जगभरातील लेखकांची संघटना असलेल्या ‘पेन इंटरनॅशनल’ चे अधिवेशन पुण्यात आजपासून सुरु

pen

जगभरातील कवी, कथा-कादंबरीकार व अन्य लेखकांची संघटना असलेल्या ‘पेन इंटरनॅशनल’ या संस्थेचे अधिवेशन आजपासून पुण्यात प्रारंभ होत आहे.हे अधिवेशन २५ ते २९ सप्टेंबर २०१८ या कालावधीत पार पडणार आहे.  पेन इंटरनॅशनल हि ९८ वर्षे सातत्याने कार्यरत असणारी वैश्विक पातळीवरची अशी एकमेव आणि जगविख्यात संस्था आहे.लेखकांचे हक्क सुरक्षित ठेवणे, साहित्यिक, प्रकाशक, पत्रकार यांचे खून होत असतील, त्यांचा छळ होत असेल तर ते रोखण्यासाठी आघाडी खोलणे, ग्लोबलसाऊथ मधल्या देशातील साहित्यिकांना व्हिझिबिलिटी मिळवून देणे, भाषांतर संस्कृती वाढवणे, नागरिकांचे भाषाअधिकार जोपासणे, त्यांचे रक्षण करणे, इत्यादी अवघड कामे-जी केवळ साहित्य संमेलने अथवा साहित्य मेळे भरवतात अश्या संस्था करू शकत नाहीत अशी कामे पेन इंटरनॅशनल संस्था अशी कामे करत अली आहे.

गुरुदेव रवींद्रनाथ टागोर, मुन्शी प्रेमचंद, पंडित जवाहरलाल नेहरू, निस्सीम इझिकेल, सलमान रश्दी हे सन्मानित सदस्य राहिले आहेत.. रवींद्रनाथांची पेन काँग्रेसचे अधिवेशन भारतात भरवण्याची इच्छा होती, पण त्या वेळच्या युद्ध परिस्थिमुळे ते शक्य झाले नाही.

पेनच्या संपूर्ण इतिहासात, पेन काँग्रेसचे एकही अधिवेशन भारतात साजरे झाले नाही. या वर्षी ते होत आहे हि आपल्या देशातील सगळ्या साहित्यिकांसाठी अत्यंत आनंदाची बाब आहे.

आंतरराष्ट्रीय भाषातज्ञ डॉ.गणेश देवी व दक्षिणायन ह्या चळवळीच्या पुढाकाराने हे अधिवेशन पुण्यात पार पडत आहे. हे अधिवेशन युनोच्या बैठकीसारखे असते व ते फक्त प्रतिनिधीकरीता असते. या अधिवेशनाच्या निमित्ताने काही खुल्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

 

pen

     १. दिनांक २४  सप्टेंबर, संध्याकाळी   ६.०० वाजता, बालगंधर्व रंगमंदिर चित्र-गॅलरी मध्ये भारतीय लिप्या आणि हस्तकला विषयीचे प्रदर्शन — उदघाटन 

२. दिनांक २५ सप्टेंबर, सकाळी ९.३० वाजता, महात्मा फुले स्मारकाला भेट आणि वंदना. यात पेनचे अध्यक्ष व  इतर पदाधिकारी  उपस्थित असतील. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असेल.

३. दिनांक २५ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर, कला गजर प्रदर्शन राजा रविवर्मा कला दालन घोले रोड, पुणे२६ सप्टेंबर सायंकाळी ६ वाजता, पंडित जवाहरलाल नेहरू सांकृतिक भवन प्रसिद्ध चित्रकार गुलाम शेख ह्यांचे व्याख्यान,

४ .  दिनांक २८ सप्टेंबर,सायंकाळी ५.३० वाजता एन्गुगी वा थियोंगो,आंतरराष्ट्रीय लेखक व कार्यकर्ते  याचे व्याख्यान . स्थळ: बालगंधर्व रंगमंदिर,पुणे

५. दिनांक २९ सप्टेंबर, सकाळी १० ते दुपारी २ बहुभाषिक कवी संमेलन, पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन,घोले रोड,पुणे

 

 

 

 

Leave a Reply