रविशंकर जी ! राफेल सौदा मेक इन इंडियासाठी कसा…? 

पावणे दोन लोकांची सरकार असलेल्या भारत सरकारचा राफेल सौदा हा मेक इन इंडियाच्या फायद्याचा कसा असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते शशी सोनवणे यांनी उपस्थित केला आहे..

सत्तेत आल्याबरोबर मोदींनी १२६ विमाने व शासकीय प्रकल्प असलेल्या हिंदुस्तान ऐरोनॉटिक्स लिमिटेड ला काही तंत्रज्ञानाचे हस्तांतरण च्या जागी फक्त ३६ तयार असलेल्या विमानाचा सौदा करण्याची घाई मोदींनी का केली .?
झालेला नवीन करार ज्यात फ्रान्समध्ये पूर्णतः तयार ३६ विमाने विकत घ्यावयाची होती. HAL ला तंत्रज्ञानाचे हस्तांतरण करण्याची जरूर नव्हती. रोखीने फायदा फ्रान्सचा होणार होता तर मग हा करार मेक इन इंडियाच्या फायद्याचा कसा असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे
८ ऑगस्ट ला भाजपच्या मागील सरकारमध्ये मंत्री असलेल्या अरुण शौरी आणि यशवंत सिन्हा व जेष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी दिल्ली येथे पत्रकार परिषद घेत जाहीर खुलासा केला होता.
विमानाच्या खरेदीबाबतची विस्तृत माहिती द्यायला व सदर करार अंबानी यांच्यासोबतच का केला याची माहिती द्यायला गोपनीयतेसंबंधी करार आडकाठी घालीत नाही तेव्हा संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी यासंबंधी खोटे बयान दिले असून देशाची दिशाभूल केली आहे.
पत्रकार परिषदेच्या तात्काळ नंतर अंबानी द्वारा केलेल्या खुलाश्यात ते करारावर स्वाक्षरी होताना पॅरिस मध्ये उपस्थित असल्याचे कबूल करण्यात आले आहे.
करार करताना केलेली घाई,घोटाळ्याची वाच्यता सुरू झाल्यावर जबाबदार मंत्र्यांकडून केलेले जाणारे दिशाभूल करणारे खुलासे,राहुल गांधी चे या मुद्यावर सक्रिय होणे व महत्वाचे म्हणजे अरुण शौरी व यशवंत सिन्हा यांचे तयारीनिशी मैदानात उतरणे या पार्श्वभूमीवर मोदींनी देशाला खरे काय ते सांगितले पाहिजे ही मागणी जोर धरायला लागली आहे
(असंतोष टीम)

One comment

Leave a Reply