प्रेम हे नैसर्गिक आहे, कधी होईल हे सांगणे कठीण आहे – भगत सिंग

Courtsy : Mediavigil.com


व्हॅलेंटाईन डे विशेष

सुखदेव आणि भगतसिंह यांच्यात घनिष्ठ निकटता होती, परंतु बॉम्बस्फोटाच्या घटनेची जबाबदारी घेण्यासंबंधाने जाणाऱ्या दोघांच्या मनात काही गैरसमज होते. (सुखदेवला वाटले होते की भगतसिंह प्रेमात पडला आहे , त्यामुळे तो जोखीम घेण्यास घाबरतो आहे. ). हा गैरसमज दूर करण्यासाठी भगतसिंह यांनी सुखदेव यांना एक पत्र लिहिले. हे पत्र ११ एप्रिल १९२९ रोजी सुखदेवच्या अटकेवेळी पोलिसांना सापडले आणि खटल्याच्या प्रक्रियेचा एक भाग बनले. – संपादक

प्रिय भावा..

जोपर्यंत तुला हे पत्र मिळेल, तो पर्यंत मी माझ्या इच्छित स्थळी पोहोचलो असेल. माझ्यावर विश्वास ठेव, आजकाल मी माझ्या शेवटच्या प्रवासासाठी आनंदाने सज्ज झालो आहे. माझ्या आयुष्यात सुख आणि आनंददायी अशा भरपूर आठवणी असूनही माझ्या हृदयात एक गोष्ट आजहि बोचते आहे कि, माझ्या भावाने मला चुकीचे समजले आणि माझ्यावर मी कमजोर असल्याचा गंभीर आरोप लावला. आज मी पूर्वीपेक्षा अधिक समाधानी आहे. मला अजूनही असे वाटते की त्या गोष्टीत काहीच नव्हतं तर एक गैरसमज होता. एक संशय .माझ्या मोकळ्या-ढाकळ्या स्वभावामुळे मला बडबडया समजण्यात आल. माझ्याकडून सर्वकाही कबूल केले जाण्यास कमजोरी मानली गेली. पण आज मला असं जाणवतंय की, कुठलाही गैरसमज नाही, मी कमजोर नाही, आपल्यापैकी कोणीही कमजोर नाही.

माझ्या भावा.. मी स्वच्छ मनाने तुम्हा सगळ्यांचा निरोप घेईन आणि तुझ्या शंका दूर करीन. ह्या साठी तुझी मदत महत्वाची ठरणार आहे. लक्षात असू दे कि, घाई-गडबडीत तू कुठलेही पाऊल उचलू नकोस. लक्षात ठेव कि संधी मिळविण्याची सुद्धा गडबड नको. जनतेच्या प्रती असलेले कर्तव्य निभावित अत्यंत सावधगिरीने काम करीत रहा . आता सल्ला म्हणून सांगतो कि शास्त्री मला पूर्वीपेक्षा आता आवडायला लागला आहे. जर त्याने अत्यंत स्पस्ष्टपणे एका गडद अंधाऱ्या भविष्याकरिता स्वतः चे समर्पण केले असते तर मी त्यास पुढे आणण्याचा प्रयत्न केला असता. त्याला बाकी सहकाऱ्यांच्या जवळ येऊ दे जेणेकरून त्याला त्यांच्या आचार-विचाराचा अभ्यास करता यावा. जर त्याने भक्तिभावाने कार्य केले तर ते अधिक लाभदायी आणि मौल्यवान ठरेल. मात्र घाई नको .तू स्वतः चांगला पारखी आहेसच .जसे तुला तसे तपासून घे . ये माझ्या भावा,आता आपण आनंद साजरा करूया.. !

वादविवादाच्या संदर्भाने मी म्हणेन कि आपली बाजू मांडल्याशिवाय मला राहवत नाही.
मी ठामपणे सांगतो कि मी आशा-आकांक्षेनी व्याप्त अशा आयुष्याच्या सर्व रंगांनी भारलेलो आहे आणि हे हि कि वेळ आल्यावर मी या सर्वांचा त्याग करून टाकीन. खऱ्या अर्थाने हेच बलिदान आहे. मानवी जीवनात या गोष्टी कधीही अडथळा बनू शकत नाहीत, जर ती व्यक्ती व्यक्ती असेल. लवकरच तुला याचा पुरावा मिळेल. एखाद्याच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल विचार करताना ह्या बाबींचा विचार करावयास हवा कि त्याच्यासाठी प्रेम उपयोगी असल्याचे सिद्ध झाले आहे काय ?
मी आज जे उत्तर देतो ते होय असे आहे. – होय तो मेजिनी होता, तु वाचले असशील की त्याचा पहिला अयशस्वी विद्रोह, मनातील कुजलेले दुःख आणि शहीद साथीदारांचे स्मरण – हे सर्व सहन करता येण्यापलीकडचे होते . तो ठार वेडा झाला असता किंवा त्याने आत्महत्या केली असती. प्रेमिकेच्या एका पत्राने इतरां एव्हढा नाही मात्र अधिक मजबूत झाला होता.

