आमची लढाई वगैरे नाही. सरकार ला जाब विचारणे हा आमचा हक्क आहे : घुसमटीतल्या काव्यसदृश्य नोंदी – साहिल कबीर

१..

सरकारशी बोलणी फिस्कटल्यावर नाराज न होता लोकांनी जल्लोष केला. आंदोलनाला बदनाम करणाऱ्यांना या आनंदाचे काही उमजेना. टीवी रिपोर्टर बनून एकटा गेला आंदोलकजनतेला भेटायला.

रिपोर्टर- मागण्या मान्य नाही झाल्या तरी आनंद कसा?

आंदोलक- आम्हांला आम्ही निवडून दिलेल्या सरकार वर भरोसा होता, असेच होईल अशीच अपेक्षा होती.

रिपोर्टर-म्हंजे?
ते- या सरकारने कोणतेही वायदे पूर्ण नाही केले, हा वायदा कसा पूर्ण करतील. आम्ही आमच्याशीच पैज लावली होती. आम्हीच जिंकलो.

रिपोर्टर-मग तुम्ही सरकार ला त्रास देताय का? किंवा तुम्ही कोणत्या तरी राजकीय पक्षाचा सपोर्ट घेताय का?


ते- ऐक, आमची लढाई वगैरे नाही. सरकार ला जाब विचारणे हा आमचा हक्क आहे.
आम्ही सरकार च्या विरोधात नाही. सत्तेच्या भ्रष्ट वापराच्या विरोधात आहोत.
रिपोर्टर- कसं काय बरं?
ते- तू पगारावर काम कर म्हंजे कळेल, दलाली वर डल्ला मारणाऱ्याना कळणार नाही.
—-

२.

🔘

घरची भाकर मोडताना मोर्च्यातल्या मजुराला मालकाच्या मळ्यातल्या गोठ्याची आठवण झाली.
संध्याकाळी कामावरून परतल्यावर आपलं पोर आपल्यासोबत भाकरी मोडायच रोज.
गायी म्हशी ची धार आपणच काढायचो, बछड्या ला पाजवून.
येऊ देत नाही आपल्याशिवाय कुणाला जवळ.
बछड्या चे हाल तर झाले नस्तील ना? आपल्या पोराच्या आठवणीत घास ढकलला आत त्याने.

३.

त्याला काही कळतं नव्हतं काय कराव? पोटच्या पोरांची पोटं रिकामी ठेवून आपण कसं घास गिळू शकतो.मग त्याने प्लास्टिक पिशवीत मित्राने दिलेली बिर्याणी भरभरून घेतली. शर्टाआत लपवून तो बैठकीतून उठला. सायकलीवरून निघाला. मास्क म्हणून रुमाल बांधला तोंडाला, दंड रकमेच्या भीतीने! गाव वेशीवर पोलिसांनी नाही आडवलं त्याला. पण अंधाऱ्या चौकात चार चौघांनी चौकशी केली आडवीतिडवी,बदडलं. बिर्याणी सांडली. तशी घमघमाट नाकात पोचला. चौघांनी मग अजून मारलं. बिर्याणी कशाची, कुठून आणली म्हणून, भुकेला तो हात पाय जोडून रडला. सायकल घेतली, चालत निघाला. रिकाम्या पोटी. घरचा रस्ता सापडेना. रात्रभर बसला मग राम मंदिराजवळ…◼️

४ .


मित्र-
जनआंदोलनात तू अग्रभागी असायला हवं.
मी-
हो, तु घरी च बस.

मित्र-
मी सरकारी नोकर आहे
मी-
नोकर की गुलाम?

कवी कथाकार साहिल कबीर लिहीत आहेत दर सोमवारी…

आधीचे भाग वाचा…

सायलेंट घुसमटीतल्या काव्यसदृश्य बाता -१

सायलेंट घुसमटीतल्या काव्यसदृश्य बाता : शांततापूर्ण तणाव

सायलेंट घुसमटीतल्या काव्यसदृश्य बाता : भाग ३

खोटा माणूस आणि सत्याचा आग्रह?? : सायलेंट घुसमट आणि काव्यसदृश्य बात ..मागील पानावरुन पुढे ..

₹ २०० / संपर्क ८३६९६६६०५७

Leave a Reply