कवी कथाकार साहिल कबीर यांच्या काव्यसदृश्य बातांच सदर आजपासून दर सोमवारी …
ती- चित्र काढायचय.
मी- गाय किंवा मोर काढ .
ती: रंग कोणता आवडतो
मी- जातधर्म न चिकटलेला
🔳
ती: डॉक्टर इज सेकंड गॉड
मी: सध्या नास्तिक आहे मी.
ती: म्हणजे..?
मी: तूला डॉ.कलबुर्गी किंवा
डॉ.कफिल म्हाइती नैत काय?
🔳
ती: लॉक डाऊन मधला अनुभव कसा तुझा?
मी: आधुनिक अस्पृश्य अस्मिता जाड झाली.
ती: सुशांत बद्दल काही?
मी: नजिब रोहित वर बोलू आपण
नट्या बोलतील सुशांत वर.
🔳
ती सांडत राहिली
भांडत मांडत राहिली
स्त्रीविषयक वाद वगैरे .
मी गौरी म्हणालो,
मी सफुरा जरगर म्हणालो
फातिमा वगैरे बोललो.
तिने पितृसत्ता शब्द ऐकवला
मला पहलु अख्लाक
आणि
मोहसीन आठवला…
ती: good bye
मी: कायमचा निरोप??
ती: नाही रे. चुकून
मी: ओके. सहिष्णुता टिकवून ठेव.
ती: मी सेक्यूलर आहे रे.
मी: मी तर सेकुलरीज्म चा होल्सेल परिक्षार्थी.
ती: शिक्षक दिनाच्या शुभेच्छा
मी: थांब. गोंधळ होतोय तुझा.
ती: काय जी डी पी बद्दलमत तुझ
मी: हा प्रकार
नीरमल रमणीय आहे.
ती- असो शेवटी गझलेचा एखादा शेर पेश कर.
मी- मला सध्या संजीव भट आठवतायत एफबी वाचून.
ती: असो.
मी : (अण्णा )
हजारो जवाबो से अच्छी है खामोशी मेरी..
न जाने कितने सवालो की आब्रु रखे..
साहिल कबीर