भांडवलशाही : निसर्गाचे विनाशकारी शोषण करणारा एकमेव गुन्हेगार- अॅलन बाडिओ

(पर्यावरणीय संकट ,भांडवली आरिष्ट्य,नव्या तंत्र क्रांतीने निर्माण केलेले प्रश्न ,आर्टिफिशीयल इंटेलीजन्स व एकविसाव्या शतकातील समाजवादी,साम्यवादी जगाच्या निर्माणाचा प्रश्न आदीचा आढावा घेणारा अॅलन बाडिओ यांचा लेख इंग्रजीतून डॉ.दीपक बोरगावे यांनी खास असंतोष च्या वाचकासाठी अनुवादित केला आहे.)

अनेक कारणांसाठी, मानवी जीवनाचा अंत होणार अशी घोषणा करायची ही आजकाल एक सामान्य बाब झालेली दिसते . घासू झालेल्या प्रेषिताच्या सिद्धांताच्या आधारावर आपण जगत असलेलं हे जग संपणार आहे याचा अंत होणार आहे आणि याला मानवाचा अतिलोभ हे कारण आहे . या तंत्रमय जगाने आपल्या प्रत्येक गोष्टीचे रिबोटायझेशन केले आहे, कोणतीही गोष्ट ही आज डिजिटलाइज झालेली आहे, कलाक्षेत्रातही याचा विपुल वापर आहे आणि आता अतिबुध्दिच्या जोरावर आपले जग आपणच नष्ट करणार आहोत .
परिणामी, या धोक्याच्या गोष्टी, जसे मानवतावादाचे झालेले स्थित्यंतर, आणि उत्तर-तंत्रजगातील मानवी समाज हा उदयाला येत आहे किंवा एका अर्थान आपण परत, पूर्वीच्या सिद्धांतनाप्रमाणे, आदिम प्राणी होण्याच्या दिशेने जात आहोत याला दिले जात असलेले कारण म्हणजे : तांत्रिक निर्मितीवर आधारलेले भविष्यवेधी अंदाज किंवा निसर्गाचे आपण केलेले अतोनात नुकसान . हे सारे भविष्यवेधी अंदाज आणि वैचारिक गोंधळ माजवणारी सिद्धांतने ही मानवतेला खरा धोका कोणता आहे यापासून परावर्तित करतात किंवा त्याबद्दल गूढतेचे एक वातावरण निर्माण करतात. खरा धोका हा जागतिक भांडवलशाहीचा आहे, जो आपणास ह्मा न सुटणाऱ्या तिढयाकडे घेऊन चालला आहे . सामाजिक स्वरूपात आज अस्तित्वात असलेली ही एकमेव शक्ती, हेच वास्तव आहे ज्याला आपण नैसर्गिक शक्तींचा विनाश करण्याची मुभा देऊन बसलो आहोत आणि विशेषत: स्पष्टपणे बोलायचे झाल्यास, ही खासगी संपत्ती आणि त्यातून होणाऱ्या नफ्याशी ही निगडित आहे, हेही आपणास विसरून चालणार नाही. निसर्गातल्या अनेक प्रजाती ह्मा नष्ट होत आहेत, पाणी, ही आता विशेष संपत्ती म्हणून पुढे येऊ लागली आहे. हे सारे काही जगातल्या अतिधनाढय ,निर्दयी व्यक्तींच्या संपत्ती मिळवण्याच्या स्पर्धात्मक लोभामुळे होत आहे. पर्यावरणीय प्रवचने झोडली जातात, पटणारी सिधांन्तने मांडली जातात, भविष्यवेधी अतिशयोक्ती केली जाते, पण ह्मा साऱ्या प्रचारात्मक गोष्टी म्हणून तिथेच सीमित होतात. ह्या गोष्टी नियंत्रण करणाऱ्या राज्यांना उपयोगीच असतात. यामुळे ते आपला चेहरा कसा मानवी आहे, मानवी कल्याणाचा साधकबाधक विचार ते कसा करत आहेत- ह्मा खोटया गोष्टींचे चांगले नाटक ते करत राहतात. मोठमोठे भांडवलदार, पर्यावरणाची काळजी आहे असे वरवर दाखवणाऱ्या मोठया कंपन्या, आपल्या प्रचंड फायद्यासाठी भास निर्माण करण्याचे उद्योग करत राहतात. त्यांची उत्पादने ही कशी शुध्द आहेत, निसर्गाचे भान ठेऊन निर्माण केली आहेत, त्यांना अखिल मानवजातीची चिंता कशी आहे वगैरे छानछान गोष्टी ते सांगत राहतात.

आज टेक्नालॉजीच्या परिणामामुळे फेटीसीझम, म्हणजे क्रयवस्तूबद्दलचे अमाप आकर्षण हे एक न संपणारी क्रांतीमय घटीत झाले आहे. याशिवाय, डिजिटल क्रांती ही एक अद्यायावत अशी फॅशन झाली आहे. याचबरोबर, हे घटीत आपणास या गोष्टीची मनधरनी करत राहते की, आपण स्वर्गीय सुखाकडे वाटचाल करत आहोत, म्हणजे आपण कोणतेही काम न करता आपणास सुखाचा लाभ मिळत राहिल. हे एक सार्वत्रिक होऊ पाहणारे घटीत आहे. एवढेच नव्हे, तर इलेक्ट्रॉनिक विचार करण्याच्या पध्दतीमुळे मानवी बुध्दीचा विनाश होणार आहे. या कॄत्रिम बुध्दीच्या आरत्या आज सगळीकडे होत आहेत, जगात आज कोणतेच नियतकालिक सापडणार नाही जिथे या कॄत्रिम बुध्दीच्या विजयाच्या गाथा आपणास सापडणार नाहीत. पण या दोन्हीही ठिकाणी कॄत्रिमता म्हणजे काय किंवा निसर्ग म्हणजे काय याची व्यवस्थित व्याख्या केलेली दिसत नाही.

तत्त्वज्ञानाची सुरूवात झाली तेव्हापासून निसर्ग या शब्दाचे औत्सुक्य आजही संपलेले नाही. सांयकाळचा सूर्यास्ताचा प्रकाश, हा एक याचा रोमॅन्टिक अर्थ होतो, ल्यूक्रेटियसचा अण्विक भौतिकवाद, वस्तूंच्या जवळीकतेचे असलेपण, स्पिनोझाची समग्रता,संस्कॄतीचे नेमक्या उलटेपणाने जाण्याची गती, ग्रामीण जीवन, शेतकऱ्याचे जीवनचित्र, या विरूध्द शहरी कॄत्रिम आणि बेगडी जीवन(पेटनने म्हटले होते, पॄथ्वी खोटे बोलत नाही) जीवशास्त्राची भौतिकशास्त्रापासून घेतलेली फारकत, अवकाशशास्त्राप्रमाणे असलेल्या छोटया आकाराच्या उपग्रहांची ठिकाणे, धर्म निरपेक्षत्याच्या बाजूने विचार केल्यास त्याची विविधांगी सापडणारे वेडग्रस्त साम्यस्थळे, नैसर्गिक लैगिंकता विरूध्द प्रतिबंध… मला अशी भीती वाटते की, आज निसर्ग म्हणजे उद्यानातील शांतता, प्रेक्षणीय स्थळांना भेट देणाऱ्या प्रवाशांना दिसणारे रानटी प्राण्यांचे सौंदर्य, समुद्र किनारे, डोंगराळ भागात घालवलेला सुखकारक आणि आनंदी उन्हाळा आणि माणूस हा, निसर्गाच्या संदर्भात, जबाबदार आहे, अशी कल्पना करता येर्इल.. आज माणूस हा दुय्यम उपग्रहावरचा एक सर्वसाधारण सूर्यमालिकेतल्या काठावर आहे, तो विचार करणारा एक चिप (इलेक्ट्रानिक तुकडा) आहे. ?

