Follow Us
asantoshwebmagazin December 16, 2018

पर्यावरण संघर्ष समितीच्या वतीने २८ डिसेंबर  २०१८ रोजी वायएमसीए मैदान,माणिकपूर,वसई (प) येथे पर्यावरण संवर्धन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून सदर  कार्यक्रमास गुजरात राज्यातील आमदार जिग्नेश मेवानी  उपस्थित राहणार आहेत. फादर दिब्रिटो यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित पर्यावरण संवर्धन मेळाव्याचे उदघाटन आदिवासी एकता परिषदेचे नेते काळुराम काका धोदडे यांच्याहस्ते होणार असून माजी मंत्री,नगररचनाकार चंद्रशेखर प्रभू यांची विशेष उपस्थिती असणार आहे. चंद्रशेखर प्रभू हे समितीचे मार्गदर्शक आहेत.

 

९० च्या दशकात वसईच्या पर्यावरणावरून नांगर फिरविला जात असताना फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी हरित वसई ची चळवळ उभारून लढा दिला होता.एमएमआरडीए  विकास आराखड्याविरोधात समीर वर्तक यांच्या नेतृत्वाखालील पर्यावरण संघर्ष समितीने लढा पुकारला आहे. हा आराखडा हरित वसईला संपविणारा असल्याची त्यांची भूमिका आहे.  लोकहिताचे आवरण देत बुलेट ट्रेन,सागरी महामार्ग  सारखे  विविध विनाशकारी प्रकल्प वसई व पालघर जिल्ह्यात आणले जात आहेत. काळुराम काका धोदडे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दोन अडीच वर्षांपासून सदर  प्रकल्पाविरोधात लढाई सुरु असून वसई येथील पर्यावरण संवर्धन समिती त्याचा महत्वाचा भाग आहे.

 

 

 

 

1 thought on “बुलेट ट्रेन व अन्य प्रकल्पाविरोधात आ.जिग्नेश मेवानी यांच्या उपस्थितीत वसई येथे २८ डिसें ला पर्यावरण संवर्धन मेळावा.

Leave a Reply

%d bloggers like this: