असच असणार आहे इथून पुढे : सायलेंट घुसमटीतल्या काव्यसदृश्य बाता –

साहिल कबीर

🔘

◼️ ती- काहीतरी सुंदर लिही
मी-किसान मोर्चात रक्त पाऊले
ती-छ्छे.असलं काही नको रे
मी- मैं कहूँ आंखन देखी
ती-रम्य कल्पना कर आणि लिही
मी-शेतकरी राजावानी हसतोय
त्याला पुलिस जवान फुलं
भेट देतायत. ऊसमळ्यापासून
कापसाच्याशेतीपर्यंत गव्हाच्या
कापणीला तिथल्या श्रमाला
लाईव दाखवल जातंय.
ती- थांब, जरा वेगळं काही
मी-म्हाताऱ्या किसाना ला मारलं
जातंय जवानांकडून
ती- तुझ्याशी बोलण्यात अर्थ
नाही
मी-अर्थकारणासाठीच सगळं
बिघडवलं जातंय
ती- पुनः तुझं तेच..
मी-भांडवली उद्योगपती ठेऊन
घेतलेत सत्तेने
ती- म्हंजे?
मी- सत्ता उडाळ झाली आहे.◼️
…….. …………………..
◼️
मी-इकडं ये
तो-नाही
मी- तू देशभक्त आहेस
तो- जय जवान जय किसान
मी- दोघं रस्त्यांवर आहेत
तो- देशसेवा करताहेत ते
मी- मेंदू पॉलिश करून घे
तो- ब्रेन वाश झालयं माझं
मी- कुठाय दुकान?
तो-कोणतीही शाखा
मी- मी चालतो का म्हंजे मी येईन.
तो- आधी वंदे मातरम म्हण
मी- मला संपूर्ण पाठय.
तो- अखंड हिंदुस्थान बद्दल काय
मत आहे तुझं
मी-भारताबद्दल बोलू का?
तो-देशद्रोही आहेस तू.
मी-हेच प्रमाणित करायच होत
तूझा मेंदू पेड ट्रोली झालाय.
तो- जपून रहा,तूझा नंबर लागू
शकतो.
मी- उपद्रवमूल्य कमी आहे माझं
तो- कसं काय बरं
मी- सलोखा सहिष्णू
साधेपणावरच लिहितो मी.
तो- तरीही लुडबुड करू नकोस
मी-अण्णाभक्त आहे.मला जाग
येत नाही, राग येतं नाही.◼️
………………………………..

◼️संध्याकाळच्या सांजरंगी उन्हात तेजस्वी सूर्य मावळत होता
तीने माझ्याकडे कटाक्ष टाकला
मी नुस्ता मोर होऊन बागड्लो
मग तीने मला चुंबुन माझा पोपट केला
मी विठू विठू करत वारीच्या आठवणी काढल्या
तीने माझा मुका घेतला परत मी कोकीळ झालो. हेमंती गारठ्यात गाऊ लागलो.चॅनेल बदलावे तसं मला बदलवत नेले.
हत्ती, वाघ ,किमान कुत्रा असे चतुष्पाद करणे तीला परवडनारे नव्हते.बैल गाय म्हैस या सगळ्या रूपात तीला मी छान वाटलो.
रेडा वदला तसा मी वदु लागलो दुख,तीने माझा बोका केला, बोकड केलं, मी बदलत राहिलो.
प्रत्येक अवताराचा तीने मूकाच घेतला, पापी घेतली चुंबनवर्षाव केला.

तीने शेवटी मला गाढव केले.

रूप बदलले तरी मी भारतीयत्वा चा हट्ट केला.

थोडक्यात काय तीने शेवटी मुका घेतला.◼️


🔘

तो-कोण कुणाला मारत आहे
मी- मी तूला तु मला
तो-आपण तर मित्र आहोत आणि शांत आहोत सभ्य
मी- ही शांतता च आपल्यात भांडण लावेल
तो-मग तू बोलत रहा
मी-मी बोललो की तू मार्शील
तो-असं कुठं असतंय व्हय
मी-असच असणार आहे इथून पुढे
म्हणून तूही बोल रे

कवी कथाकार साहिल कबीर लिहीत आहेत दर सोमवारी…

आधीचे भाग वाचा…

सायलेंट घुसमटीतल्या काव्यसदृश्य बाता -१

सायलेंट घुसमटीतल्या काव्यसदृश्य बाता : शांततापूर्ण तणाव

सायलेंट घुसमटीतल्या काव्यसदृश्य बाता : भाग ३

खोटा माणूस आणि सत्याचा आग्रह?? : सायलेंट घुसमट आणि काव्यसदृश्य बात ..मागील पानावरुन पुढे ..

Leave a Reply