प्रेमाच्या नैतिक पातळीसंदर्भाने बोलायचे तर मी हे म्हणेन कि ती स्वतः अशी भावना आहे आणखी काही नव्हे आणि ह्यात पशुवृत्ती नाहीये तर मानवी भावना आहे. प्रेम सदैव मानवी चारित्र्याला एका उंचीवर नेते. ते कधी खाली नाही पाडत जरूर,ते प्रेम प्रेमचं असायला हवं . या मुलींना (प्रेयसीना) पागल नाही म्हणता येऊ शकत. जसे कि आपण सिनेमात पाहतो कि त्या नेहमी पाशवी वृत्तीच्या हाती खेळत असतात. खरे प्रेम हे कधीही निर्मित करता येत नाही. ये येत स्वतः – केव्हा कुणी नसतं बोलवत.. प्रेम हि पूर्णपणे नैसर्गिक अशी गोष्ट आहे.

मी हे म्हणू शकतो की तरुण पुरुष आणि स्त्रिया एकमेकांवर प्रेम करू शकतात आणि त्यांच्या प्रेमाच्या आधारे ते त्यांच्या आवेगांच्या वर जाऊ शकतात. आपल्या पवित्रतेला जपू शकतात. मला हे स्पष्ट करायला हवे कि जेव्हा मी प्रेमास मानवीय दुर्बलता संबोधले होते ते सामान्य व्यक्तीच्या संदर्भात नव्हते. जसे कि सामान्य बुद्धया सामान्य लोक असतात. जेव्हा मनुष्य प्रेम,घृणा आणि अन्य सर्व भावनांवर विजय मिळवेल ती उच्च अशी आदर्श स्थिती असेल. जेव्हा मनुष्य तर्काच्या आधारे आपली बाजू ठरवेल . वर्तमानात ज्या प्रकारे लोक प्रेम करताहेत ते वाईट नाहीये तर चांगले आहे,. दुसरीबाब अशी कि,प्रेमाची निंदा करताना मी आदर्शवादी अशा स्थितीमध्ये एका व्यक्तीच्या दुसऱ्या व्यक्तीबद्दल असलेल्या प्रेमाची निंदा केली आहे. मात्र मनुष्यांमध्ये प्रेमांची तीव्र भावना असणे आवश्यक आहे जी एका व्यक्तीपुरती मर्यादित न राहता सर्वव्यापी होण्याच्या दिशेने जावी.
मला वाटतं कि मी माझी बाजू पुरेशी स्पष्ट केली आहे. आणि हो आणखी एक गोष्ट सांगायची म्हणजे आपण सगळ्या रॅडिकल विचारांवर विश्वास ठेवणारे झाले असलो तरी नैतिकतेच्या अती -आदर्शवादी धारणापासून मुक्त झालेलो नाहीयेत. आपण तमाम कल्पनेत असलेल्या क्रांतिकारी गोष्टीबाबत लंब्या -चौड्या बाता करू शकतो मात्र वास्तविक जीवनात त्यांचा सामना करावा लागल्यावर हातपाय थरथरायला लागतात.
मी तुला विनंती करेन कि हि दुर्बलता काढून टाक . आपल्या मनात कसलिही वाईट भावना न आणता अत्यंत विनम्रपणे मी तुला आग्रह करू शकतो का कि तुझ्यात हा जो अति -आदर्शवाद आहे त्याला थोडे कमी कर. जे मागे राहतील आणि मजसारख्या बीमारीने ग्रस्त असतील त्यांच्याशी रुक्षपणे नको वागूस. झिडकारून त्यांचे दुःख नको वाढवू . मी अशी आशाा ठेवू का कि तू एखाद्याबद्दल मनात बदल्याची भावना न ठेवता त्यांच्याशी सहानुभूतीने व्यवहार करशील. त्यांना याची फार गरज आहे. तू या गोष्टींना तोपर्यंत समजू शकणार नाहीस जोपर्यंत तू या गोष्टीचा स्वतः शिकार होत नाहीस. हे मी का लिहीत आहे ? खरेतर मी माझे अधिक स्पष्टपणे मांडूं इच्छितो म्हणून. मी आपले मन मोकळे केले आहे.


तुझ्या यशासाठी आणि जीवनासाठी शुभेच्छा !

तुझा
भगतसिंह

भाषांतर : रोहित बागुल & दयानंद कनकदंडे

One comment

  1. भगतसिंहाबाबत श्रद्धाभाव उच्चकोटीचा असला तरी प्रत्यक्ष भगतसिंहाबद्दल खुपच कमी माहिती आहे. अशी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

Leave a Reply