About

सामान्यत : इंग्रजी आणि हिंदी दोन्ही भाषांमध्ये काही ऑनलाईन समीक्षा करणारे,गोष्टीना विविध अंगाने विश्लेषित करणारे मिडीया प्लॅटफॉर्म आहेत. मराठी मध्येही असे मिडीया प्लॅटफॉर्म स्वतंत्रपणे उभे राहत आहेत. कथित मुख्य प्रवाही माध्यमे ज्या प्रश्नांना परिघाबाहेर ढकलत आहेत व नको ते चर्चाविश्व जनमाणसावर लादण्याचा प्रयत्न करीत आहेत त्यास पर्यायी असे चर्चाविश्व निर्माण करण्याच्या व्यापक चळवळीच्या प्रयत्नाचा भाग ‘असंतोष’ वेब पोर्टल आहे. 
कुठल्याही प्रस्थापित अशा सरंचनेविरोधातील असंतोषाला सकारात्मक कार्यक्रमाच्या दिशेने जाण्याचा कार्यक्रम महत्वाचा असतो नव्हे तर अराजक निर्माण होईल. प्रस्थापित सत्ता असत्य गोष्टी पसरवून टिकू पाहते आहे व प्रसारमाध्यमे त्या असत्याचा प्रसार करणारी माध्यमे झाली आहेत अशावेळी “सत्य आहे ते बोलणे” महत्वाचे मानून काम केले पाहिजे.
परिघाबाहेरच्या बातम्या,त्यांचे विश्लेषण,विविध अर्थकारण विषयक निर्णयाचे पडणारे परिणाम,साहित्य,कला आदी विषयांना वाहिलेले पोर्टल आहे.
लिहिणाऱ्या हातांचे स्वागत ! बातम्या,लेख,कविता पाठविण्यासाठी              asantoshwebmagazin@gmail.com