नवनाथ मोरे लिखित “पर्यावरण आणि विकास” पुस्तकाचे नांदेड येथे प्रकाशन

  •  

आज पर्यावरणीय समस्येने गंभीर रूप धारण केले आहे. पर्यावरण की विकास असा प्रश्न आपल्याकडे वारंवार चर्चिल्या जातो .विकास करायचा तर पर्यावरणाकडे थोडे तरी दुर्लक्ष होणारच अशी भूमिका मांडली जाते. नवनाथ मोरे मात्र पर्यावरण हित डोळ्यासमोर ठेवून प्रकृती मानव केंद्री विकास होऊ शकतो असे भूमिका मांडतात असे मत मान्यवरांनी “पर्यावरण आणि विकास” या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी व्यक्त केले .

युवा कार्यकर्ते नवनाथ मोरे यांनी लिहिलेल्या लेखाचे संकलन पुण्याच्या मैत्री पब्लिकेशन नी प्रकाशित केले आहे. “पर्यावरण आणि विकास” पुस्तकाचे प्रकाशन नांदेड येथील स्टुडंटस् फेडरेशन ऑफ इंडियाच्या विद्यार्थी मेळाव्यात एसएफआय चे केंद्रीय महासचिव डॉ.विक्रमसिंग यांच्या हस्ते पार पडले.

यावेळी राज्याध्यक्ष मोहन जाधव,राज्य सचिव बालाजी कलेटवाड,रोहिदास जाधव,अंनिस चे जिल्हाध्यक्ष डॉ.किरण चिद्रावार आदी मान्यवर उपस्थित होते.

संबंधित लेख…….

भांडवलशाही : निसर्गाचे विनाशकारी शोषण करणारा एकमेव गुन्हेगार- अॅलन बाडिओ

पुस्तक मिळविण्यासाठी संपर्क :-

मोहिनी कारंडे : मो – 92846 17081

  •  

Leave a Reply

You may have missed

%d bloggers like this: