पत्रकारांच्या होणाऱ्या शोषणाविरोधात देशव्यापी लोकमत निर्माण करण्याचा संकल्प: कमेटी अगेन्स्ट असॉल्ट ऑन जर्नलिज़्म (CAAJ)च्या अधिवेशनाचा दिल्लीत समारोप

 

This slideshow requires JavaScript.

दिल्ली येथील कॉन्स्टीट्युशन क्लब येथे २२-२३ सप्टेंबर २०१८ ला कमेटी अगेन्स्ट असॉल्ट ऑन जर्नलिज़्म (CAAJ) चे दोन दिवशीय अधिवेशन पार पडले. पत्रकारांच्या होणाऱ्या शोषणाविरोधात देशव्यापी लोकमत निर्माण करण्याचा संकल्प घेत काल या अधिवेशनाचा समारोप झाला. या अधिवेशनाला प्रेस क्लब ऑफ इंडिया आणि आंतरराष्ट्रीय दर्जाची पत्रकाराची संघटना असलेल्या ‘कमेटी टू प्रोटेक्ट जर्नलिस्ट’ या संघटनेचे समर्थन मिळाले. याशिवाय तीस पेक्षा अधिक पत्रकारिता संस्था व जनसंघटनानी यात भाग घेतला.

 

दोन दिवसात चार सत्रात पत्रकारिता व पत्रकार यांच्यावरील संकटांची विस्ताराने चर्चा करण्यात आली. शहीद पत्रकारांचे नातेवाईक,तुरुंगवास भोगलेल्या व नोकरी गमावलेल्या पत्रकारांनी आपले अनुभव कथन केले. देशाच्या प्रत्येक कोपऱ्यातून पत्रकार या अधिवेशनास उपस्थित होते. समारोप सत्रात चारही सत्राच्या चर्चेचा सारांश मांडण्यात आला. एक ठराव प्रतीनिधीनी मंजूर केला.

 

  प्रस्ताव  

 

देशभरातून  उपस्थित पत्रकारांच्या दोन दिवशीय अधिवेशनाने आज सत्तेच्या जनता विरोधी धोरणाच्या विरोधात लेखणी चालविणाऱ्या पत्रकारांच्या समोर भयंकर परिस्थिती निर्माण झाल्याच्या बाबीस अधिक स्पष्ट केले आहे. अशा प्रकारच्या पत्रकारांच्या हत्या झाल्या,त्यांच्यावर हल्ले झाले आणि त्यांना शासकीय यंत्रणेद्वारे त्रासही दिल्या गेला. सरकारच्या कुठल्याही पक्षाचे असो जवळपास परिस्थिती सारखीच आहे. राजकीय नेते आणि पोलिसाच्या अपवित्र युतीमुळे लहान शहरे,गावे,दुर्गम भागात काम करणाऱ्या पत्रकाराची स्थिती अधिकच गंभीर आहे.

पत्रकारांच्या हिताचे सरंक्षण करणाऱ्या सर्व संघटना आणि संस्था निष्क्रिय झाल्या आहेत.त्यांचा दृष्टीकोन बदलला आहे हि नमूद करण्याची गरज आहे. एखादा पत्रकाराने आपल्या शोषणाविरोधात आपल्या संस्थेकडे तक्रार दाखल केली तरी त्याचा परिणाम साधला जात नाही अथवा पत्रकार बिरादरीचे योग्य समर्थनही मिळत नाही.अशा परिस्थितीत हे सभागृह केवळ पत्रकारांच्या शोषणाविरोधातच आवाज उठविणारी संघटना नव्हे तर प्रश्न विचारण्याची लोकशाही संस्कृती जिवंत ठेवण्याचे काम करील अशा संघटनेची गरज व्यक्त करते. हि संघटना देशाच्या विविध राज्यात व विविध भाषांमध्ये काम करणाऱ्या पत्रकारांच्या शोषणाविरोधात लोकमत निर्माण करील.

 

हे अधिवेशन या प्रकारचा पुढाकार सुरु ठेवत कमिटीच्या विस्तारासाठी सर्व प्रयत्न करण्याची जबाबदारी आयोजन समितीवर सोपवित आहे. विस्ताराच्या प्रक्रियेत प्रादेशिक,भाषिक व लिंगभाव प्रतिनिधीत्वाची विशेष काळजी  घेणे गरजेचे राहील. विस्तारीत समितीस घटना व मुद्यांच्या संकलनाची व त्यासबंधाने आवश्यक कार्यक्रमांचा प्रस्ताव गोळा करण्यासाठी एक व्यवस्था निर्माण करण्याची जबाबदारी घ्यावी लागेल.

 

( अधिवेशनाचा रिपोर्ट व व्हिडीयो इत्यादी http://www.mediavigil.com/news/caaj-convention-ends-with-resolution-to-make-a-mechanism-to-protect-journalists/ ला भेट द्या.)

 

This slideshow requires JavaScript.

Leave a Reply