सायलेंट घुसमटीतल्या काव्यसदृश्य बाता : भाग ३

साहिल कबीर


ते- इतक्या पुस्तकांच काय
करतोस?
तो – सध्या जाळ करावा
म्हणतोय.
ते – म्हंजे विध्वंकस विद्वान
आहेस म्हनं की.
तो-थेंक्यु.विद्वान म्हंटल्याबद्दल
ते- तूला कायद्याने शिक्षा
दिली पाहिजे.
तो- म्हंजे कायदा जीवंतय!!

_____________

ते- थांबव गाडी. तपासू दे
तो- लायसन्स आहे की
ते- गाडीचा परवाना नको
तो- मग..
ते- कशाची ने-आण करतोस
ते पत्र दाखव.
तो- मी हिरवा भाजीपाला नेतोय
ते- मातेचा चारा चोरलास,
तो- वैरण नव्हे हे..

ते – वैर तर आहेच..

ते – पोपट आवडतो का
तो- त्याचा रंग आवडतो
ते- हा रंग जिहाद आहे
तो- तूमची सोच बाद आहे
ते- तूला निकाल याद आहे काय?
तो- निकालात ही वाद आहे.
ते-अपमान आहे भूमीचा
तो-नाही.
संविधानाच्या भूमिकेचा अपमान
आहे.
————————-,—————

ते- मातरम
तो- पाचेक वेळा डोकं टेकतो
ते- चालता हो, जा पाकात
तो-वसुदेव कुटुंबकम
ते-गाय सांभाळ माता आहे
तो- घरी तुकोबाची गाथा आहे
ते- देऊळ इथंच होईल

तो- हॉस्पिटल पण बांधा की.

ते- अभिव्यक्ती स्वातंत्र्याची खात्री
काय?
तो- मी घरी धर्म ठेवतो कोपऱ्यात

ते- मग रस्त्यावर कधी येता
तो-आलो की धर्मांध ठरवले जातो
ते- आम्ही खुप सहन करतो
तो-मी सगळे सण साजरे करतो.
ते-आरती म्हण, घालीन लोटांगण
तो- जनगणमन
ते- अधीनायक जय आहे

तो- भय हे भय हे भय हे

ते- घर वापसी कर

तो- सध्या बेघर आहे.

ते म्हणाले तो म्हणाला
ते म्हणत राहिले तो म्हणतं राहिला .
मी म्हणालो –
सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ता हमारा
दोघे म्हणाले-
याला तोडा फाडा, याला मारा

————————————🔲
साहिल कबीर.

कवी कथाकार साहिल कबीर लिहीत आहेत दर सोमवारी…

आधीचे भाग वाचा…

सायलेंट घुसमटीतल्या काव्यसदृश्य बाता -१

सायलेंट घुसमटीतल्या काव्यसदृश्य बाता : शांततापूर्ण तणाव

Leave a Reply