खोटा माणूस आणि सत्याचा आग्रह?? : सायलेंट घुसमट आणि काव्यसदृश्य बात ..मागील पानावरुन पुढे ..

त्याने कविता लिहिल्या त्याला रस्त्यावर लढाव लागलं

म्हातारा झाला तेव्हा काफिला सुटला लांब.पण कविता सुटली नव्हतीकवितेचाच नाद सध्या तुरूंगातकोठडी कवितांची शाळा झालीय कवडसे उगव्ताहेत माणुसकीचे. पण माणूस सड्तोय आता एकाकी.

तो ओरडायला लागला
नंतर किंचाळायला लागला
लोकांनी डोक्यावर घेतलं
त्याने मेंदू धरला
गोबेलीबडबडीतुन त्याने गोड जहर भरलाटाळकी फिरली.
नागरिकांची वाटणी झाली
द्वेषझाडं झालीत माणसं
त्याला ही तुरूंगात जावे लागले
यानं शेवटी सत्याग्रह केला

खोटा माणूस आणि सत्याचा आग्रह??

एक म्हातारा झोपेतून उठतो. सवयीने आंदोलनाची स्कीम पुकारतो. सुधारणेच्या चुकीच्या व्याख्येत गुंडाळललेली भक्तलोकं सोबत येतात. आंदोलन प्रायोजकत्व भेटतात. जाहिरात होते. सामान्य पीच्तो भूल्तो. अण्णादादा गाजतो.
————————.
: ते-आग पेटवली आहे
जाळ लाव.
तो -चूल पेटवता येते,
घरं नाही.

ते- एक अचिव्हमेंट म्हंजे एक घर
तो- मी रस्त्यावरच बरा आहे.

ते-प्रेमाबद्द्ल लिही शृंगारिक सेंसेशनल
तो- क्रांती ची स्वप्नं रोमँटिक असतात.

ते-साल्या काय बोलतोस कळत नाही
तो- म्हणून मी स्तुती करत नाही.

ते-तुझा सत्कार करणार आहोत.
तो-लोकांना राशन वाटा.

ते-उद्या शिबिराला ये, साधक बन
तो-उद्या मोर्चात आहे. नाटक बंद

ते- जयंती ला भाषण ठेऊया तुझं
भाडय़ाने गर्दी करू गच्च.
तो- मला उपाशी पोटी टाळ्या नकोत

ते- बैठकी ला येत जा
तूला सिलिब्रिटी करू.
तो-मी अपंग आहे.
ते-कुबड्या देऊ की
तो-त्यामुळेच अपंग झालोय
ते- दिव्यांग म्हणायचं रे!
तो-वाट्टेल ते म्हणा.

ते- आम्हांला वाटेल तेच म्हणायचं
तो- नाहीतर,
ते- तु शिल्लक राहणार नाहीस
तो- शरीर नश्वर आहे वगैरे.

ते- उगाच बडबड नको. आम्ही सांगतो तसच वागायचं आता
तो- मला ऐकू नाही येतं काही

ते-दरीत टाका याला खोल
तो-मी माणुसकीची ओल
ते- बोल जयतू राष्ट्रम
तो- अर्धवट सगळं उष्टम

ते- कापा याला चिरा
तो-चिरा चिरा हा जुळवावा
ते-कळस कीर्तीचा..
तो- कळस नाही. किळस आलाय तुमचा
ते-ठेचा याला ठेचा
तो- आला बघा मोर्चा…

तो -जिन्दाबाद,
ते-पळापळा लपा छुपा
तो- उद्या मारू पुढल्या गप्पा.

साहिल कबीर

कवी कथाकार साहिल कबीर लिहीत आहेत दर सोमवारी…

आधीचे भाग वाचा…

सायलेंट घुसमटीतल्या काव्यसदृश्य बाता -१

सायलेंट घुसमटीतल्या काव्यसदृश्य बाता : शांततापूर्ण तणाव

सायलेंट घुसमटीतल्या काव्यसदृश्य बाता : भाग ३

Leave a Reply