मानवी इतिहासात, तत्त्वज्ञानाची सुरवात झाली, तेव्हापासून तत्त्वज्ञानाने तंत्र किंवा कला या गोष्टींचा विचार केला आहे| . तंत्र आणि फसिस (कला) यांच्या द्वंदात ग्रीक फिरत राहीले. त्यांनी मानवी प्राण्याचा अर्थ लावून त्याचे काही सिद्धांतन केले . ग्रीकांनी माणसाचे वर्णन निसर्गातील सर्वात दुर्बल प्राणी पण विचार करणारा लव्हाळा (रीड) असे केले आहे. याचा अर्थ पास्कल म्हणतो तसा तोे निसर्गापेक्षा बलवान आहे, जवळपास देवाजवळ जाणारा आहे. खूप दीर्घ काळ ग्रीकांनी माणूस या प्राण्याचे खोलवर निरिक्षणे केली. त्यांच्या लक्षात आले की, अस्तित्वात असलेल्या भौतिक व्यवस्थेत या प्राण्याकडे गणिती विचार करण्याची क्षमता मोठी आहे. आज आपण रोबोट पाहतो आहोत|. तेही गणित वेगाने करतात, अंक कल्पनेच्या पलीकडे जा}ऊन मोजतात. पण यांची निर्मिती याच कामासाठी ही स्वतः मानवानेच केली आहे|
आता हे असे प्रतिपादन करणे मूर्खपणाचे ठरेल, कारण अजचे अजस्त्र क्रेनज प्रचंड वजनाचे काँक्रिट दगड खूप उंचपर्यंत नेऊ शकतात|. कितीही प्रचंड स्नायूच्या ताकतीच्या माणसाला हे शक्य नाही. प्रकाशाच्याही वेगापेक्षा अधिक विचक्षण असणाऱ्या या अतियंत्रवत रोबोट माणसाचे काम पाहून याला काही बुध्दी म्हणता येणार नाही. तंत्रज्ञानाच्या साहाय्याने निर्माण झालेला अतिविशाल रोबोट यंत्रमानव हा भयपट आणि विज्ञान चित्रपटातला विषय होऊ शकतो. निर्मात्याला या महायंत्रमानवाचे आगमनाची भीतीमिश्रीत कौतुक वाटेल (ज्याची प्रतिक्षा आपण नित्सेच्या काळापासून करत आहोत), पण शेवटी त्याला निसर्गमातेचाच आधार शोधावा लागेल , हे लक्षात ठेवले पाहिजे|
आता, थोडसं अजून एक पाऊल पुढे टाकू या. चार ते पाच दशहजार वर्षांपासून मानवी जीवन हे काही त्रिबंधानी बांधलेले दिसते : एक खासगी संपत्ती, ज्यामुळे समाजाची प्रचंड सपत्ती ही काही धनाढयांमध्ये एकवटली आहे ; दोन कुटुंब संस्था, ज्या माध्यमातून ही संपत्ती वारसाहक्काने पुढील पिढयांत संक्रमित होत राहाते ; आणि तीन राज्य, जे संपत्ती आणि कुटुंब संस्थेचे सशस्त्र सैन्याच्या बळावर त्यांचे संरक्षण करते. या त्रिबंथात्मक सूत्रांच्या आधारे मानवी समाजाचे संघटन केले जाते. आजही संक्रमनाच्या कालखंडात हेच चित्र आहे. वास्तविक, आजचे चित्र हे पूर्वीपेक्षाही अधिक संघटीत आहे| . भांडवलशाही हे त्याचे समकालीन रूप आहे. तंत्रविज्ञानाच्या आधारे स्पर्धा निर्माण करून, समाजाला गुलामगिरीच्या गर्तेत ढकलणे हा बंध इथे अधिक स्पष्ट दिसतो. फायदा आणि भांडवलाचे राजकारण करून समाजात राक्षसी विषमता, सामाजिक विक्षिप्तता आणि निरर्थकता निर्माण करणे, युध्दसदृश्य हिंसा, कत्तली घडवून आणणे, धोकादायक आणि समाजविघातक विचारसरणींची पेरणी करणे- हा फंडा चालू राहातो. वर्गवर्चस्वाच्या ऐतिहासिक राज्य प्रवाहात नव्या तंत्रशैलीचा वापर करून भांडवलशाही अशा पध्दतीने आपला अमल करत राहाते.
संक्रमन कालखंडाचे प्रस्थापिकरण करताना, तंत्रशास्त्रीय नवता ही सुरूवातीची परिस्थिती असते, हे आपण लक्षात घेतले पाहिजे, तो काय अखेरचा परिणाम थोडाच असतो. या भूभागावरील मानवी नियतीचा आपण जर विचार केला तर अनेक संक्रमने आपल्याला दिसतात : स्थापित होत जाणारी कॄषक (शेती) व्यवस्था, गुरेढोरे, घोडे पालनापेषण, मेंढपाळी जीवन, मातीची भांडी बनवन्याची अवस्था, नंतर तांबे पितळी भांडी, धातूची शस्त्रे अवजारे, लेखन, राष्ट्र निर्मितीचे प्रयत्न, भव्यदिव्य वास्तू निर्मितीची वस्तूकला, एकक-धर्मनिर्मितीचे प्रयत्न-ह्मा साऱ्या नवता, शोध, निर्मिती आजचे स्मार्ट फोन किंवा विमाने इतकीच महत्त्वाची आहेतव्याख्येच्या आधारानेच बोलायचे झाले तर , इतिहास प्रवाहात, जे जे म्हणून मानवी आहे असे आपण संबोधतो, ते सारे कॄत्रिमच असते . असे जर नसते तर मानवी संक्रमनाशी आपण झुंझ देऊच शकलो नसतो- यातील एक संक्रमन आपणास माहित आहे- हे संक्रमन प्राणी जगताशी जवळीक साधणारे होते, शिवाय भटक्या लोकसमुहात ते 200,000 वर्षे, इतके दीर्घ काL टिकले|
हा भीतीदायी आणि रहस्यमय आदिमतावाद साम्यवादी भ्रममूलक आदिमतावादा एवढा टिकून राहीला. आजही आदिवासी, मूलनिवासी समाजातील लहान मुले, पुरूष, स्त्रिया आणि वॄध्द कोणत्याही कॄत्रिमतेशिवाय, म्हणजे सहजतेने ते बेडूक, उंदीर, अस्वल यांच्याबरोबर मैत्र भावाने जगताना दिसतात. हे समाज हिंसाग्रस्त होते, हिंसेने घेरलेले होते वगैरे गोष्टी हास्यास्पद आणि प्रचारात्मक वाटतात, कारण हे सारेजण सातत्याने जगण्याच्या लढार्इत व्यस्त होते, आपल्या गरजा मर्यादित करत होते. कॄत्रिमतेचा नैसर्गिकतेवर विजय, रोबोटचा माणसावर विजय असा विचार करणे म्हणजे एक अस्सल विक्षिप्तताच म्हणावी लागेल|. अशा भयंकर अनर्थतेला आणि भाकितांना आपण विरोध करू या : एक साधी कुऱ्हाड किंवा एक प्रशिक्षित घोडा (म्हणजे इथे आपण लव्हाळयापासून केलेल्या कागदावरची लेखन-चिन्हे लक्षात घेत नाही) ही उदाहरणे आदिमानवतेच्या पुढचीच म्हणावी लागतील किंवा अंक मोजण्याचे कौशल्य हे हाताचा आधार घेऊन मोजणाऱ्यापेक्षा अब^कसच्या (लहान मुलांना अंक मोजण्यासाठी वापरलेली छोटया चेंडूची चौकट) आधारे मोजणाऱ्याला आपण प्रोताहित केले पाहिजे|
आजच्या आपल्या काळातील प्रश्न हा परत आदिमतेकडे जाण्याचा नाही, तंत्रज्ञानाच्या दहशतीमुळे परत पुरातण काळाचा धावा करण्याचा नाही, किंवा त्याचबरोबर विज्ञानाच्या मुशीतून तयार झालेल्या तद्दन खोटया रोबोटच्या फिक्शनमध्येही जाण्याचा नाही. खरा प्रश्न आहे तो, ह्मा नवयुगाच्या ज्या नव्या पध्दती निर्माण होण्याच्या शक्यता आहेत त्यातून ताबडतोबीने एक्झिट घेण्याची जरूरत आहे. हजारो वर्षांची ही उपलब्धी स्पर्धा आणि वर्चस्ववाद यांच्या विजयीकरणात अडकली आणि कोटयावधी लोकांना दु:ख दारिद्रय सहन करण्यास भाग पाडत असेल तर यावर कोणत्याही किमतीत मात करायला हवी. ह्मा नवयुगाच्या (निवोलिथिक एज) अवतारात अनेक युध्दं दडलेली आहेत. कोटयावधी लोकांचे बळी घेऊन, ह्मा तंत्रशास्त्रााच्या आधारे दोन महायुध्दं (1914-18 आणि 1939-45) तर झालीच आहेत, शिवाय आता त्याहीपेक्षा अधिक होत आहेत|
माझ्या दॄष्टीने, हा प्रश्न तंत्रशास्त्रााचा किंवा निसर्गाचा नाहीच आहे.. तो आहे आपण जगाच्या पातळीवर समाजाचे संघटन कसे करतो आहेात याचा या प्रश्नाचा प्रस्ताव शक्य आहे.. म्हणजेच आपणास कोणतीही खासगी संपत्तीची निर्मिती न करता, जे मानवी समाजाला आवश्यक आहे त्याची निर्मिती करून हा प्रश्न सोडवता येऊ शकतो. संपत्तीला कुटुंबाचे कोणी वारसदार नसतील, कसलीही वडिलोपार्जित येणारी तीव्रतम संपत्तीचा हक्क नसेल. कोणतेही वेगळे राज्य नसेल जे ह्मा सर्वांना संरक्षण देर्इल. कामाच्या बाबतीत कोणताही भेदभाव नसेल ,उतरंड नसेल. देश नसतील, लपलेल्या बंदिस्त -आक्रमक अस्मिता नसतील|,सामुहीक संघटन असेल ज्याला एक सामुहीक भविष्य असेल.

