पीएम मोदींनी देशाला शिव्यांची लोकशाही बनवून टाकले आहे – रविश कुमार

मोदींनी देशासाठी काहीच केले नाही असे बिल्कुल नाही . त्यांनी या देशाला शिव्यांची लोकशाही बनवून टाकले आहे असे जेष्ठ पत्रकार रविश कुमार म्हणाले

रविश दिल्लीच्या कॉन्स्टीट्यूशन क्लब मध्ये २२-२३ सप्टेंबर ला पार पडलेल्या CAAJ(कमेटी अगेन्स्ट असॉल्ट ऑन जर्नलिस्ट्स) च्या दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आयोजित दुसऱ्या सत्रात बोलत होते

Trolls, Threats, And Intimidation (ट्रोल, भीती आणि धमकी) हा सत्राचा विषय होता. सत्रास प्रसिद्ध पत्रकार नेहा दीक्षित व निखिल वागळे यांनी सुद्धा संबोधित केले . केंद्रात मोदी सरकार आल्यापासून सत्तेला प्रश्न विचारणाऱ्याचे जगणे कठीण झाल्याबाबत सर्वांचे एकमत होते. सोशल मीडिया सुद्धा याबाबतीत गंभीर आव्हान म्हणून उभे ठाकले आहे.प्रश्न करणाऱ्या लोकांना वेगवेगळे पाडून त्यांना देशाचे दुष्मन ठरविण्याचे सत्ता प्रायोजित अभियान चालविले जात आहे. नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना ह्याच पध्दतीने काम करायचे.याविरोधात पत्रकारांनी सजग लढा उभारण्याची गरज व्यक्त करण्यात आली.

(Mediavigil वरील बातमीच्या आधारे)

वक्त्यांची भाषणे ऐकण्यासाठी व मूळ हिंदी बातमी वाचण्यासाठी mediavigil.com/news/modi-made-republic-of-abuse/ ला भेट द्या..

2 comments

Leave a Reply