पालघर जिल्ह्यातील आदिवासी,शेतकऱ्यांचा आज पालघर येथे बुलेट ट्रेन विरोधात धिक्कार मोर्चा

प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेली बुलेट ट्रेन मुंबई ते अहमदाबाद मार्गावर धावणार आहे. ५०८ किमी असलेला हा मार्ग महाराष्ट्र,गुजरात व दादरा नगर हवेली या प्रदेशातून जाणार आहे. महाराष्ट्रातून जाणारा हा मार्ग राज्याच्या पालघर जिल्ह्यातून जाणार आहे. यामुळे शेती,पाणी,जंगले यांचे मोठे नुकसान होण्याबरोबरच लाखो आदिवासी,शेतकरी व मासेमार लोकांच्या उपजीविका धोक्यात येणार आहेत.

बुलेट ट्रेन प्रकल्प व अन्य वाधवान बंदर,नारगोल बंदर,मुंबई वडोदरा एक्सप्रेस वे यानाही महाराष्ट्र व गुजरात राज्यातील जनतेचा विरोध आहे.अनुसूचित क्षेत्रातील ग्रामसभांनी पेसा कायद्याअंतर्गत विरोधाचे ठराव पारीत केले आहेत. आतापर्यंत मोर्चे,धरणे,निवेदने,ग्रामसभांचे ठराव इत्यादीद्वारे प्रकल्पांना विरोध दर्शवूनहि प्रशासनाकडून जबरदस्तीने जमीन सर्वेक्षण करण्याचे,गावात दहशत निर्माण करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

333

गावागावात जमीन सर्वेक्षणाचे काम प्रशासनाकडून सुरु असून त्यास गावात मोठ्या प्रमाणात विरोध होतो आहे. प्रशासनाकडून काही आंदोलकावर गुन्हे दाखल करण्याचे प्रयत्न सुद्धा होत असल्याने आंदोलक आक्रमक झाले आहेत. पालघर जिल्ह्यातील जनतेचा विरोध डावलून जबरदस्तीने प्रकल्प पुढे रेटण्याच्या प्रयत्नाविरोधात पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर दि. २६ ऑक्टोबर २०१८ ला आदिवासी एकता परिषदेच्या वतीने धिक्कार मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्च्यात महाराष्ट्र व गुजरात राज्यातील संघर्ष समित्या व जनसंघटना यांचा संयुक्त मोर्चा असलेली भूमिपुत्र बचाव आंदोलन, खेडूत समाज गुजरात,शेतकरी संघर्ष समिती पालघर,वाढवन बंदर विरोधी संघर्ष समिती,मच्छीमार कृती समिती, पर्यावरण संघर्ष समिती वसई.आदिवासी संघर्ष मोर्चा,सगुणा संघटना व युवा भारत संघटना सहभागी असणार आहे.

………………………………………………………………………….

हे सुद्धा वाचा..

बुलेट ट्रेन च्या सर्व्हेसाठी आलेल्यांना शिलटे गावातील आदिवासी ग्रामस्थांनी हाकलले.

अलाहाबादचे प्रयागराज झाले आणि इकडे अंबानीस ४६७ एकर आरक्षित वन जमीन दिली गेली- रवीश कुमार

शहरी इंडिया आणि ग्रामीण भारत यात मोठी तफावत का आहे ?

Leave a Reply