सायलेंट घुसमटीच्या काव्यसदृश बाता : शांतता पूर्ण तणाव

कवी कथाकार साहिल कबीर यांच्या काव्यसदृश्य बातांच सदर  दर सोमवारी …

आज भाग दुसरा…

🔲

ती: पोट खूप वाढलंय तुमचं
तो: दौड मध्ये सहभागी होणार
आहे.
ती: म्हणजे
तो: दिवस शस्त्र घेऊन पळायच
गावातून.
ती: काय होत त्यानं?
तो: वजन कमी होतं
आणि वजन वाढत सुध्दा!
ती-: नाही कळलं
तो: शरीराचे वजन कमी होतं
पण गल्ली गावात दहशत
वाढते .
ती: असं नसत काही
तो: ठीकाय उद्या मोहल्ल्यातून फिरताना बघ, कळेल तूला

ती: मला पण सामील करून घ्या
तो: ये की फेटा बांधून .
तु देवी असतेस बाई

या सीजन ला.

2)
ती- शस्त्र घेऊन फिरणं हा गुन्हा आहे ना?
तो- धर्मासाठी शस्त्र उचलावी लागतात, पुजावी ही लागतात.
आम्ही धर्माळू.
ती- त्यापेक्षा शेतीची अवजारे घेऊन फिरलात तर बरें होईल
तो- आमच्याकडे ट्रँक्टर आहे
आणि बेंदराला दारू पाजवून बैल नाचवतो की ..

3)
ती-बनियान कित्ती फाटलय बघ
तो-परीस्तीथी फाटकी हाय
ती-चल बद्लूया,
तो-काय, बनियान की परिस्थिती?
🔳

4)

ती -मार्केटातून भाजीपाला आण
तो- त्यो रफ्या गाड्यावर आणून देतो ना गल्लीत.
ती- नाही.ठरलंय नाही घ्यायचं म्हणून.
तो-कुणी ठरवलं
ती-व्हाट्स अप वर msg आलेत,ठरावाचे!

5)

ती- कांदा वगैरे महाग झालाय, काय होईल पुढं?
तो- दलाल हसेल, सामान्य चिंतीत होईल, शेतकरी रडेल.
ती-मग आपण काय करायचं
तो-शेतीधोरणाचे समर्थन
ती-त्याने काय होईल
तो-सर्टिफिकेट पक्क होईल
ती-कशाचं
तो-आपण देशभक्त असल्याच!

🔳
6)
ती-काही जाळले का? पाडले का?
तो-काही जाळल नाही पडलं नाही
ती-हेच वदवून घ्यायच होत.
तो-रेडा वदला होता मग आम्ही ही वदु तुम्हास हवे तसे,
जिजिविषा वगैरे आम्हालाही आहे की.

🔳
7)
ती-सगळं कसं शांततेत चाललय
गावातल्या सणानां गर्दी बघ
तो- अजून एक दंगल बहाल केली जाईल


Leave a Reply