यालाच एक नाव आहे, एक सुंदर नाव आहे : साम्यवाद.. भांडवलशाही ही या निओलिथिक युगाच्या अवस्थेतील शेवटची अवस्था असेल, जे मानवी समाजावर आपला ताबा ठेवतील|. काही थोडया लोकांच्या ताब्यात असलेल्या ह्मा सेवेच्या शोधातून या सुंदर प्राण्याला 5000 वर्षांनंतर बाहेर पडायचे आहे|. जवळपास दोन शतकांपासून, (मार्क्सने सांगितल्यापासून) आपणास हे कळले आहे की, नवे युग आपण सुरू करायला पाहिजे : जिथे तंत्रशास्त्र सर्वांसाठी असेल, सर्वांना कामही समतेच्या आधारावर वितरित केले जार्इल, अनेक गोष्टी ह्मा एकमेकांना दिल्या-घेतल्या जातील आणि शिक्षण साऱ्यांना असेल.

ही लहरी भांडवलशाही टिकवून ठेवण्यासाठी, या नव्या साम्यवादाला विरोध आहे, सगळीकडे विरोध आहे, सर्व प्रश्नांच्या संदर्भात विरोध आहे. ही आज आपणास दिसत असलेली आधुनिकता पाच हजार वर्षे वयाची आहे, खूप जुनी आहे, खूप वॄध्द आहे.

(अनुवाद- डॉ दीपक बोरगावे)

4 comments

Leave a Reply