राफेल: ‘समांतर वाटाघाटी थांबवा’ – PMO ला सरंक्षण मंत्रालयाने आधीच दिली होती सूचना !

By Aasantosh Team

द हिंदूंचे संपादक एन राम यांची शुक्रवारी प्रकाशित झालेली राफेल कराराबाबत महत्वाचे खुलासे करणारी कव्हर स्टोरी आणि त्यानंतर राहुल गांधी यांनी घेतलेली पत्रकार परिषद यामुळे राफेल कराराचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. ही कव्हर स्टोरी प्रकाशित झाल्यापासून या घडीपर्यंत समाजमाध्यमांत हा मुद्दा सर्वात जास्त चर्चेचा झाला आहे. राम यांनी आपल्या लेखात प्रधानमंत्री कार्यालयाकडून राफेल करारासंबंधाने बोलणी करण्याच्या होत असलेल्या समांतर हालचाली न करण्याबाबत संरक्षण मंत्रालयाने पत्र पाठवून त्यांना सुनावले असल्याचा उल्लेख केला आहे.

मागील वर्षभरापासून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना आपल्या व्यक्तिगत प्रभावाचा वापर करीत अनिल अग्राल यांच्या कंपनीला लाभ मिळवून दिल्याचे कॉंग्रेस म्हणीत आली आहे. प्रकाशात आलेले पत्र जे की २४ नोव्हेंबर २०१५ ला लिहिण्यात आले आहे ते सदरील आरोपास बळ देणारे आहे.

पत्रात काय म्हटले आहे ते पाहू ….

  • ” पीएमओ कडून चालविल्या जात असलेल्या समांतर चर्चेच्या परिणामी सदर करारात एमओडी आणि भारतातर्फे ज्यांना चर्चेचे अधिकारी यांच्या वाटाघाटी करण्याच्या क्षमतेवर परिणाम केला आहे. आम्ही पीएमओ ला सल्ला देऊ इच्छितो की असा कुठलाही अधिकारी जो की वाटाघाटी करण्यासंबंधी भारतीय पक्षाचा भाग नसेल त्याने फ्रांस सरकारच्या कार्यालयाशी समांतर वाटाघाटी करण्याच्या लुडबुडीपासून दूर राहावे.

एन.राम यांचा लेख : Defence Ministry protested against PMO undermining Rafale negotiations
———————————————————–

काँग्रेस पक्षानी केलेले ट्विट्स पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..

Check out @INCIndia’s Tweet: https://twitter.com/INCIndia/status/1093723977715920899?s=09

Check out @INCIndia’s Tweet: https://twitter.com/INCIndia/status/1093733762104524800?s=09

Leave a Reply