संन्यासी स्वामी सानंद यांचे गंगा निर्मळ-प्रवाही राहावी याकरिता लढताना बलिदान

Reportage, Uncategorized
गंगेसाठी झटणारे संन्यासी योद्धे डॉ.जी.डी.अग्रवाल यांचे ऋषीकेश येथील एम्स मध्ये निधन झाले.  गंगा पुत्र स्वामी ज्ञानस्वरूप सानंद उर्फ जी.डी.अग्रवाल २२ जून पासून गंगा प्रवाही व निर्मळ राहावी ह्याकरीता उपोषण करीत होते. गंगेच्या शुद्धीकरणासाठी गंगा कायदा बनविण्याची भाषा करणाऱ्या मोदी सरकारपुढे गंगा कायदा बनविण्याची मागणी घेऊन डॉ.अग्रवाल मागील ११२ दिवसापासून उपोषण करीत होते. देशभरात नमामी गंगेच्या नावावर करोडो रुपये खर्च होत आहेत व सरकारने ह्याकरीता एक स्वतंत्र मंत्रालय सुद्धा बनविले आहे. स्वामी सानंद उर्फ डॉ.अग्रवाल यांच्या जाण्याने गंगेच्या जीवनाकरिता लढणाऱ्या आंदोलनास गंभीर धक्का पोचला आहे. २०१४ मध्ये ज्यांना गंगा मातेने बोलविले होते त्यांना यानंतर स्वामी ज्ञानस्वरूप सानंद यांच्यासारख्या जल तज्ञ आणि तपस्वी महापुरुषाला गंगेच्या नावावर का आत्म बलिदान द्यावे लागेल असा प्रश्न विचारला जाईल. २००८
बुलेट ट्रेन च्या सर्व्हेसाठी आलेल्यांना शिलटे गावातील आदिवासी ग्रामस्थांनी हाकलले.

बुलेट ट्रेन च्या सर्व्हेसाठी आलेल्यांना शिलटे गावातील आदिवासी ग्रामस्थांनी हाकलले.

Reportage
पालघर,महाराष्ट्र By Aasantosh Team दि. 9 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वा. पालघर जिल्ह्यातील सफाळे परिसरात शिलटे येथे बुलेट ट्रेन संबंधी लोकं सर्वे करण्यासाठी गावात आले होते. बुलेट ट्रेन ला सम्पूर्ण गावाचा विरोध असल्याने गावात सर्वे करू देणार नाही अशी भूमिका ग्रामस्थांनी याप्रसंगी घेतली. पोलिसांचा बंदोबस्त असतांना देखील ग्रामस्थांनी त्यांना न जुमानता सर्व्हे न करू देण्याची भूमिका घेतली. शेवटी नाईलाज होऊन त्यांना काढता पाय घ्यावा लागला. अशी माहिती भूमिपुत्र बचाव आंदोलनाचे शशी सोनवणे यांनी 'असंतोष' ला दिली. या आधीही बुलेट ट्रेन प्रकल्पाशी संबंधित लोकांनी गावात आणून ठेवलेले दवाखाना रुपी कंटेनरचे काम बंद पाडले होते व त्यावर बुलेट ट्रेन हटावच्या घोषणा ग्रामस्थांनी लिहिल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. बुलेट ट्रेन साठी jica या जपानी संस्थेने शेतकऱ्यांच्या विरोधामुळे कर्ज पुरवठा थांबवल्याची बातमी
राफेल चे जाऊ द्या ! रशियासोबतच्या करारातही अंबानी आहेत.

राफेल चे जाऊ द्या ! रशियासोबतच्या करारातही अंबानी आहेत.

