भुंकनारा चावत नसतो हे जरी खरं असलं तरी…. : सायलेंट घुसमटीतल्या काव्यसदृश नोंदी – ५


कुत्र्याला सोडलं. कुत्रा भुंकायचाम्हणून गल्लीतल्या लोकांनी तक्रार केली होती.
भुंकण्याचा डेसिबली पुरावा नष्ट केला मालकाने.भुंकनारा चावत नसतो हे जरी खरं असलं तरी कुत्रा खरा चावराबावरा झाला होता, आत राहून.

कुत्रा: माझा या व्यवस्थेवर विश्वास आहे.
मालक: व्यवस्थेवर नको पण माझ्यावर भरोसा ठेव.
कुत्रा: तुमच्यावर भरोसा आहे मालक !
मालक: लक आहे लेका. नाहीतर तुझं काय खरं नव्हतं.
कुत्रा-मी भुंक्लोच होतो की भौउभौउ भूभू
मालक-जन्मसिद्ध अधिकार पाळलास तू.पाळीव ळालीव आहेस आमचा.
कुत्रा-मालक पालक आहात तुम्ही .पण मी दोषी होतो ना-
मालक- नाही याला दोष म्हणत नाहीत, मस्ती म्हणतात.


कुत्रा- मी अनुयायी आहे तुमचा.
मालक -नाही भक्त आहेस आमचा
तुला एक्सट्रा दांताची सर्जरी करावी लागेल.
कुत्रा- माझे खायचे दाखवायचे एकच आहेत की..
मालक- हाडुक चर्वण पार्टीत तूला हे दात उपयोगी पडतील
नाहीतर दात पडतील
कुत्रा- या त्यागासाठी मी तयार आहे.
मालक-तु तयार आहेस पण आम्ही नाही. तूला अक्कल दाढ फुटली तर आम्हांला चाव्शील म्हणून हे सर्जिकल दंतरोपण
कुत्रा:दंतक्षयाचे भय कुणाला च उरणार नाही मग?

मालक- कुणाला का चावा मारा? तू भुंकत रहा..

कुत्रा- भू भौ भू भूभू भौ भौ भू

मालक: नाच रे मोरा नाच
मोर: रीम्जीम गिरे सावन कुठाय
मालक: लोकं रड्ताहेत त्यात भीज्शील.
मोर: पिसारा नाही फुलत यात
मालक: पसारा फूललाय बघ
मोर: माझ्या पायांची शस्त्रक्रिया करा की.
मालक- शेण लावून घे, गोठ्यात नाच आधी
मोर- गाय येऊ देत नाही. लाथा झाडते.
मालक- माता म्हणत जा तीला
मोर- गाईमां म्हणालो तीला
मालक- मां,??
मोर- ती उत्तर भारता तून आलीय इकडं
मालक- नात्यात भूगोल नसतो
मोर-मग भाषा ही नसते.
मालक- तू नाचत जा, बोलत नको जाऊस.
मोर- हो, बोललो की पिंजऱ्यात आणि नाच्लो की मोकळ्या रानी
मालक- तूला नाचायच स्वातंत्र्य आहे. बोलायचं नाही!!
मोर- जंगल जंगल बात चली हैं पता चला है.

मालक- पुन्हा गाणं….?आमच्या छान वैनी गातात.

पोपट- दिवे लावा
मालक- बक्कळ लाव्लेत
पोपट- उजेड पडू डे
मालक- पिंजऱ्यात आहेस तू. तूला उजेड काय आणि अंधार काय.
पोपट- पण लै दिवस टिकत नै असली मस्ती
मालक- नस्ती वटवट करू नको
पोपट- वटवट नै ,सत्यवदतोय मी.
मालक- असो.
बोलती जे अरनब तेचि तूही बोलावे॥

(शेवटी पोपटपंची केकारव केकाटण्याचा क्रूर कोरस भेसूर गडद होत राहतो.फटाके फुटत राहतात काजळी भरून
काळजीसकट)

आता मस्ती मध्ये न्हावे
येणे गोबेली फेकावे
फेकुनी भेद द्यावे

न्यायदान रे॥

साहिल कबीर

कवी कथाकार साहिल कबीर लिहीत आहेत दर सोमवारी…

आधीचे भाग वाचा…

सायलेंट घुसमटीतल्या काव्यसदृश्य बाता -१

सायलेंट घुसमटीतल्या काव्यसदृश्य बाता : शांततापूर्ण तणाव

सायलेंट घुसमटीतल्या काव्यसदृश्य बाता : भाग ३

खोटा माणूस आणि सत्याचा आग्रह?? : सायलेंट घुसमट आणि काव्यसदृश्य बात ..मागील पानावरुन पुढे ..


Leave a Reply