सायलेंट घुसमटीतल्या काव्यसदृश्य बाता : ६

ती – आज काय विकून आलास
तो – गाडीची चाकं
ती- किती दिवस चालेल असं?
तो- सरकार चालेल तोवर
असच.
ती – पुढल्या वेळी काय
विकणार?
तो- गाडीचं एंजिन.
ती- मग काय उरेल?
तो- सांगाडा. कामं नाही तोवर हे
करेन.. नंतर
ती- नंतर..
तो- श्रम वीकेन..
ती- त्यापेक्षा विचार बदल
त्या बाजूला अख्ख्या
इंडस्ट्रीज् उभ्या आहेत.
तो- श्रम विकता येतात.
भूमिका नाही.
……………………………


🔲
ती- कशाला घाबरतोस तू?
तो- गायी ला.
ती- गाय काय करते?
तो-सत्ता बदलते.
ती- तुझं अल्पभाष्य नाही
नाही समजत मला.
तो- कुणालाच नाही कळत
म्हणून तर रडं आहे
ती- रडू नकोस मी तुझ्या पाठीशी
आहे.
तो- रडत नाही मी.भीतो लै.
ती- भिऊ नकोस मी तुझ्या
पाठीशी आहे.
तो- आत्ता बरोबर बोल्लीस.
ती-मी तुझ्यापेक्षा उजवी आहे
तो- मी डावा आहे असा दावा


================

🔲

[ [ दोघेही दोन बाजूला वळतात.
ती एका घड्याळाच्या दुकानात
तो रद्दीवाल्या कडं .] ]

🔲
ती- लेटेस्ट मॉडेल दाखवा, मित्राला गिफ्ट द्यायचय.
सेल्सपर्सन- अड्वेन्स्ड मेड इन इंडिया.
तो-भरपूर चांगली पुस्तक आहेत विकायची
रद्दीवाला- रद्दी चा भाव एकच.इथं चांगल वैट काही नाही.
सगळा माल रद्दीच
तो – दुर्मिळ आहेत पुस्तकं!
रद्दीवाला – हो, पण ऊपेग काय किलोच्या दरात घेईन, कित्ती किलो आहेत बघू. आधी आणा
मापात पाप नाही.
काटा अड्वान्स्ड्ड आहे डिजिटल:

ती- हे घे घड्याळ
तो- चला पुस्तक वाचली
ती-म्हंजे
तो- वेळेत आहे घड्याळ
ती- चल भेटू पुन्हा आणि कालची कविता अप्रतिम रे
तो- आज ती विकली दुसऱ्याच्या नावाने.
ती-असं करू नकोस रे
तो-विकासाच्या नावाने देश विकला जातोय
तर कविता विकल्या तर क्या फरक पडता हैं?
ती- तू जिवंत रहा..
तो- माणसं मरताहेत
जाती जिवंत आहेत
ती- जातीचे सोड
तो- धर्मा चे काय?
ती- खरा तो एकची धर्म
तो- प्रेमासाठी कायदा होईल आता
ती- करायच नाही अर्पायच.
तो-एकुणात काय तर समपर्णास्तु.

ती-तथास्तु. तथास्तु.🔲

तो- भांडवली जग माणूस वस्तू.

कवी कथाकार साहिल कबीर लिहीत आहेत दर सोमवारी…

आधीचे भाग वाचा…

सायलेंट घुसमटीतल्या काव्यसदृश्य बाता -१

सायलेंट घुसमटीतल्या काव्यसदृश्य बाता : शांततापूर्ण तणाव

सायलेंट घुसमटीतल्या काव्यसदृश्य बाता : भाग ३

खोटा माणूस आणि सत्याचा आग्रह?? : सायलेंट घुसमट आणि काव्यसदृश्य बात ..मागील पानावरुन पुढे ..

Leave a Reply