Economics, Reportage
दयानंद कनकदंडे भारताच्या दौऱ्यावर आलेले रशियाचे राष्ट्रपती पुतिन आणि नरेंद्र मोदी यांच्यात ४० हजार कोटी रुपये किमतीच्या इंटि मिसाईल सिस्टीम एस-४०० च्या कराराची बोलणी अंतिम टप्यात आली आहे. विशेष बाब अशी की भारत आणि रशिया यांच्यात करारात ऑफसेट पार्टनर म्हणून रिलायन्स डिफेन्स सुद्धा सामील आहे. ही गोष्ट मोदीजी विसरले आहेत असे दिसते ! एस-४०० बनविणारी अल्माज इंन्टि ही रोसोबोरान एक्सपोर्ट ची साहाय्यक कंपनी आहे.रोसोबोरान हो रशियाच्या वतीने निर्यातक एजन्सी आहे. ही कंपनी रशिया सरकारतर्फे बोलणी करण्याचे काम करते. रिलायन्स डिफेन्स आणि अल्माज इंन्टि यामधील करार हा काही आजचा नाही तर २०१५ मध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मॉस्को दौऱ्यावर असण्यादरम्यान चा आहे. अनिल अंबानी यांच्या रिलायन्स डिफेन्स ने रशियाच्या अल्माज इंटीसोबत ६ अब्ज डॉलरच्या सरंक्षण सामुग्री करारावर स्वाक्षरी केली होती. ( बातमी www.india
राफेल प्रकरणी नरेंद्र मोदी व अंबानी विरोधात तक्रार दाखल.

राफेल प्रकरणी नरेंद्र मोदी व अंबानी विरोधात तक्रार दाखल.

Reportage
वरिष्ठ वकील प्रशांत भूषण, वरिष्‍ठ पत्रकार अरुण शौरी आणि भाजपा नेता यशवंत सिन्‍हा यांनी आज सीबीआय संचालकास भ्रष्‍टाचार विरोधी कायद्याअंतर्गत राफेल विमान की खरेदी प्रकरणात तक्रार दाखल केली. ही तक्रार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, अनिल अम्‍बानी, ट्अन्‍य लोकसेवकांच्या विरुद्ध दाखल केली आहे. तक्रारीचे निवेदन एकूण ३२ पानांचे आहे . ही तक्रार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, अनिल अम्‍बानी, ट्अन्‍य लोकसेवकांच्या विरुद्ध दाखल केली आहे. तक्रारीचे निवेदन एकूण ३२ पानांचे आहे . see Detailed News & Complaint http://www.mediavigil.com/news/complaint-against-modi-ambani-and-others-to-cbi-in-rafale-scam/
नवनाथ मोरे लिखित “पर्यावरण आणि विकास” पुस्तकाचे नांदेड येथे प्रकाशन

नवनाथ मोरे लिखित “पर्यावरण आणि विकास” पुस्तकाचे नांदेड येथे प्रकाशन

Reportage
आज पर्यावरणीय समस्येने गंभीर रूप धारण केले आहे. पर्यावरण की विकास असा प्रश्न आपल्याकडे वारंवार चर्चिल्या जातो .विकास करायचा तर पर्यावरणाकडे थोडे तरी दुर्लक्ष होणारच अशी भूमिका मांडली जाते. नवनाथ मोरे मात्र पर्यावरण हित डोळ्यासमोर ठेवून प्रकृती मानव केंद्री विकास होऊ शकतो असे भूमिका मांडतात असे मत मान्यवरांनी "पर्यावरण आणि विकास" या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी व्यक्त केले . युवा कार्यकर्ते नवनाथ मोरे यांनी लिहिलेल्या लेखाचे संकलन पुण्याच्या मैत्री पब्लिकेशन नी प्रकाशित केले आहे. "पर्यावरण आणि विकास" पुस्तकाचे प्रकाशन नांदेड येथील स्टुडंटस् फेडरेशन ऑफ इंडियाच्या विद्यार्थी मेळाव्यात एसएफआय चे केंद्रीय महासचिव डॉ.विक्रमसिंग यांच्या हस्ते पार पडले. यावेळी राज्याध्यक्ष मोहन जाधव,राज्य सचिव बालाजी कलेटवाड,रोहिदास जाधव,अंनिस चे जिल्हाध्यक्ष डॉ.किरण चिद्रावार आदी मान्यवर उपस्थ
दिल्ली : बापू ! अन्नदात्यावर त्यांनी आज गोळीबार केला आहे. 

दिल्ली : बापू ! अन्नदात्यावर त्यांनी आज गोळीबार केला आहे. 

