मोहिनी कारंडे
सोम्या गोम्या हऱ्या नाऱ्या या सर्व आदिमानवांच्या मेंदूत
एकदा परिवर्तनाची खुमखुमी आलीत्यांनी मिळून कंपासच्या साहाय्याने
३६ अंशातला एक गोल काढला
ते विस्मय चकित आनंदाने एकाचवेळी हरखले.
त्यांनी गगनाकडे पाहत हात वर केले३६० च्या अंशात आणखी मोठ्ठा गोल काढता येतो
त्यांना नव्हतं माहिती,
मग सुरू झाला खेळ गोलातला.
गोल खूपच भला थोरला मोठ्ठा असल्यानं
आणि सगळेच गोलाच्या आत असल्यानं
एकमेकांना भेटायचेमग काय ..?
इव्हेंट, परिसंवाद, चर्चा झडू लागल्या
प्रबोधनाची ललकारी
आंदोलनाची आरोळी
सगळीच खेळीमेळी
सगळे खेळ गोलातलेच
गोलगोलराणी, इथं इथं पाणी
सगळे गोलरहिवासी सुखसमाधान मानणारेपुढं त्यांच्या उपमूळांनाही तशाच फिलिंग आल्या
पुढे गोलांचे अनेक गोल होत गेले
हळूहळू शहरं व्यापत चाललेत गोल
कुणीतरी भेदायला हवेत हे गोल
बहुत सुन्दर मोहिनी
[…] कविता : कुणीतरी भेदायला हवेत हे गोल […]
[…] कविता : कुणीतरी भेदायला हवेत हे गोल […]
[…] कविता : कुणीतरी भेदायला हवेत हे गोल […]