बुलेट ट्रेन च्या सर्व्हेसाठी आलेल्यांना शिलटे गावातील आदिवासी ग्रामस्थांनी हाकलले.

  •  

पालघर,महाराष्ट्र

By Aasantosh Team

दि. 9 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वा. पालघर जिल्ह्यातील सफाळे परिसरात शिलटे येथे बुलेट ट्रेन संबंधी लोकं सर्वे करण्यासाठी गावात आले होते. बुलेट ट्रेन ला सम्पूर्ण गावाचा विरोध असल्याने गावात सर्वे करू देणार नाही अशी भूमिका ग्रामस्थांनी याप्रसंगी घेतली. पोलिसांचा बंदोबस्त असतांना देखील ग्रामस्थांनी त्यांना न जुमानता सर्व्हे न करू देण्याची भूमिका घेतली. शेवटी नाईलाज होऊन त्यांना काढता पाय घ्यावा लागला. अशी माहिती भूमिपुत्र बचाव आंदोलनाचे शशी सोनवणे यांनी ‘असंतोष’ ला दिली.

या आधीही बुलेट ट्रेन प्रकल्पाशी संबंधित लोकांनी गावात आणून ठेवलेले दवाखाना रुपी कंटेनरचे काम बंद पाडले होते व त्यावर बुलेट ट्रेन हटावच्या घोषणा ग्रामस्थांनी लिहिल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

बुलेट ट्रेन साठी jica या जपानी संस्थेने शेतकऱ्यांच्या विरोधामुळे कर्ज पुरवठा थांबवल्याची बातमी आली होती. दुसऱ्या एका बातमीनुसार बुलेट ट्रेन च्या कर्जासंबंधी अजून करार झाला नसल्याचे सांगण्यात येत आहे.संबंधित बातमी

पालघर जिल्ह्यातील आदिवासी,शेतकरी,मासेमारांचा बुलेट ट्रेन,एक्सप्रेस वे,वाढवण बंदर इत्यादी प्रकल्पास विरोध असून आदिवासी एकता परिषदेचे नेते काळूराम काका धोदडे यांच्या नेतृत्वात संघर्ष सुरू आहे. गुजरात च्या खेडूत समाजाचा देखील सदर प्रकल्पास विरोध असून शेतकऱ्यांच्या वतीने गुजरात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.

  •  

4 Comments

Leave a Reply

%d bloggers like this: