Editorial Board

सामान्यत : इंग्रजी आणि हिंदी दोन्ही भाषांमध्ये काही ऑनलाईन समीक्षा करणारे,गोष्टीना विविध अंगाने विश्लेषित करणारे मिडीया प्लॅटफॉर्म आहेत. मराठी मध्येही असे मिडीया प्लॅटफॉर्म स्वतंत्रपणे उभे राहत आहेत. कथित मुख्य प्रवाही माध्यमे ज्या प्रश्नांना परिघाबाहेर ढकलत आहेत व नको ते चर्चाविश्व जनमाणसावर लादण्याचा प्रयत्न करीत आहेत त्यास पर्यायी असे चर्चाविश्व निर्माण करण्याच्या व्यापक चळवळीच्या प्रयत्नाचा भाग ‘असंतोष’ वेब पोर्टल असणार आहे.

कुठल्याही प्रस्थापित अशा सरंचनेविरोधातील असंतोषाला सकारात्मक कार्यक्रमाच्या दिशेने जाण्याचा कार्यक्रम महत्वाचा असतो नव्हे तर अराजक निर्माण होईल. प्रस्थापित सत्ता असत्य गोष्टी पसरवून टिकू पाहते आहे व प्रसारमाध्यमे त्या असत्याचा प्रसार करणारी माध्यमे झाली आहेत अशावेळी “सत्य आहे ते बोलणे” महत्वाचे मानून काम केले पाहिजे.

परिघाबाहेरच्या बातम्या,त्यांचे विश्लेषण,विविध अर्थकारण विषयक निर्णयाचे पडणारे परिणाम,साहित्य,कला आदी विषयांना हे मासिक वाहिलेले असेन.

       संपादकीय मंडळ 

दयानंद कनकदंडे 
भाषांतरकार,लेखक,पत्रकार 
 कार्यकारी संपादक @ साप्ताहिक अधिराज्य,
 माजी कार्यकारी संपादक@ त्रैमासिक सगुणा
विद्यार्थी युवक चळवळीत दशकभरापासून सक्रिय,

संपर्क - dayanandk77@gmail.com

रोहित बागुल  

समाजकार्य विषयातील स्नातकोत्तर
युवा भारत  या अखिल भारतीय संघटनेचे कार्यकर्ते...मो न  - ८४१२८७२४७३

सल्लागार मंंडळ

काळूराम काका धोदडे   ‘भूमिसेना’ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, साठ-सत्तर च्या दशकात पालघर जिल्ह्यात जमीनदार-सावकार यांचेकडून आदिवासी जनतेच्या जमिनी सोडविण्याचा संघर्ष व कायदेशीर लढाई, महाराष्ट्रातील जबरान जोत धारकांच्या प्रश्नावर लढाई. पश्चिम भारतातील आदिवासी संघटनांना एकत्र आणून आदिवासी एकता परिषदेच्या स्थापनेकामी पुढाकार.आएप चे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून कार्यरत. सध्या दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर व बुलेट ट्रेन विरोधी आंदोलनाचे नेतृत्व. विविध संघटना व संस्थाद्वारा सन्मानित,महाराष्ट्र शासनाचा आदिवासी सेवक पुरस्कार प्राप्त.

डॉ. उदय मेहता

प्रख्यात समाजशस्त्रज्ञ, मुंबई विद्यापीठतून पीएचडी प्राप्त व समाजशास्त्र विषयाचे प्राध्यापक. शेती संंकट, आधुनिक गुरू व संत, विकासाचे मॉडेल इत्यादी विषयाचे जाणकार, विविध विद्यार्थी, युवक, कामगार, पर्यावरणवादी व मानवाधिकर चळवळीचे मार्गदर्शक. Agrarian Strategies in India, State Secularism and Religion: Western and Indian Experience (CO-editor: Asgar Ali Engineer),and Modern Godmen in India. His most recent publications are Sectarianism, Politics and Development in India, Concepts and Practices (co-editors: Ram Puniyani), Missing Vikass इत्यादी पुस्तके प्रकाशित.

शशी सोनवणे

इतिहास विषयात मुंबई विद्यापीठातुन एम.ए., गेली अडीच दशके सामाजिक-राजकीय चळवळीत सक्रिय, छात्रभारती या संघटनेच्या माध्यमातून कामाला सुरुवात, २००१ साली स्थापन झालेल्या युवा भारत या संघटनेचे एक संस्थापक व दीर्घकाळ संयोजक, इंडियन कौन्सिल फॉर ट्रेड युनियन,दिल्ली चे कार्यकारी राष्ट्रीय अध्यक्ष उत्तन-भाइंदर डम्पिंग ग्राऊंड विरोधी संघर्षाचे नेतृत्व,एअरपोर्टविरोधी आंदोलनात सक्रिय सहभाग रायगड सेझविरोधी आंदोलन,डाउविरोधी आंदोलन यामध्येही सक्रिय सहभाग, बुलेट ट्रेन व औद्योगिक कॉरिडॉर विरोधी संघर्षात सक्रिय, देशभरात सुरू असलेल्या आंदोलनात समन्वय साधून व्यापक साम्राज्यवाद विरोधी आघाडी उभारण्याच्या कामी महत्त्वपूर्ण योगदान, सकल या अनियतकालिकाचे संपादन,सकल साहित्य संमेलनाचे आयोजनात सहभाग, अर्थकारण,इतिहास,सामाजिक-आर्थिक संघर्ष, समकालीन राजकारणाचे भाष्यकार

डॉ.दीपक बोरगावे

कवी,अनुवादक व समीक्षक, इंग्रजी विषयाचे निवृत्त प्राध्यापक, भाषांतर विद्येत पीएचडी, विविध साहित्यकृतीचे मराठी- इंग्रजी व इंग्रजी मराठी भाषांतर, संशोधन व अभ्यासानिमित्ताने इंग्लंड व फ्रांस येथे भेटी. विद्यार्थी दशेत स्टुडेंटस फेडरेशन ऑफ इंडियाचे सक्रीय कार्यकर्ते, डाव्या,मानवाधिकार,पर्यावरण वादि चळवळीचे सक्रीय हितचिंतक. गुजरात फाईल्स या राणा अयुब्ब यांच्या पुस्तकाचे मराठी भाषांतर प्रकाशित, राजन गवस यांची ब-बळीचा हि कादंबरी,रावसाहेब कसबे यांचे झोत व अन्य पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर, विविध नियतकालिकातून निरंतर स्वतंत्र लेखन व अनुवाद. दोन कवितासंग्रह प्रकाशनाच्या वाटेवर

शोभा करांडे

सगुणा महिला संघटनेच्या संस्थापक-अध्यक्ष , मुंबई विद्यापीठाच्या मराठी स्नातकोत्तर. भारताचा महिलावादी पक्ष (Womenist Party Of India)च्या स्थापनेत पुढाकार प्रकृती मानव केंद्रित अखिल भारतीय महिला संमेलनाच्या/ संघटनेच्या स्थापनेत पुढाकार, सगुणा त्रैमासिकाच्या संपादक,’नाती,पाणी,माती’  हा काव्यसंग्रह प्रकाशित