Reportage
आज गांधी जयंती आहे. लालबहादूर शास्त्री यांचीही जयंती. गांधींच्या जयंतीला १५० वर्षे पूर्ण होताहेत त्याचा महोत्सव हे सरकार साजरा करते आहे. पश्चिम उत्तर प्रदेशातील शेतकरी आपल्या मागण्यासाठी शांतिपूर्ण मार्च करीत होते. ते आज राजघाट येथे पोचणार होते.गांधींना नमन करायला..सरकारला ते आवडलं नाही. दिल्ली-यूपी बॉर्डरवर बॅरिकेड च्या भिंती उभ्या केल्या गेल्या आणि सुरू झाला रक्तपात... देशाच्या सरकारने आज अन्नदात्याला गोळ्या दिल्यात. त्याही गांधी व शास्त्रीजींच्या जन्मदिवशी...सध्या फक्त फोटो पहा.. ! हे जालियनवाला बाग हत्याकांडाचे स्मृतीशताब्दी वर्ष आहे ...
सत्याचा पाठपुरावा आणि जागतिक शांतता प्रस्थापित करणे अधिक आव्हानात्मक आणि गरजेचे आहे -पेन काँग्रेसला पुण्यात सुरुवात 

सत्याचा पाठपुरावा आणि जागतिक शांतता प्रस्थापित करणे अधिक आव्हानात्मक आणि गरजेचे आहे -पेन काँग्रेसला पुण्यात सुरुवात 

Reportage
जगातील कवी,लेखक,कादंबरीकर,निबंधकार यांची संघटना असलेल्या 'पेन इंटरनॅशनल' च्या अधिवेशनाला काल आगाखान पॅलेस येथे कस्तुरबा गांधी व महादेव देसाई यांना वंदन करून सुरुवात झाली. सदर अधिवेशनाकरीता एनगुगी वा थियोन्गो,अशोक वाजपेयी,गुलाम मोहम्मद शेख,आशिष नंदी सहित जगभरातील ४०० प्रतिनिधींची उपस्थिती आहे. सत्याचा पाठपुरावा आणि जागतिक शांतता प्रस्थापित करणे अधिक आव्हानात्मक आणि गरजेचे आहे. महात्मा गांधींच्या विचार कार्यास हे अधिवेशन समर्पित असून सत्य,स्वातंत्र्य,अभिव्यक्ती,विविधता याबाबतीतल साहित्य व्यवहारातील चर्चा या काँग्रेसच्या केंद्रस्थानी असतील असे पेन इंटरनॅशनल च्या आंतरराष्ट्रीय अध्यक्ष जेनिफर क्लेमेंट याप्रसंगी बोलताना म्हणाल्या. सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या विमाननगर परिसरात झालेल्या उद्घाटन सोहळ्यात डॉ. गणेश देवी यांनी 'पेन काँग्रेस आणि पुणे' संबंधी विशेष व्याख्यान दिले. तत्प
जगभरातील लेखकांची संघटना असलेल्या ‘पेन इंटरनॅशनल’ चे अधिवेशन पुण्यात आजपासून सुरु

जगभरातील लेखकांची संघटना असलेल्या ‘पेन इंटरनॅशनल’ चे अधिवेशन पुण्यात आजपासून सुरु

Literature, Reportage
जगभरातील कवी, कथा-कादंबरीकार व अन्य लेखकांची संघटना असलेल्या 'पेन इंटरनॅशनल' या संस्थेचे अधिवेशन आजपासून पुण्यात प्रारंभ होत आहे.हे अधिवेशन २५ ते २९ सप्टेंबर २०१८ या कालावधीत पार पडणार आहे.  पेन इंटरनॅशनल हि ९८ वर्षे सातत्याने कार्यरत असणारी वैश्विक पातळीवरची अशी एकमेव आणि जगविख्यात संस्था आहे.लेखकांचे हक्क सुरक्षित ठेवणे, साहित्यिक, प्रकाशक, पत्रकार यांचे खून होत असतील, त्यांचा छळ होत असेल तर ते रोखण्यासाठी आघाडी खोलणे, ग्लोबलसाऊथ मधल्या देशातील साहित्यिकांना व्हिझिबिलिटी मिळवून देणे, भाषांतर संस्कृती वाढवणे, नागरिकांचे भाषाअधिकार जोपासणे, त्यांचे रक्षण करणे, इत्यादी अवघड कामे-जी केवळ साहित्य संमेलने अथवा साहित्य मेळे भरवतात अश्या संस्था करू शकत नाहीत अशी कामे पेन इंटरनॅशनल संस्था अशी कामे करत अली आहे. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर, मुन्शी प्रेमचंद, पंडित जवाहरलाल नेहरू, निस्सीम इझिकेल, सलम
पत्रकारांच्या होणाऱ्या शोषणाविरोधात देशव्यापी लोकमत निर्माण करण्याचा संकल्प: कमेटी अगेन्स्ट असॉल्ट ऑन जर्नलिज़्म (CAAJ)च्या अधिवेशनाचा दिल्लीत समारोप

पत्रकारांच्या होणाऱ्या शोषणाविरोधात देशव्यापी लोकमत निर्माण करण्याचा संकल्प: कमेटी अगेन्स्ट असॉल्ट ऑन जर्नलिज़्म (CAAJ)च्या अधिवेशनाचा दिल्लीत समारोप

Reportage
  दिल्ली येथील कॉन्स्टीट्युशन क्लब येथे २२-२३ सप्टेंबर २०१८ ला कमेटी अगेन्स्ट असॉल्ट ऑन जर्नलिज़्म (CAAJ) चे दोन दिवशीय अधिवेशन पार पडले. पत्रकारांच्या होणाऱ्या शोषणाविरोधात देशव्यापी लोकमत निर्माण करण्याचा संकल्प घेत काल या अधिवेशनाचा समारोप झाला. या अधिवेशनाला प्रेस क्लब ऑफ इंडिया आणि आंतरराष्ट्रीय दर्जाची पत्रकाराची संघटना असलेल्या ‘कमेटी टू प्रोटेक्ट जर्नलिस्ट’ या संघटनेचे समर्थन मिळाले. याशिवाय तीस पेक्षा अधिक पत्रकारिता संस्था व जनसंघटनानी यात भाग घेतला.   दोन दिवसात चार सत्रात पत्रकारिता व पत्रकार यांच्यावरील संकटांची विस्ताराने चर्चा करण्यात आली. शहीद पत्रकारांचे नातेवाईक,तुरुंगवास भोगलेल्या व नोकरी गमावलेल्या पत्रकारांनी आपले अनुभव कथन केले. देशाच्या प्रत्येक कोपऱ्यातून पत्रकार या अधिवेशनास उपस्थित होते. समारोप सत्रात चारही सत्राच्या चर्चेचा सारांश मांडण्यात आला. एक
कॉ. नजूबाई गावीत यांना पहिला ‘बलुतं पुरस्कार जाहीर!

कॉ. नजूबाई गावीत यांना पहिला ‘बलुतं पुरस्कार जाहीर!

Reportage
पद्मश्री दया पवार प्रतिष्ठान आणि ग्रंथाली वाचक चळवळ यांच्या संयुक्त विद्यमाने 'बलुतंच्या चाळिशी'प्रित्यर्थ 'आत्मकथन' या साहित्यप्रकारास 'बलुतं पुरस्कार' सुरू करण्यात येत असून या वर्षीचा पहिला-वहिला पुरस्कार कॉ. नजूबाई गावीत यांच्या 'आदोर'ला घोषित करण्यात आला आहे. या पुरस्काराचे वितरण २० सप्टेंबर २०१८ रोजी 'बलुतंची चाळिशी' या एकदिवसीय संमेलनाच्या उदघाटनसत्रामध्ये करण्यात येणार आहे. ११,००० रु. रोख, गोधडी आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पहिल्या मराठी आदिवासी लेखिका असलेल्या कॉ. नजूबाई यांच्या 'आदोर' शिवाय 'तृष्णा', 'भिवा फरारी' या कादंबऱ्या आणि 'नवसा भिलणीचा एल्गार' हा कथासंग्रह प्रसिद्ध झालेला आहे. दया पवार यांच्या व्यक्तिमत्वातील 'लेखक - कार्यकर्ता' या बिरुदाशी साधर्म्य सांगणाऱ्या कॉ. नजूबाई यांनी सातत्याने भूमिहीन आदिवासी, शेतकरी, स्त्रिया आणि धरणग्रस्त यांच्या हक्कांसाठीच्या